लाईफस्टाईल

आमचूर म्हणजे काय, आमचूर पावडरचा वापर आणि फायदे (Benefits Of Amchur Powder In Marathi)

Dipali Naphade  |  Jan 19, 2021
Benefits Of Amchur Powder In Marathi

घरगुती मसाल्याच्या स्वरूपात आमचूर पावडर (Amchur Powder) आपण नेहमीच पाहत आलो आहोत. आमचूर पावडर केवळ जेवणात स्वाद आणि सुगंधच देत नाही तर यामध्ये अनेक पोषक तत्वही असतात. आमचूर पावडर ही आरोग्यासाठीही उत्तम ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? आमचूर पावडरमध्ये अनेक तत्व असतात जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जेवण चविष्ट करण्यासह आमचूर पावडरचे अनेक फायदे आहेत. आम्ही या लेखातून आमचूर पावडरचे औषधीय गुण आणि याचे फायदे (Amchur Powder Benefits) तुम्हाला सांगणार आहोत. तसंच तुम्ही घरच्या घरी आमचूर पावडर कशी तयार करू शकता याचीही माहिती तुम्हाला यातून मिळेल. कारण आमचूर पावडर ही सहसा तुम्ही बाजारातून आणत असता. पण तुम्हला घरच्या घरीही आमचूर पावडर तयार करता येते. तत्पूर्वी आमचूर पावडर म्हणजे नक्की काय ते आपण जाणून घेऊया.

आमचूर पावडर म्हणजे काय ? (What Is Amchur Powder In Marathi)

Amchur Powder In Marathi

घरगुती मसाल्यांमध्ये आमचूर पावडरचा उपयोग केला जातो. ही आंबा सुकवून पावडर तयार करण्यात येते. आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट हे वेगळं. तसं तर बाजारामध्ये आमचूर पावडर आरामत मिळते. पण तुम्हाला हवं तर तुम्ही घरीही आमचूर पावडर तयार करू शकता. कच्च्या आंब्याच्या आतील भाग सुकवून तुम्हाला ही पावडर तयार करता येते. अनेक आशियाई देशांमध्ये पदार्थांमध्ये आंबटपणा आणण्यासाठी मसाला म्हणून याचा वापर करण्यात येतो. हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून याबाबत आपल्याला अधिक माहिती या लेखातून सांगण्यात आली आहे. केवळ जेवण चविष्ट बनविण्यासाठी नाही तर आमचूर पावडरचे अनेक फायदे आहेत.

आमचूर पावडरचे पोषक तत्व (Nutritional Value Of Amchur Powder In Marathi)

आमचूर पावडरचे फायदे

आमचूर पावडर ही कच्च्या कैरीपासून बनवली जाते. त्यामुळे यामध्ये असणारे सर्व पोषक तत्व आमचूर पावडरमध्येही सापडतात. आमचूर पावडर ही आरोग्यासाठी अत्यंत चांगली ठरते. प्रोटीन, फायबर, साखर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, सोडियम, जिंक, कॉपर, विटामिन सी, विटामिन ए, फॉलेट, थियामिन, विटामिन ई, विटामिन के, फॅटी अॅसिड यासारखी सर्व तत्व यामध्ये समाविष्ट असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून तुम्हाला जेवणातून सहजपणाने मिळतात. काही ज्युसमध्येही याचा वापर केला जातो. ज्युसचा स्वाद वाढविण्यासाठी आमचूर पावडरचा उपयोग होतो. 

आमचूर पावडरचे फायदे (Benefits Of Mango Powder In Marathi)

आमचूर पावडरचे अनेक फायदे आहेत. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे आपल्या शरीराला फायदे मिळतात. पण आमचूर पावडर हा कोणत्याही रोगांवरील उपाय नाही हेदेखील तुम्ही लक्षात ठेवा. यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. मात्र त्याचा प्रमाणापेक्षा अति उपयोग करू नका. आमचूर पावडरचे काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

Benefits Of Mango Powder In Marathi

आमचूरचा उपयोग तुम्ही वजन घटविण्यासाठी करू शकता. यामध्ये असणाऱ्या विटामिन सी चे प्रमाण आणि फायबर हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. एका शोधामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे विटामिन सी हे अत्यंत चांगले अँटिऑक्सिडंट असून वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसंच फायबरयुक्त पदार्थ असल्याने वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. आमचूर पावडरमध्ये हे दोन्ही पोषक तत्व असल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. सुक्या आंब्याचा वापर केल्यास वजन नियंत्रित करण्यास मदत मिळते असे एसीबीआयच्या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात तुम्ही जर आमचूर पावडरचा उपयोग केला तर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

कॅन्सरवर नियंंत्रण आणण्यासाठी

एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित एका शोधानुसार मँगीफेरीन नावाचे तत्व असते. जे कैरीच्या आतल्या भागात नाही तर त्याच्या सालामध्ये, पानामध्ये आणि झाडाच्या सालीमध्ये आढळते. कॅन्सरवर रोख लावण्यसाठी हे तत्व उपयुक्त ठरते. काही प्रमाणात तुम्हाला याची मदत मिळते. मात्र हा कॅन्सरवरील उपचार नक्कीच नाही. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आमचूर पावडरचे सेवन फायदेशीर ठरते. पण यावर डॉक्टरांचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे. 

मधुमेहासाठी उपयुक्त

Benefits Of Amchur Powder In Marathi

आमचूर पावडरचा वापर हा मधुमेहाच्या समस्येवर उपयुक्त ठरतो. मँगीफेरीन असल्यामुळे कॅन्सरसह हृदयसंबंधित आजार आणि मधुमेह यासारख्या आजारांवर याचा उपयोग करून घेता येतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती एक पर्याय म्हणून आमचूर पावडरच्या सेवनाचा उपयोग करून घेऊ शकता. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कारल्याच्या रसामध्ये आमचूर पाडवर घालून सेवन केल्यास, याचा उपयोग होतो. काही पदार्थांमध्येही याचा वापर करता येऊ शकतो.

डोळ्यांसाठीही गुणकारी

आमचूर पावडरचे फायदे

डोळ्यांसाठीही याचा फायदा होतो. वास्तविक एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित एका शोधानुसार, कैरीमध्ये बीटा कॅरेटिन नावाचे तत्व आढळते, जे अँटिऑक्सिडंट गुणांनी युक्त आहे. बीटा कॅरेटिनमुळ मोतीबिंदूचा धोका टळतो. मोतीबिंदू न होण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. तसंच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आमचूर पावडर अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र यावर अधिक शोधाची आवश्यकता आहे. डोळ्यांची खाज आणि काळजीवर घरगुती उपाय म्हणूनही आमचूर पावडर गुणकारी आहे.

पचन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना पचनक्रियेची समस्या उद्भवते. उशीरा जेवल्याने आणि फास्ट फूड खाल्ल्याने जेवणाचे पचन होत नाही. पण पचनाची समस्या दूर करायची असेल तर आमचूर पावडर हा अत्यंत उपयुक्त आणि रामबाण इलाज आहे. आमचूरमध्ये फायबरचे प्रमाण असते आणि फायबर हे पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी उत्तम आहे. तसंच तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तरीही तुम्ही आमचूर पावडरच्या सेवनाने ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू शकता. आमचूर पावडरच्या सेवनाने पोटातील गॅस निघून जाऊन पोट स्वच्छ करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते. त्यामुळे पचनप्रक्रिया नीट घडून त्रास होत नाही. 

हृदयाला ठेवते नीट

आमचूर पावडरचा उपयोग हृदय निरोगी ठेवण्यासाठी करता येतो. एका शोधानुसार उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगात सिद्ध झाले आहे की, रक्तमध्ये असणाऱ्या लिपीड वाढल्याने गंभीर हृदय रोगाची समस्या अर्थात धोका निर्माण होतो. रक्तातील लिपीड वाढण्याच्या स्थितीला हायपरलिपिडिमिया असं  म्हटलं जातं. हे कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. शोधानुसार आमचूरमध्ये अँटिहायपरलिपेमिक गुण आढळतात, जे सीरम कोलेस्ट्रॉल, वीएलडीएल आणि ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आमचूरच्या सेवनाने रक्तातील लिपीड अथवा कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोगाचे कारण ठरत असल्यास, तो धोका कमी होतो. 

एनिमियाची समस्या कमी करण्यासाठी

एनिमियाची समस्या अर्थात शरीरातीला लाल रक्तवाहिन्या कमी होणे. यामागे शरीरातील लोहाची कमतरता कारणीभूत असते. ही समस्या आमचूर पावडरच्या सेवनाने कमी होऊ शकते. आमचूर पावडरमधील लोहाची मात्रा एनिमियाची समस्या आणि घरगुती उपाय म्हणून उपयुक्त ठरते. शरीरामध्ये लोह नेहमी योग्य प्रमाणात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशी समस्या असेल तर तुम्ही आमचूर पावडरचे सेवन नित्यनियमाने करा.

स्कर्वीवरील उपचार

Benefits Of Amchur Powder In Marathi

स्कर्वी आजार हा विटामिन सी ची कमतरता शरीरामध्ये असेल तर होतो. तसं तर या आजारामध्ये हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा येणे आणि अंगामध्ये शक्ती न राहणे अशी लक्षणे दिसून येतात. आमचूर पावडरमध्ये विटामिन सी आढळते, जे शरीरामधील विटामिन सी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करते. या आधारानुसार आमचूर पावडरचा स्कर्वीसारख्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी उपयोग करून घेता येतो.

डिटॉक्सिफिकेशन

आंब्यामध्ये आढळणारे मँगीफेरीन हे तत्व औषधीय गुणांनी युक्त असते. ज्यामध्ये एक गुण असाही आहे जो आपल्या अँटिस्कॅवेजिंग गुणांच्या कारणामुळे मानवाच्या शरीराला विषारी प्रभावापासून वाचवते. अर्थात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि शरीर शुद्ध करण्यासाठी आमचूर पावडरचा उपयोग होतो. डिटॉक्सिफिकेशनसाठी हा चांगला पर्याय आहे. आंब्यातील हे गुण आमचूर पावडरमध्येही दिसून येतात.

अँटिबॅक्टेरियल गुणांनी युक्त

एनसीबीआयच्या शोधानुसार आंब्याचे विभिन्न भाग अर्थात आंब्याच्या आतील भाग, साल आणि मूळ इत्यादीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. याशिवाय यामध्ये अनेक खास तत्व असतात. तसंच यातील मँगीफेरीन अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव दर्शवतो. यामुळे शरीरामध्ये सूज आल्यास, तसंच काही लहानमोठ्या समस्यांवर अँटिबॅक्टेरियल गुण असल्याने याचा चांगला उपयोग होतो. याचा फायदा करून घेता येतो. 

आमचूर पावडर कशी बनवावी ? (How To Make Amchur Powder In Marathi)

Amchur Powder Benefits In Marathi

बाजारातून आणलेल्या गोष्टींपेक्षा घरी बनविलेले पदार्थ अधिक चांगले असतात. घरच्या घरी आमचूर पावडर तुम्हाला बनविण्याची पद्धत हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास याची कृती सांगत आहोत. तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने घरी आमचूर पावडर बनवू शकता 

आमचूर पावडरचा वापर कसा करावा (Use Of Mango Powder In Marathi)

आमचूर पावडरचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. याचे किती प्रमाण वापरायचे आहे तेदेखील आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. 

प्रमाण – सामान्यतः दिवसभरात तुम्ही एक चमचा अर्थात 10 ग्रॅम आमचूर पावडरचे सेवन करू शकता. वास्तविक प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार याचे  प्रमाण कमी जास्त  होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटिशियनचा सल्ला घेऊन याचे सेवन किती करायचे हेदेखील ठरवू शकता. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. आमचूर पावडरचा नक्की स्वाद कसा असतो ?

आमचूर पावडरचा स्वाद हा आंबट असतो. कच्च्या कैरीपासून तयार करण्यात आल्यामुळे याचा स्वाद आंबट असून यामध्ये कैरीचा स्वाद येतो.

2. गरोदर असताना आमचूर पावडर खाऊ शकतो का ?

गरोदर असलेल्या महिलांना पहिल्या तीन महिन्यात बऱ्याचदा कच्ची कैरी खावीशी वाटते असं म्हटलं जातं. वास्तविक आरोग्याच्या दृष्टीने हे किती फायदेशीर आहे याबाबत अजून कोणताही शोध अजून लागलेला नाही. पण आमचूर पावडरचे सेवन करण्याआधी गरोदर महिलांना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

3. आमचूर पावडर शरीरासाठी उष्ण आहे की थंड ?

आमचूर पावडर शरीरासाठी थंड आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

4. आमचूर पावडर कशी ठेवावी सुरक्षित ?

आमचूर पावडर तुम्हाला जर बराच काळ टिकवायची असेल तर ती कशा प्रकारे सुरक्षित ठेवायची याचीही तुम्हाला माहिती हवी. त्यासाठी तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये ही पावडर ठेवा. जेणेकरून याला हवा लागून यामध्ये दमटपणा येणार नाही. तसंच हा डबा ऊन अथवा दमट वातावरण असेल अशा ठिकाणापासून दूर ठेवा. तुम्हाला आमचूर पावडर हवी असेल तेव्हा तुम्ही मिसळण्याच्या डब्यामध्ये दोन ते तीन चमचे काढून घ्या आणि पुन्हा झाकून ठेवा. यामुळे आमचूर पावडर अधिक काळ टिकते आणि त्याचा स्वादही चांगला राहतो.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल