कॉमेडी किंग कपिल शर्माने पुन्हा एकदा आपल्या शोमधू कमबॅक केलं आहे. त्याच्या कमबॅकनंतर त्याला पुन्हा एकदा लोकांचे प्रेम मिळाले. त्याचा शो लोकांनी नंबर 1 वर नेऊन पोहोचवला.पण आता मात्र कपिल शर्माला चांगलाच धक्का बसला आहे. टॉप 5 च्या यादीतून कपिल शर्माचा शो बाहेर पडला असून त्याला मागे टाकत मालिका क्वीन एकता कपूरने बाजी मारली आहे. एकताच्या खालोखाल तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका आहे. पण या डेली सोपमध्ये कपिलच्या मालिकेला मात्र जागा मिळाली नाही.
Bigg Boss 2 च्या घरात बिचुकलेंना बाहेर काढण्याची मागणी
एकता कपूर ठरली नंबर 1
नुकताच BARC चा अहवाल आला आहे. या अहवालात TRP नुसार मालिकेचा नंबर ठरवला जातो. हा अहवाल सादर झाला असून या अहवालात एकता कपूर नंबर 1 असल्याचे समोर आले आहेत. एकता कपूरच्या मालिकांमध्येही स्पर्धा दिसून आली आहे. एकता कपूरची ‘कुंडली भाग्य’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल ‘कुम कुम भाग्य’ ही मालिका आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘सुपर डान्सर 3’, चौथ्या क्रमांकावर ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ पाचव्या क्रमांकावर ‘तुझसे है राबता’ ही मालिका आहे.पहिल्या 5 मध्ये कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या मालिकेचा समावेश नाही. त्यामुळे कपिलला एकताच्या मालिकेने मात दिली असे म्हणावे लागेल.
या मालिकेलाही नाही मिळाली जागा
सध्या जास्त चर्चा केली झालेली मालिका जर कोणती असेल तर ती म्हणजे कसौटी जिंदगी की 2 . आश्चर्याची बाब अशी की, या मालिकेचा इतका गाजावाजा केला की, ही मालिका पहिल्या 10 मध्येही आपली जागा निर्माण करु शकली नाही. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली नाही असेच म्हणावे लागेल. किंवा हिना खानने मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरला का असा प्रश्न आहे.
प्लास्टिकसर्जरी करण्यापूर्वी असे दिसत होते हे सेलिब्रिटी
तारक मेहताने पुन्हा घेतली जागा
सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून टीआरपीच्या रेसमधून खाली उतरली होती. या मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी अजूनही मालिकेत परतली नाही. ती न आल्यामुळे या मालिकेचा टीआरपी बराच घसरला होता. पण आता पुन्हा एकदा या मालिकेने जागा टॉप 5 मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षक पसंतीला उतरली आहे.
प्रियांकाला लागले गरोदरपणाचे वेध, फोटोतून दिला संकेत
कपिलसाठी कठीण काळ?
कपिलचा शो लोकांना आवडतो. यात काही वाद नाही. पण टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर असलेला हा शो अचानक इतका खाली कसा जाऊ शकतो हा प्रश्नच आहे. कपिल- सुनील वादानंतर कपिल आणि सुनील सगळे काही विसरुन कामाला लागले. या दोघांनी आपआपले शोज देखील काढले. पण सुनीलच्या शोची प्रेक्षक पसंती फार काही नव्हती.त्यामुळे त्याला शोचे लवकरच रॅप करावे लागले. कपिलने त्याच्या सगळ्या समस्यांमधून बाहेर येत पुन्हा एकदा शो सुरु केला आणि शोची चांगली पकडदेखील घेतली. पण आता घसरलेला टीआरपी पाहता कपिलला त्याच्या शो मध्ये बदल करावे लागतील. आणखी काही स्टँड अप कॉमेडीअनची त्याला गरज भासेल असे तरी यावरुन वाटत आहे.
पण सध्या या मालिकांमध्ये एकता कपूरच नंबर 1 ठरली असे म्हणावे लागेल.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje