निरोगी जीवन

जाणून घ्या जलनेतीची योग्य पद्धत, डोकेदुखी, सायनस होईल दूर

Trupti Paradkar  |  Jan 15, 2021
जाणून घ्या जलनेतीची योग्य पद्धत, डोकेदुखी, सायनस होईल दूर

 

योगासने, योगासने करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आणि योगासने करण्यापूर्वीची तयारी याला योगशास्त्रात खूप महत्त्व आहे. योगशास्त्रात नेहमी जलनेती टेकनिकचा सराव करण्याचा सल्ला दिला जातो. हा शरीर शुद्ध करण्याचा एक प्रकार आहे. जलनेती पाण्याने केली जाते. हे असं एक टेकनिक आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात. जलनेतीने  नाकातून केली  जात असल्यामुळे या टेकनिकमुळे तुमचे नाक आतून स्वच्छ होते. ज्यामुळे सर्दी, डोकेदुखी, सायनस, नाकातून पाणी वाहणे सारखे आजार त्रास कमी होतात. कारण नाकात जमा होणारी घाण या जलनेतीमुळे बाहेर टाकण्यास मदत होते. यासाठीच जाणून घ्या जलनेती म्हणजे काय, जलनेती करण्याची योग्य  आणि शास्ज्ञशुद्ध पद्धत, जलनेती केल्यामुळे आरोग्यावर होणारे फायदे. 

जलनेती म्हणजे नेमकं काय –

 

प्राचीन काळापासून भारतात योगाभ्यासाचा सराव केला जात आहे. जलनेती हे योगाभ्यासातील एक असं टेकनिक आहे ज्यामुळे तुमच्या नाक, डोके या अवयवांमधील आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. जल  म्हणजे पाणी आणि नेती म्हणजे स्वच्छता. नाक स्वच्छ करण्याचा हा एक प्राचीन प्रकार आहे. थोड्या सरावाने तुम्हाला जलनेती उत्तम प्रकारे करता येऊ शकते.

जलनेती करण्याची योग्य पद्धत –

 

जलनेती करण्यासाठी ही पद्धत नियमित आचरणात आणल्यास तुम्हाला जलनेतीचा सराव करणे सोपे जाईल.

जलनेतीचे फायदे –

 

जलनेतीमुळे तुमचे नाक स्वच्छ होते आणि अनेक आरोग्य समस्या कमी होतात.

डोकेदुखीचा त्रास कमी होतो –

 

आजकालच्या धकाधकीच्या काळात आणि सतत बदलत असलेल्या वातावरणात तुम्हाला डोकेदुखी नाही झाली तर नवलच. मात्र जलनेतीमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी नियमित जलनेतीचा सराव करावा.

सर्दी, खोकला कमी होतो –

 

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे नाकात इनफेक्शन झाल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला असे त्रास जाणवतात. वातावरणात असलेले धुळीचे कण नाकपुडीत अडकतात आणि श्वसनमार्गात इनफेक्शन होते. मात्र जलनेतीमुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. नाक स्वच्छ झाल्यामुळे श्नसनाच्या अनेक समस्या कमी होतात. ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा  त्रास सतत होत नाही.

सायनसचा त्रास कमी होतो –

 

डोळे, नाक, घसा आणि नाकपुड्या यामध्ये जमा झालेल्या अडथळ्यामुळे तुम्हाला सायनस, डोकेदुखी जाणवते. मात्र जलनेतीमुळे तुमच्या या अवयवांमधील अडथळे दूर होतात. ज्यांना सतत सायनसचा त्रास जाणवतो अशा लोकांनी नियमित जलनेती करावी.

डोळ्यांसाठी उत्तम –

 

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि दृष्टी तेजस्वी करण्यासाठी  तुम्ही जलनेती करू शकता. जलनेती केल्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या कमी होतात. ज्यांना रातआंधळेपणा, अधुंक दिसण्याचा त्रास असेल अशा लोकांनी जलनेती केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

Oil pulling एक आयुर्वेदिक ओरल थेरेपी

निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)

योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

 

Read More From निरोगी जीवन