लाईफस्टाईल

शिवाला का प्रिय आहे महामृत्यूंजय मंत्र, घ्या जाणून

Leenal Gawade  |  Feb 28, 2022
महामृत्यूंजय मंत्राचे महत्व

 आज महाशिवरात्रीचा शुभ दिवस… हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप जास्त महत्व आहे. शिवरात्र आणि महाशिवरात्र यामध्ये फरक आहे. आज आपण जी साजरी करतोय ती महाशिवरात्र…शिवाला प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी शिवभक्तांना नक्कीच माहीत असतील. महाशिवरात्र अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी खास जत्रा देखील आयोजित केली जाते. महिला पूजा करण्यासाठी खास शिवमंदिरात जातात. दूधाचा अभिषेक करतात आणि देवाची मनोभावे पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का शिवाला महामृत्यूंज मंत्र हा तितकाच प्रिय आहे. महामृत्यूंजय मंत्राचे महत्व नेमके काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया या महामृत्यूंजय मंत्रामुळे तुमच्या आयुष्यात नेमका काय बदल घडून येईल ते.

महामृत्यूंजय मंत्राचे फायदे

महामृत्यूंजय मंत्राचे महत्व

महामृत्यूंजय मंत्रातच त्याची ताकद दडलेली आहे. मृत्यूच्या अकाल भीतीने तुम्ही ग्रासलेले असाल तर तुम्हाला आधार देण्याचे काम महामृत्यूंजय मंत्र करते. म्हणूनच खूप वेळा भय घालवण्यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जाप करणे गरजेचे असते. 

 ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।

या मंत्राची ताकद अशी ही याचे उच्चारण केल्यानंतर एखाद्या मरणाऱ्या व्यक्तिलाही जीवनदान मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे अनेक व्याधींपासून आणि मरणाच्या भीतीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही महामृत्यूंजय मंत्राचा जाप नक्कीच करायला हवा. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत हा दिवस तुम्ही साजरा करायला हवा.

असा करा या मंत्राचा जप

महामृत्यूंजय मंत्र

महामृत्यूंजय मंत्र आणि शिवाची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तुम्ही याचे नियमित पठण करायला हवे. या मंत्रामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होण्यास मदत मिळेल. पण या मंत्राचा जाप करण्यासाठी तुम्ही काही नियम पाळायला हवेत.

  1. कोणत्याही मंत्राचा जाप करताना तुम्ही त्याचा उच्चार स्पष्ट असा करायला हवा. तरच त्यातून तुम्हाला अधिक फायदा मिळण्यास मदत मिळू शकते. 
  2. मंत्राचे उच्चारण करणे किंवा देवाची पूजा करण्यासाठी मन आणि शरीर शुद्ध असायला हवे. मनात द्वेष घेऊन आणि इतरांचा विचार करुन जर तुम्ही मंत्रोच्चार केला तर त्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास मन स्वच्छ आणि शरीर स्वच्छ करुन या मंत्राचा जाप करायला हवा. 
  3. जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ घेऊन हा मंत्र जाप करता आला तर फारच चांगले. तुम्ही हातात रुदाक्षाची माळ घ्या आणि मंत्र जाप करा.  रुद्राक्ष हे शंकराला फार प्रिय आहे. त्यामुळे ती माळ जवळ असायलाच हवी. 

आता नक्की करा महामृत्यूंजय मंत्राचा जाप आणि मिळवा फायदेच फायदे. 

Read More From लाईफस्टाईल