ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
फरसाणपासून रेसिपी

काहीतरी चटपटीत हवे असेल तर फरसाणपासून बनवा हे पदार्थ

 डाएट, फिटनेस असे कितीही करायचा विचार केला तरी आठवड्यातून एकदा तरी काहीतरी चटपटीत खावेसे वाटते.  डाएटला फारसा धक्का न देता जर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि हटके खायची इच्छा असे तर तुम्हाला फरसाणपासून काही खास आणि चटपटीत पदार्थ बनवता येतात. जे पदार्थ तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढवतात आणि तुमच्या रोजच्या टिपिकल पदार्थाला थोडा वेगळा टच देतात. आता तुम्हाला जर काहीतरी खायची इच्छा होत असेल आणि घरी फरसाण असेल तर तुम्ही अगदी हमखास हे पदार्थ बनवू शकता.

वडापावचे टेस्टी आणि मस्त प्रकार नक्की करा ट्राय

फरसाण भेळ

Instagram

फरसाणची भेळ हा असा पदार्थ आहे. जो अगदी आजारी माणसाच्या जीभेलाही चव आणतो. अशी ही मस्त फरसाण भेळची रेसिपी 

साहित्य: 1 वाटी फरसाण, ½ वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट आणि गोड चटणी, चाट मसाला,लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर 

ADVERTISEMENT

कृती:  एका मोठ्या बाऊलमध्ये फरसाण घेऊन त्यामध्ये चाट मसाला, कांदा, टोमॅटो आणि आवडीनुसार चटण्या घाला. वरुन लिंबू पिळून त्यावर कोथिंबीर भुरभुरा. तुम्हाला यामध्ये शक्य असेल तर यामध्ये काकडी देखील घालता येते. काकडीनेसुद्धा याला चांगली चव येते. ही भेळ मस्त लागते.

फरसाणची भाजी

Instagram

काहीतरी वेगळी भाजी खायची इच्छा झाली असेल तर शेवभाजेसारखी तुम्ही मस्त फरसाणची भाजी करु शकता ही भाजी देखील छान लागते. 

साहित्य: वाटीभर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, गरम मसाला, हळद, तिखट, मोहरी, कडीपत्ता,मॅगी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल

कृती:
एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरीची फोडणी घाला. आवडत असल्यास तुम्ही त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट  घाला. कडीपत्ता घालून त्यावर मॅगी मसाला घाला.
आच कमी करुन त्यामध्ये हळद, तिखट घालून त्यामध्य त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. टोमॅटो चांगला नरम झाला की, त्यामध्ये फरसाण घाला. आच मंद करुन झाकून ठेवा.  फरसाण छान नरम झालं की, त्यावर मस्त कोथिंबीर भुरभुरा. या सोबत भाकरी छान लागते. 

ADVERTISEMENT

चमचमीत दम आलू जो आणेल वाढवेल तुमच्या जेवणाचा स्वाद

चिझी फरसाण

Instagram

नाचोस असा पदार्थ आहे जो मॅक्सिकन आहे. पण आता त्याला थोडा इंडियन टच द्यायचा असेल आणि त्यापासून काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही चिझी फरसाण खाऊ शकता. 

साहित्य: 1 मोठी वाटी फरसाण, ½ वाटी मेल्टेड चीझ, ब्लॅक पेपर पावडर, कांदा- टोमॅटो-मिरची बारीक चिरलेली, चाट मसाला 

कृती:  
बाजारात मेल्टेड चीझ हा वेगळा प्रकार मिळतो. आधी चीझ मेल्ट करुन घ्या. सगळ्यात खाली फरसाण ठेवा. त्यावर मेल्टेड चीझ घाला. त्यावर बारीक- चिरलेला कांदा टोमॅटो- मिरची घाला. बरुन चाट मसाला घाला आणि हे मस्त फरसाण नाचोस इन्जॉय करा. 

ADVERTISEMENT

आता फरसाणपासून नक्कीच अशा काही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता.

मूगाच्या चविष्ट रेसिपीजनी जीभेचे पुरवा चोचले आणि वजन करा कमी

26 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT