केवडा हे असं फूल आहे ज्याचा सुगंध बऱ्याच जणांना आवडतो. पण त्याचबरोबर काही जणांना या सुगंधाची अलर्जीदेखील असते. पण केवड्याचा केवळ सुगंध हाच आपल्याला माहीत असतो. याचे बाकीचे फायदे आणि नुकसान याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. याचा उपयोग अत्तर, लोशन, तंबाखू, अगरबत्ती इत्यादी वस्तूंमध्ये सुगंधासाठी करण्यात येतो. तसंच केवड्यापासून पत्त्यांची चटई, टोप, पातेली इत्यादी गोष्टीही बनवण्यात येतात. केवडा प्रत्येक स्वरूपात उपयुक्त असतो. केवडा हा अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. वैशिष्ट्य म्हणजे केवड्याच्या तेलाने मालिश केल्यास, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या गाठी संपुष्टात येतात. केवडा फुलांची माहिती मराठीत तुम्हाला या लेखातून मिळू शकते.
Table of Contents
- केवडा म्हणजे नक्की काय (What Is Kewra In Marathi)
- केवड्याचे आयुर्वेदिक फायदे (Ayurvedic Benefits Of Kewra In Marathi)
- केवड्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Kewra In Marathi)
- केवड्याचे सौंदर्यासाठी फायदे (Beauty Benefits Of Kewra In Marathi)
- त्वचेसाठी केवड्याचे फायदे (Kewra Benefits For Skin In Marathi)
- केवड्याच्या पाण्याचा चेहऱ्यावर कसा वापर करावा (How To Use Kewra Water On Face In Marathi)
- केवडा कांतिवर्धक फेसपॅक (Kewra Radiant Facepack In Marathi)
- केसांसाठी केवड्याचे फायदे (Kewra For Hair In Marathi)
- केवडा अत्तर (Kewra As A Perfume In Marathi)
- खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये केवड्याचा उपयोग (Use Of Kewra In Food Items)
- केवड्याचे घरगुती उपाय (Kewra Home Remedies In Marathi)
- केवड्याने होणारं नुकसान (Side Effects Of Kewra In Marathi)
- केवड्यासंबंधी प्रश्न – उत्तर – FAQ’s
केवड्याच्या पाण्याचा चेहऱ्यावर कसा वापर करावा
खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये केवड्याचा उपयोग
केवडा म्हणजे नक्की काय (What Is Kewra In Marathi)
केवडा फुलाची माहिती मराठीत प्रत्येकाला हवी असते. तर केवडा हा एक सुगंधी वृक्ष आहे. साधारणतः हा वृक्ष घनदाट जंगलांमध्ये सापडतो. हा वृक्ष अतिशय उंच आणि घनदाट असून याची पानं ही काटेरी असतात. केवड्याच्या झाडांचे दोन प्रकार आहेत एक पांढरा आणि एक पिवळा. पांढऱ्या रंगाच्या फुलाला केवडा म्हणतात तर दुसऱ्या पिवळ्या रंगाच्या फुलाला केतकी असं म्हटलं जातं. केतकीचं फुल हे अतिशय सुगंधित असतं आणि त्याची पानंही अतिशय नाजूक असतात. तर केवड्याला अनेक नावं आहेत. केवड्याला गंधपुष्प, धूतिपुष्पिका, केंदा, केऊर, गोजंगी, केवर, नृपप्रिया इत्यादी अनेक नावांनी ओळखलं जातं.
ओडिसामध्ये केवड्याला फुलांचा राजा संबोधण्यात येतं. केवड्याचं झाड हे 18 फूट वाढतं आणि एका वेळी यावर 30 ते 40 फळं उगवतात. याचं फळ सुरुवातीला पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्यामुळे त्याला सफेद कमळ असंही म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये साधारणतः 12 हजार औषधीय वनस्पतींचा उल्लेख असून यामध्ये केवड्याचं नावदेखील आहे. आधुनिक शोध आणि संशोधनातून सिद्ध झालं आहे की, केवड्यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत, ज्याचा हात कोणीच धरू शकत नाही. आपण यावेळी या सुगंधी केवड्याचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊया.
केवड्याचे आयुर्वेदिक फायदे (Ayurvedic Benefits Of Kewra In Marathi)
- केवड्याच्या फुलापासून केवडा जल (Kewra Water) आणि केवडा तेल (Kewra Oil) बनवण्यात येतं, जे स्वादापासून आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींवर उपायकारक आहे
- केवडा जलचा उपयोग मिठाई, स्वीट सिरप आणि कोल्ड ड्रिंक्स इत्यादीमध्ये सुगंधाच्या स्वरूपात करण्यात येतो
याचा सुगंध मनाला एक प्रकारची शांतता मिळवून देतो - यामध्ये अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाला पसरवण्यापासून रोखतात
- केवड्याचं खास वैशिष्ट्य असं की, याच्या सेवनाने लगेचच संतुष्टता मिळते
- केवड्याच्या तेलाचा उपयोग आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. हे तेल तुम्ही डोकं दुखत असल्यास, तुमच्या डोक्यावर अथवा झालेल्या गाठींवर लावल्यास, असे आजार बरे होतात
- याच्या फुलामध्ये शरीराचं सौंदर्य वाढवणारे गुणदेखील आहेत
- केवड्याची पानं हे विषनाशक असतात. याचा वापर विषाचा परिणाम कमी करण्यासाठी होतो
- इतकंच नाही तर केवड्याच्या पानांचा उपयोग हा खाज, कुष्ठरोग, ल्यूकोडर्मासारख्या आजारांवरील उपचारासाठीही करण्यात येतो. यासाठी तुम्ही केवड्याची पानं वाटून घ्या आणि याचा लेप तुमच्या त्वचेवर लावा. हे लेप तुमच्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे
- केवड्याची पानं पाण्यात उकळून काढा बनवा. हा काढा रोज प्यायल्यास, तुम्ही रोगमुक्त राहू शकता
केवडा शरीर, वायू आणि वातावरणदेखील सुवासित करण्याचं काम करतं
केवड्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Kewra In Marathi)
डोकंदुखीसाठी फायदेशीर
डोक्यामध्ये कितीही दुखत असेल तरीही केवड्याचं तेल वापरल्यानंतर तुमची डोकेदुखी काही मिनिटांमध्येच दूर होईल. होय हे खरं आहे. त्यासाठी तुम्हाला केवड्याच्या तेलाने मालिश करण्याची गरज आहे. यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. केवडा फुल हे जसे उपयुक्त ठरते तसंच तेलही उपयुक्त आहे. केवडा फुलाची माहिती मराठीत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच मिळते.
तापामध्ये फायदा
तापादरम्यान तुम्हाला शरीरामध्ये जास्त थकवा जाणवायला लागतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला जास्त आजारी समजता. अशावेळी तुम्ही केवड्याचा रस साधारण 40 ते 60 मिलीलीटर घेऊन तो प्या. त्यामुळे तुमचा ताप तर उतरेलच पण तुमच्या शरीराचा थकवाही निघून जाईल.
सांधेदुखीपासून आराम
केवड्याचा अर्क शरीराच्या कोणत्याही भागावरील त्रास कमी करतं. विशेषतः तुम्हाला सांधेदुखीलचा त्रास असेल तर याचा जास्त उपयोग होतो. रोज केवड्याचं तेल घेऊन तुम्ही गुडघ्याला मालिश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळेल. तसंच तुम्हाला गाठी झाल्या असतील तर त्यावरदेखील याचा चांगला परिणाम होतो.
मासिक पाळीत होतो फायदा
कोणत्याही महिलेला सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पाळीच्या दिवसात रक्तस्राव होत असल्यास अर्थात हेव्ही फ्लो होत अससल्यास केवडा पाण्यात उगाळून घालावा आणि त्यात थोडी साखर घालून प्यायला द्यावं. यामुळे मासिक पाळीत जास्त होणारा रक्तस्राव कमी होतो.
पोटासंबंधित आजार
पोटासंबंधित आजारी लोकांसाठी केवडा खूपच फायदेशीर आहे. याचा उपयोग पोटामध्ये होत असेलली जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटिंग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तणाव करता येतो दूर
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केवडा तणाव दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. वास्तविक केवड्याच्या पानांमध्ये अँटीस्ट्रेस एजंट आढळतात जे आपल्या तणाव आणि मानसिक असंतुलन सांभाळण्यास मदत करतात. त्याशिवाय याचा सुगंध मानसिक आराम मिळवून देतो.
कॅन्सरपासून बचाव
बऱ्याच शोधांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, केवडा हा कॅन्सरवर उपायकारक आहे. केवड्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे कॅन्सरसारख्या प्रदीर्घ आजाराशी झुंज देण्यास केवडा मदत करतो. त्यामुळे केवडा हा कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
भूक वाढवण्यासाठी
बऱ्याच जणांना भूक न लागण्याचा आजार असतो. तर अशावेळी डॉक्टरकडे जाण्याआधी तुम्हाला घरगुती उपाय म्हणून केवड्याचा वापर भूक वाढवण्यासाठी करता येऊ शकतो. केवड्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच भूकेमध्ये वाढ झाल्याचं जाणवेल.
केवड्याचे सौंदर्यासाठी फायदे (Beauty Benefits Of Kewra In Marathi)
केवडा एक पारदर्शक तरल पदार्थ आहे. जो गुलाबपाण्याप्रमाणे असतो. केवड्याचं पाणी हे नेहमी आपल्या त्वचेसाठी एक फ्लेवरिंग एजंट स्वरूपात चांगला उपाय मानलं जातं. केवड्यात उत्कृष्ट अँटीऑक्सीडंट गुण आढळतात. गुलाबपाण्याप्रमाणे केवड्याचं पाणीदेखील त्वचेसाठी चांगलं आहे. केवड्याचा वापर त्वचेला चमकदार, मुलायम आणि डागविरहित करण्यास मदत करतो. जाणून घेऊया केवड्याचे सौंदर्यासाठी नक्की काय फायदे होतात –
त्वचेसाठी केवड्याचे फायदे (Kewra Benefits For Skin In Marathi)
- केवडा एखाद्या क्लिंझरप्रमाणे काम करतो आणि त्वचेमधील घाण आणि अशुद्ध गोष्टी काढण्यासाठी केवडा उपयोगी ठरतो. अतिशय कुशलतेने चेहऱ्यावरील घाण केवडा काढून टाकतो
- एक चांगल्या टोनरच्या स्वरूपातही केवड्याचा उपयोग होतो
- त्वचेवरील ओपन पोअर्स केवड्यामुळे बंद होतात
- चेहऱ्यावरील चमक वाढवण्यास उपयोगी
- केवड्यामध्ये असलेल्या अँटीएजिंग गुणामुळे त्वचेला पोषण मिळतं. यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळापर्यंत तरूण राहते.
- केवड्याचं पाणी कमी बटेजमध्ये तुम्हाला तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम मिळवून देतं
- केवड्याच्या पाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स घालवण्याचं काम यामुळे होतं.
केवड्याच्या पाण्याचा चेहऱ्यावर कसा वापर करावा (How To Use Kewra Water On Face In Marathi)
केवड्याच्या पाण्याला एक उत्तम क्लिंन्झर म्हटलं जातं जे तुमच्या चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये जमा झालेलं अतिरिक्त तेल आणि घाण घालवण्यासाठी मदत करतात. तसंच चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फंगस रोखण्यासाठी मदत करतं. केवड्याच्या पाण्याचा वापर तुम्ही गुलाबपाण्याप्रमाणेदेखील करू शकता. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही याचा उपयोग टोनरप्रमाणे करू शकता. तसंच तुम्ही फेसपॅकमध्येही केवड्याच्या पाण्याचा उपयोग करू शकता.
वाचा – जास्वंदीचे फायदे (Benefits Of Hibiscus In Marathi)
केवडा कांतिवर्धक फेसपॅक (Kewra Radiant Facepack In Marathi)
केवडा कांतिवर्धक फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा भांडं बेसन, त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन चमचे ग्लिसरीन, एक चमचा वाटलेली हळद, एक चमचा केवडा जल, अर्धा चमचा दूध आणि 7-8 थेंब लिंबाचा रस मिसळून लेप करून घ्या. हे उटणं तुम्ही आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी लावा आणि नंतर सुकल्यावर आंघोळ करा. हे उटणं त्वचेच्या छिद्रामध्ये व्यवस्थित मिसळतं आणि नंतर अगदी सहजरित्या निघतं तसंच यामुळे तुमची त्वचा अगदी लोण्यासारखी मऊ होते.
केसांसाठी केवड्याचे फायदे (Kewra For Hair In Marathi)
केसांची समस्या दूर करण्यासाठी केवडा अतिशय उपयोगी आणि फायदेशीर आहे. हा केसांच्या बऱ्याचशा समस्येवरील उत्तम उपाय आहे. कोंडा घालवण्यासाठी केवड्याचं तेल घेऊन मालिश करा आणि 30 मिनिटांनंतर केस धुवा. यामुळे तुमच्या केसातील कोंडा निघूनच जाईल. तसंच केवड्याच्या फुलांचा अर्क तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांना लावल्यास, केस काळे करण्यास याची मदत होते.
केवडा अत्तर (Kewra As A Perfume In Marathi)
केवडा हे नैसर्गिक स्वरूपात अत्तर म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला कोणतंही परफ्यूम लावायंच नसेल तर केवळ केवडा तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. हे महागातलं महाग परफ्यूमच्या सुगंधालाही मागे सोडतं. केवड्याच्या परफ्यूमप्रमाणे याचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात केवड्याचं पाणी आणि 2 ते 3 मोगऱ्याची फुलं घालून आंघोळ करायची आहे. यानंतर पूर्ण दिवस तुमच्या शरीरातून केवड्याचा सुगंध येत राहील. वास्तविक केवडा हे अतिशय सुगंधी फूल आहे. याच्या अत्तराचा थंडावा नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराला थंडावा देतो. उन्हाळ्याच्या दिवसात केवड्याच्या पाण्याने आंघोळ केल्यास, शरीराची जळजळ कमी होते.
खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये केवड्याचा उपयोग (Use Of Kewra In Food Items)
केवड्याच्या पाण्याचा उपयोग भारतामध्ये विशेषतः उत्तर भाग आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स अथवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठी करण्यात येतो. खसचे सरबत केवडा जलाचा उपयोग केल्यामुळेच चवीला चांगलं होतं
रसगुल्ला, रस मलाई आणि अशा अनेक मिठाईमध्ये केवड्याच्या पाण्याचा उपयोग केला जातो. ज्यामुळे त्यात सुगंध आणि स्वाद या दोन्ही गोष्टी येत राहतात.
मुगल खाद्यपदार्थांमध्ये विशेषतः बिर्याणीवर केवड्याच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. यामुळे जेवणाला चांगला सुगंध येतो.
कसं करावं जतन?
केवडा साधारणतः थंड जागेवरच ठेवावा. तसंच सामान्य तापमानात कमीत कमी एक वर्ष आणि थंड ठिकाणी केवडा कमीत कमी 3 ते 4 वर्ष व्यवस्थित राहतो. फक्त लक्षात ठेवा की, ज्या बाटलीत तुम्ही केवड्याचं पाणी ठेवलं आहे त्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे हवा जाऊ देऊ नका.
केवड्याचे घरगुती उपाय (Kewra Home Remedies In Marathi)
- कोणाच्याही कानामध्ये दुखत असल्यास, केवड्याचं अत्तर त्याच्या कानामध्ये दोन थेंब घातल्यास, लगेच आराम मिळतो
- तुमच्या केसांमधून घामाचा दुर्गंध येत असल्यास, केवड्याच्या पाण्याचा हलकासा स्प्रे तुमच्या केसांवर करा
- गर्भवती महिलांनी आपल्या दुसऱ्या महिन्यापासून ते चौथ्या महिन्यापर्यंत केवड्याचं सेवन केल्यास, गर्भभात होण्याचा धोका संभवत नाही
- तुम्हाला जास्त प्रमाणात खाज येत असल्यास, त्या जागी केवड्याचं पाणी लावा. काही मिनिटांमध्येच तुमची खाज बंद होईल
- चेहऱ्यावरील डाग मिटवण्यासाठी विटामिन ई तेल वापरत असाल तर त्यामध्ये केवड्याचं तेलही मिक्स करा आणि चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी उठून चेहरा धुवा
- पाळीदरम्यान जास्त ब्लिडिंग होत असल्यास, गायीच्या दुधामध्ये 6 ग्रॅम केवडा उगाळून त्यामध्ये साखर मिसळा आणि सकाळ आणि संध्याकाळ हे पाणी प्या. ही समस्या लवकर बरी होईल
- केवड्याच्या पाण्याने आंघोळ केल्यास, घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते
- केवड्याच्या तेलाने मालिश केल्यामुळे तुमच्या कमजोर नसा मजूबत होतात आणि तुमचा थकवा निघून जातो
- रोज 2 ते 3 ग्रॅम केवडा उगाळून त्याची पावडर कोमट पाण्यातून घेतल्यास मधुमेह असणाऱ्या आजारी लोकांना फायदा होतो
- ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी केवड्याचं सेवन केल्यास, रक्तदाबाचा स्तर योग्य होतो
केवड्याचं तेल रोज कंबरेला लाऊन मालिश केल्यास, कंबरेच्या त्रासातून सुटका मिळते
केवड्याने होणारं नुकसान (Side Effects Of Kewra In Marathi)
केवड्याचा वापर आजच नाही तर अनादी काळापासून होत आहे. तसं तर जास्त लोकांना केवड्यामुळे काहीही नुकसान होत नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नाही. त्याचप्रमाणे प्रमाणात केवड्याचाही वापर करावा. जास्त प्रमाणात केवडा वापरल्यास, याचा सुगंध येत राहातो आणि त्यामुळे डोकेदुखी होण्याची शक्यता असते.
केवड्यासंबंधी प्रश्न – उत्तर – FAQ’s
प्रश्न – केवड्याचा स्वाद कसा असतो?
उत्तर – केवड्याचा स्वाद हा गुलाबपाण्याप्रमाणे असून थोडासा रसरशीत असतो. याचा उपयोग पाण्यामध्ये फ्लेवरसाठी करण्यात येतो. तसंच याचा स्वाद थोडा गोड आणि तितकाच थोडासा खारटसर असल्यामुळे सहसा याचा वापर पक्वान्नामध्ये करण्यात येतो.
प्रश्न – बिर्याणीमध्ये केवडा जल कसं मिसळलं जातं?
उत्तर – एका मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ पसरून त्यात चिकन घालावं आणि त्यानंतर कोथिंबीर आणि मसाले गार्निश करून झाल्यावर, वरून केवडा जल मिक्स करावं. असं केल्यास, त्याचा सुगंध व्यवस्थित मिक्स होतो.
प्रश्न- केवडा सिरप कसं बनवतात?
उत्तर – घरच्याघरी केवडा सिरप बनवण्यासाठी एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात साखर मिसळून घ्या. त्यावरून लिंबाचा रस त्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर ते उकळवा. आता यामध्ये केवडा इसेन्सचा वापर करा आणि पाणी थंड होऊ द्या. आता हे मिश्रण थंड झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवा आणि तुम्हाला हवं तेव्हा याचं सरबत तयार करा.
पुढे वाचा –
Home Remedies of Kewra in Hindi
फोटो सौजन्य – Shutterstock