Acne

Apple cider vinegar चा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य

Trupti Paradkar  |  Sep 10, 2019
Apple cider vinegar चा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य

स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही अनेकवेळा Apple cider vinegar वापरलं असेल मात्र तुम्हाला याचे तुमच्या सौंदर्यावर होणारे फायदे माहीत आहेत का ? अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि नितळ होते शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील येतो. शिवाय तुमच्या केसांच्या वाढीसाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी Apple cider vinegar अतिशय उपयुक्त  आहे. नियमित अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करून तुम्ही घरच्या घरी तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेऊ शकता. यासाठीच Apple cider vinegar चा असा वापर करा.

Shutterstock

डेली स्कीन केअर रूटीनसाठी

दिवसेंदिवस धुळ, माती आणि प्रदूषणाचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा थर जमा होत असतो. जो वेळीच स्वच्छ करणं गरजेचं असतं. असं न केल्यास तुमच्या त्वचेच्या आतील पोअर्स बंद होतात. यामुळे चेहऱ्याला ऑक्सिजनचा पूरवठा न झाल्याने तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. मात्र सौंदर्य तज्ञांच्या मते जर तुम्ही तुमचं डेली स्कीन केअर रूटीन व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर दिसू शकते. यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपताना तुमचा चेहऱ्यावर अॅपल सायडर व्हिनेगर लावून तुमच्या  त्वचेची काळजी घेऊ शकता.

पिंपल्स कमी करण्यासाठी

जर तुम्ही सकाळी उठल्यावर नियमित कोमट पाण्यात Apple cider vinegar घालून ते पाणी घेतलं तर याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ शकतात. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमची पचनसंस्था सुरळीत राहते. ज्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागते. 

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी

जर तुमच्या केसांमधील त्वचेला खाज येत असेल तर ती कमी करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. केसात कोंडा झाल्यामुळे तुमच्या त्वचेला खाज येते. यासाठी आधी केस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर केसांमधील पाणी काढून टाका. नंतर ओल्या केसांवर अॅपल सायडर व्हिनेगर लावा. पंधरा मिनीटांनी केस पुन्हा स्वच्छ धुवून टाका. महिन्यातून एक ते दोन वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा, खाज नक्कीच कमी होईल. 

शरीराला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी

Apple cider vinegar मुळे तुमच्या त्वचेचा पीएच बॅलंस संतुलित राहण्यास मदत होते. अंगाला येणारा घाम जीवजंतूंसाठी पोषक असतो. मात्र अंघोळीच्या पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब टाकल्यामुळे तुमच्या शरीरावरील घाम आणि धुळ स्वच्छ होऊ शकतो. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या शरीराला येणारा घाणेरडा वासही कमी होतो. यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये पाव चमचा Apple cider vinegar टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. अॅपल सायडर व्हिनेगर टाकलेल्या पाण्यात पाय बुडवून तुम्ही तुमचे पायदेखील स्वच्छ करू शकता. 

अॅपल सायडर व्हिनेगरचे उपयोग (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

Shutterstock

सनटॅन कमी करण्यासाठी

प्रखर सुर्यप्रकाशाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो.  पिकनिकला गेल्यावर साधं उन्हात फिरल्यामुळे तुमची त्वचा टॅन होते. मग टॅन काढून टाकण्यासाठी पार्लरमध्ये महागडे उपचार करावे लागतात. मात्र Apple cider vinegar तुमच्या त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या त्यात काही थेंब अॅपल सायडर व्हिनेगर टाकून कापसाच्या मदतीने ते तुमच्या हात, पाय आणि मानेच्या त्वचेवर लावा. सुर्यप्रकाशातून आल्यावर अंघोळीच्या पाण्यात  अॅपल सायडर व्हिनेगर टाकून अंघोळ केल्यामुळेदेखील तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.  

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!

दालचिनी’चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते

कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल

Read More From Acne