आरोग्य

टाळी वाजवणे आरोग्यासाठी का आहे हितकारक

Trupti Paradkar  |  Mar 22, 2020
टाळी वाजवणे आरोग्यासाठी का आहे हितकारक

जगभरात सध्या कोरोना व्हायरच्या भितीने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन देशवासियांना केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी या काळात देशातील सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहकारी, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या, देशहितासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सर्व लोकांबद्दल टाळी आणि घंटानाद करून सायं ५ वाजता कृतज्ञता व्यक्त करण्याचे देखील आवाहनदेखील केले होते. या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत देशभरात जनता कर्फ्युचे शिस्तीत पालन करण्यात आले. शिवाय सायंकाळी पाच वाजता सर्वांनी एकमताने टाळ्या आणि घंटानाद करून देशहितासाठी कर्तव्य बजावणाऱ्या लोकांची कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांनी मिळून वाजवलेल्या या टाळ्या आणि घंटानाद देशभरात पसरलेल्या निराशाजनक वातावरणावर मात करणाऱ्या सकारात्मक विचाराची साक्ष देणाऱ्या ठरल्या. खरंतर  टाळी वाजवणे आणि घंटानादाचे महत्त्व अगदी पुराणकाळापासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पौराणिक काळापासून टाळी वाजवणे, शंखनाद करणे अथवा घंटानादाला धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व आहे. यासाठी टाळी वाजवण्याचे आरोग्यावर होणारे हे हितकारक फायदे जरूर जाणून घ्या.

टाळी वाजवणं आरोग्यासाठी आहे का हितकारक

अगदी पूर्वीपासून धार्मिक विधींसाठी पूजाअर्चा करताना टाळी वाजवणे अथवा घंटानाद करण्याची प्रथा आहे. मंदिरांमध्ये यासाठी आजही मोठ-मोठ्या घंटा गाभाऱ्यात अडकवण्यात येतात. पूजा अर्चा झाल्यावर देवाजवळ टाळी वाजवून अथवा  घंटानाद करून आरती म्हटली जाते. पूर्वीच्या काळी गावागावातून ढोल वाजवून अथवा दवंडी देऊन महत्वाच्या सूचना देण्यात येत असत. या सर्व गोष्टींना जितकं धार्मिक महत्त्व आहे तितकंच शास्त्रीय कारण देखील आहे. काही तज्ञ्जांच्या मते टाळी वाजवणे, शंखनाद, घंटानाद, ढोल यातून वातावरणामध्ये कंपने निर्माण होतात. सातत्याने केलेल्या या आवाजामुळे निर्माण होणारी कंपने पुढे मोठ मोठी होत संपूर्ण वातावरणात पसरतात. जेव्हा अशी कंपने सतत आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. तेव्हा यामुळे वातावरणाची शुद्धी होते. टाळी वाजवणे. घंटानाद, शंखनाद हे बऱ्याचदा एखाद्या धार्मिक विधीसाठी केले जातात. ज्यामुळे त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनेद्वारा पवित्र विचारांच्या विचारलहरीदेखील निर्माण होत असतात. विचार लहरी या सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे परिणाम दिसत नसले तरी मोठ्या प्रमाणावर होत असतात. सहाजिकच अशा गोष्टींमुळे वैचारिक पातळीवरदेखील वातावरणातात सकारात्मक बदल होत असतात.

टाळी वाजवण्याचे काय आहे महत्त्व –

टाळी वाजवण्यासाठी माणसाला त्याच्या दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. अभ्यासक सांगतात की, माणसाच्या तळहातावर संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारी अनेक अॅक्युप्रेशर पॉईंट असतात. टाळी वाजवताना हे पॉईंट्स आपोआप एकमेंकांवर आपटले जातात. ज्यामुळे नकळत तुमच्या हातांना अॅक्युप्रेशरचे उपचार मिळतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. या अॅक्युप्रेशर उपचारांमुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो.  शिवाय टाळी वाजवण्यासाठी माणसाला त्याच्या शरीरातील संपूर्ण ऊर्जेचा वापर करावा लागतो. ज्यामुळे त्याच्यामध्ये अचानक उत्साह संचारतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निरोगी राहण्यासाठी ही गोष्ट फायदेशीर ठरू शकते.

धार्मिक विधी आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम –

हिंदू संस्कृतीमध्ये घंटानाद आणि शंखनादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक चांगला गोष्टीला सुरूवात करण्याआधी शंखनाद करण्याची प्रथा आहे. ज्यामुळे प्रत्येकाच्या देवघरात घंटा आणि शंख या दोन गोष्टी असतातच. घंटा वाजवल्यामुळे संपूर्ण शरीर उत्साही होत असतं. त्याचप्रमाणे शंखनाद करण्यासाठी श्वासावर नियंत्रण आणि फुफ्फुसांना सक्रीय करावं लागतं. ज्यामुळे तुमची नकळत शारीरिक हालचाल आणि व्यायामदेखील होतो. टाळी, घंटानाद आणि शंखनाद केल्यामुळे वातावरणीतील अशुद्धता कमी होते आणि वातावरणात सकारात्मकता निर्माण होते. यासाठी दिवसभरात अती ध्वनी प्रदूषण न करता वैयक्तिक पातळीवर टाळी वाजवणे, शंखनाद अथवा घंटानाद करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

फोटोसौजन्य –

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

हात धुण्याची योग्य आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

हे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा

Read More From आरोग्य