DIY सौंदर्य

केवळ लिंबाचे फळच नव्हे तर लिंबाच्या झाडाची पानेही आहेत उपयुक्त

Vaidehi Raje  |  Apr 6, 2022
benefits of lemon leaves

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले लिंबू हे सर्व पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे आणि अनेक आजारांशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावते. त्वचेसाठी लिंबाचा वापर आणि लिंबाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. लिंबामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक हानिकारक जंतूंविरूद्ध शरीराचे संरक्षण करतात. त्याचप्रमाणे लिंबाच्या पानांमध्येही उत्कृष्ट पोषक गुणधर्म असतात. लिंबाची पाने अनेक संसर्गजन्य रोग बरे करू शकतात आणि आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. तसेच मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी, निद्रानाश, दमा आणि अँझायटीसाठीही लिंबाच्या पानांचा फायदा होतो. जाणून घ्या लिंबाची पाने वापरून त्वचेची काळजी कशी घेता येईल. 

लिंबाची पाने एक नैसर्गिक क्लीन्झर

Lemon Leaves For Skin

लिंबाच्या पानांचा अर्क वापरून आपण बाम किंवा मलम तयार करू शकतो आणि वातावरणामुळे होणाऱ्या तणावापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.  लिंबाच्या पानांचा अर्क हे एक नैसर्गिक क्लिन्झर आहे त्यामुळे त्याचा अनेक उत्पादनांमध्ये वापर केला जातो. कधी कधी कोरफड आणि पुदीना यांच्याबरोबर संयोग करून लिंबाच्या पानांचा सौंदर्य उत्पादनांमध्ये वापर होतो. लिंबाच्या पानांचा अर्क त्वचेचा दाह शांत करतो. म्हणूनच अनेक  लोशन्समध्येही लिंबाचा झाडाच्या अर्क वापरला जातो. मधमाश्या, फुलपाखरे आणि डास यांसारख्या कीटकांपासून बचाव करण्यासाठी लावल्या जाणाऱ्या रिपेलेंट लोशनमध्ये लिंबाच्या पानांचा अर्क देखील वापरला जातो. लिंबाच्या पानांचा अर्क किंवा लेमन बाम आंघोळीचा साबण आणि प्रसाधनगृहांमध्ये रिफ्रेशिंग अनुभव देण्यासाठी वापरला जातो. असे बहुगुणी लिंबाचे बरेच फायदे आहेत.


मुरुमांसाठी फायदेशीर लिंबाची पाने 

Lemon Leaves For Skin

लिंबाच्या झाडाचा अर्क, मुख्यतः लिंबाच्या पानांचा अर्क, मुरुम आणि त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. लिंबाच्या पानांचा अर्क शरीरावरील डाग कमी करण्यासाठी आणि जखमांचे व्रण कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. मुलतानी मातीच्या फेसपॅकमध्ये लिंबाचा अर्क वापरल्यास त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा उजळते. लिंबाच्या पानांचा अर्क काढून तो पाण्यात डायल्युट करून त्याचा बर्फ बनवता येतो. या बर्फाचे तुकडे  त्वचेसाठी नैसर्गिक हायड्रेटर्स म्हणून काम करतात जे त्वचेला अधिक प्रभावीपणे ताजेतवाने करतात. तसेच त्वचेला खाज सुटली असेल तर किंवा दाह होत असेल तर लिंबाच्या पानांचा अर्क तुळशीच्या रसात मिसळून हे मिश्रण उन्हात वाळवून मग त्याचा लेप करून लावल्यास त्वचेला येणारी खाज व दाह शांत होतो तसेच हा लेप मुरुमांवर देखील फायदेशीर आहे.

चेहेऱ्यावर ग्लो येण्यासाठी फायदेशीर 

अंड्याचा पांढरा बलक, लिंबाचा रस आणि लिंबाच्या पानांचा अर्क यांचे मिश्रण हा उत्कृष्ट फेस मास्क आहे जो चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत करतो. लिंबाच्या पानांचा अर्क आठवडाभर रात्री झोपताना चेहेऱ्याला लावल्यास पोअर्स स्वच्छ होतात आणि त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. लिंबाची पाने आणि त्यांचा अर्क कोणत्याही त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु असा वापर सावधपणे करायला हवा. पानांचा अर्क आधी त्वचेच्या छोट्याश्या पॅच वर लावून बघावा. तुमच्या त्वचेला त्याचा काही त्रास झाला नाही तरच या अर्काचा वापर करा.  

तज्ज्ञांच्या मते, लिंबाच्या पानांमध्ये न्यूट्रिएंट्स ए सोबतच अँटी-स्पास्मोडिक गुणधर्मही आढळतात. लिंबाच्या पानांचा रस निद्रानाश, अस्वस्थता आणि हृदयाचे जलद ठोके यांसारखे आजार बरे करण्यास मदत करतो. जर तुम्ही 10-12 लिंबाची पाने पाण्यात उकळून ते गाळून चहासारखे प्यायले तर तुमच्या अस्वस्थतेची समस्या दूर होण्यासोबतच झोप न येण्याची समस्याही सहज दूर होईल. लहान मुलांमध्ये पोटात जंत होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोटात जंत असल्याने कधी कधी पोटात खूप दुखते. अशा वेळी जर लिंबाची पाने बारीक करून त्याचा रस मधात मिसळून रोज प्यायला तर पोटातील जंत निघून जातील आणि त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्याही दूर होतील.

तर असे लिंबाच्या झाडाच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य