मनोरंजन

मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा ‘बदली’

Dipali Naphade  |  Jan 11, 2022
badlee series

निमशहरी भाग जिथे किमान सोयीसुविधा असतात त्या भागात स्थायिक असलेल्या शिक्षकाची बदली जेव्हा पहिल्यांदा दळणवळण आणि सोयीसुविधांची वानवा असलेल्या एखाद्या खेड्यात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यापर्यंतचे काम या शिक्षकांना करावे लागते. ग्रामीण भागातील शैक्षणिक पद्धतीवर प्रकाशझोत टाकणारी ‘बदली’ (Badlee) ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक संदेशाचीही गरज आहे हे लक्षात घेऊन या सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं ग्रामीण भागामध्ये काय चालतं यावर एक प्रकाशझोत यामार्फत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना ही कथा भावेल असा विश्वास टीमने व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा – झिम्माचे रेकॅार्डब्रेक अर्धशतक

आठ भागांची सिरीज

Badlee Series

“गावाकडच्या गोष्टी” या वेबसिरीजमार्फत प्रत्येक घराघरात पोचलेले दिग्दर्शक, लेखक नितीन पवार यांनी ‘बदली’ या वेब सिरीजचे लेखन,  दिग्दर्शन , कथा  पटकथा आणि संवाद केले असून मानसी सोनटक्के यांनी  ‘बदली’ ची निर्मिती केली आहे.  छायांकन वीरधवल पाटील तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे . प्लॅनेट मराठी  व अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत ‘बदली’ ही आठ भागांची अनोखी वेब सिरीज 15 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजचे चित्रीकरण साताऱ्यातील एका शाळेत केले आहे. 

अधिक वाचा – या कारणामुळे निआ शर्मा होऊ लागलीय ट्रोल

सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न 

‘बदली’बाबत दिग्दर्शक नितीन पवार म्हणतात, ‘’या वेब सिरीजमधून ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातील शाळांची दृश्ये ही साताऱ्यातील एका शाळेत चित्रित केली असून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यथा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गावाकडील कुटुंबाचा शहराकडे स्थिरस्थावर होण्याचा कल वाढला असल्यामुळे परिणामी ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. उलट गावाकडे असलेल्या इंग्रजी शाळांकडे मुलांच्या भरत्या होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण मराठी शाळांना विसरून चालणार नाही . ‘बदली’ च्या निमित्ताने मराठी शाळांना सुगीचे दिवस येणार असतील तर आम्हाला खूप आनंद होईल. शिक्षक हे येतील, जातील पण पहिली आपली मुलं शिकली पाहिजेत,त्यासाठी आधी आपण आपली शाळा टिकवली पाहिजे… यात आमचा मूळ हेतू हाच आहे की ओस पडत असणाऱ्या मराठी शाळांचे पुन्हा चांगले दिवस यावेत आणि यासाठी प्लॅनेट मराठीने (Planet Marathi) आम्हाला सहकार्य केले आहे.’’ या  वेब सिरीजबाबत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) म्हणतात, ‘ बदली ‘ ही एक सत्य परिस्थितीवर आधारलेली वेब सिरीज असून आमचा प्रयत्न आहे की फक्त ग्रामीणच नाही तर शहरातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत ही वेब सिरीज पोहोचावी. या निमित्ताने गावोगावी भविष्यातील मराठी शिक्षण पद्धतीचे महत्त्व अधोरेखित होईल. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

अधिक वाचा – ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन