DIY लाईफ हॅक्स

10 वर्ष बाप्पाच्या एकाच मूर्तीची पूजा, विराग मधुमालतीचा नवा मानस

Dipali Naphade  |  Sep 15, 2021
virag-madhumalti

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठीच अति मंगलमयी आणि आनंदी असा उत्सव आहे. आपल्याकडे नेहमीच सगळ्यांकडे बाप्पा घेऊन येतात आणि प्रतिवर्षी दीड दिवस, पाच दिवस आणि दहा दिवस असे विसर्जन करण्यात येते.  गणेशोत्सव साजरा सगळीकडेच केला जातो. पण सध्या विश्वविक्रमासाठी चर्चेत असणारे विराग मधुमालती यांच्या घरी गेले दहा वर्ष बाप्पाची एकच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. याबाबत आणि त्यांच्या विश्वविक्रमाबाबत ‘POPxo मराठी’ ने जाणून घेतले. 

आपण गेले दहा वर्ष एकच मूर्ती स्थापित केली आहे यामागील कारण काय?

बाप्पाचे तलाव, समुद्रामध्ये जेव्हा विसर्जन केले जाते. तेव्हा त्यांचे भग्नावशेष पाहून मन विषण्ण होऊ लागलं . निसर्गाची होणारी हानी यामुळे मनाला खूपच त्रास होतो आणि त्यानंतरच बाप्पा कायम आपल्याकडे राहावा यासाठीच गेले दहा वर्ष घरात मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला. निसर्गाच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलला जावा हाच यामागील उद्देश आहे असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक वाचा – जेनिलिया देशमुखचा मराठमोळा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

आपण जो रेकॉर्ड बनवणार आहात त्याची तयारी कशी चालू आहे? 

सहा दिवस आणि सहा रात्र नॉनस्टॉप गाण्याचा रेकॉर्ड आहेत. 555 तासांचा विश्वविक्रम केला आहे. 155 तबलावादकांना सोबत घेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या 895 तासांचा विश्वविक्रमही नुकताच आम्ही केला आहे. चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे असेच विश्वविक्रम एकानंतर एक करण्याची आमची तयारी चालू आहे. प्रत्येक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यामागे अवयवदान हा एकमेव उद्देश आहे. यातून मिळणारी रक्कम ही याच कामासाठी वापरण्यात येते. बाप्पाच्या कृपेने हे सर्व रेकॉर्ड्स आम्ही करत आहोत. 

विश्वविक्रमाबद्दल सध्या मनात काय भावना आहेत? 

17 लाख संगीत अलंकार आणि त्याचे निर्माण होणारे 40 फूट उंच पुस्तक अर्थात 2 लाख त्याची पाने आहेत. हे कसे करायचे याचे काम सध्या सुरू आहे. शिवाय यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींवर मात करणे चालू आहे. अलंकार लिहिण्याचं काम पूर्ण झालं आहे. अवयवदान करण्यासाठी जागृती करणे हा उद्देश आहे. तर पाण्याखाली राहून गाणे म्हणणे आहेत. सुनील पाल आणि साधना सरगम यांचीही यामध्ये साथ मिळणार आहे. हा विश्वविक्रम ईश्वरकृपेने नक्की यशस्वी होईल अशी खात्री आहे. 

अधिक वाचा – …आणि त्यासाठी साकारणार पाण्याखाली राहून गायनाचा अद्भुत असा लाईव्ह सोहळा

अवयनदान तसेच नेत्रदान संबंधित कोणत्या संस्थांना आपल्यामार्फत मदत केली जाते?

अवयवदान आणि नेत्रदान संदर्भात आयईसीचे कार्य आम्ही करतो. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आम्ही करतो. यासाठी काय प्रक्रिया काय आहेत आणि कोणती काळजी घ्यायला हवी. यासंदर्भात फॉर्म्स भरणे अशी कामे करतो. दिशा फाऊंडेशन यासाठी आम्हाला मदत करते. ज्याला अवयवदान करायचे आहे पण त्यासाठी नक्की काय करायचे आहे याबाबत लोकांना अधिकाधिक माहिती देण्याचे काम आम्ही या विश्वविक्रमांमार्फत करत आहोत.

विश्वविक्रमानंतर पुढे काय करण्याचा विचार आहे?

विश्वविक्रम करण्याचा मुळात उद्देशच सामाजिक सेवा आणि लोकांपर्यंत अवयवदानाचे महत्त्व पोहचवणे हा आहे. अंतिम श्वासापर्यंत हाच उद्देश राहणार आहे. त्यामुळे वेगवेगळे विश्वविक्रम करण्याचा मानस राहील. याच माध्यमातून पुढे जे काही रेकॉर्ड्स बनत राहतील ते आपण पाहूच. 

विराग मधुमालती हे 20 नोव्हेंबर रोजी नवा रेकॉर्ड बनवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या रेकॉर्डसाठी आपणा सर्वांकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! अवयवदानासारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय गरजेच्या गोष्टीसाठी अनेकांनी आता पुढे येणे गरजेचे आहे. 

Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi | Ganpati Visarjan Status In Marathi | Ganpati Visarjan Caption

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स