आरोग्य

बेबी कॉर्नचा आहारात असा करा समावेश होईल फायदा

Leenal Gawade  |  Oct 1, 2021
बेबी कॉर्न खाण्याचे फायदे

एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे.  या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्नचा आहारात नेमका कसा समावेश करायचा आणि त्याचे फायदे काय ते देखील जाणून घेऊयात

काहीतरी चटपटीत हवे असेल तर फरसाणपासून बनवा हे पदार्थ

बेबी कॉर्न खाण्याचे फायदे

Instagram

 बेबी कॉर्न एक्झॉटिक भाजी आहे असे म्हणताना त्याचे फायदेही भरपूर आहेत. हे आरोग्यदायी फायदे मिळणव्यासाठी तुम्ही याचा आहारात समावेश करायलाच हवा असे तुम्हाला वाटेल. 

  1. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त  असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. 
  2. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. 
  3. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते. 
  4. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बेबी कॉर्न हे फारच फायद्याचे असते. डोळ्यांच्या तक्रारी दूर करण्यासही बेबी कॉर्न मदत करते. 
  5. ह्रदयरोगासाठी बेबी कॉर्नही फारच फायद्याचे ठरते. त्यामुळे बेबी कॉर्न खायलाच हवे.

काळ्या मिरीचे पाणी देते शरीराला उत्तम फायदे, जाणून घ्या

असा करा बेबी कॉर्नचा समावेश

 बेबी कॉर्नचे फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारात समावेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा समावेश करु शकता.  बेबी कॉर्न कशा पदधतीने खायचे ते देखील खायचे ते देखील पाहुयात 

  1. बेबी कॉर्न उकडून त्यामध्ये मीठ- मसाला आणि चाट मसाला घालून सुद्धा खाता येतो. डाएटवर असणाऱ्यांना हेल्दी फुडचा पर्याय हवा असेल तर तुम्ही त्याचे बारीक तुकडे करुन त्याचा आहारात समावेश करा. 
  2. बेबी कॉर्नचे बारीक तुकडे करुन किंवा उभे काप करुन त्याला आरारुटमध्ये घोळवून त्याला स्टर फ्राय करुन घ्या. असे टॉस केलेले बेबी कॉर्नचे तुकडे तुम्हाला खाता येतील 
  3. जर तुम्हाला सूप प्यायला आवडत असतील तर तुम्ही मस्त सूप्स सुद्धा पिऊ शकता.
  4. बेबी कॉर्नची भाजी देखील तुम्हाला बनवता येतील. याची भाजी बनवताना तुम्हाला इतर काही गोष्टीही घालता येतील. ही भाजी चपाती आणि भाजीसोबतसुद्धा चांगली लागते.
  5. बेबी कॉर्नचा उपयोग करुन चाट देखील करता येऊ शकते. बेबी कॉर्न उकडून त्यामध्ये मस्त कांदा- टोमॅटो- चाट मसाला घाला. मस्त सर्व्ह करा. 


अशा पद्धतीने तुम्ही आहारात बेबी कॉर्नचा समावेश करा.

नारळाचे दूध आणि डेरी क्रिम काय आहे तुमच्या आरोग्यासाठी चांगले

Read More From आरोग्य