Fitness

लसूण आणि कांद्याच्या सालांचा असा करा उत्तम वापर

Aaditi Datar  |  Nov 8, 2019
लसूण आणि कांद्याच्या सालांचा असा करा उत्तम वापर

चहा उकळून झाल्यावर त्याचा चोथा अनेकजण कुंड्यामध्ये खत म्हणून वापरतात. बरेचदा आपण भाजीची सालं किंवा कांद्या लसणीची सालं खत म्हणून वापरतो. पण तरीही आपल्यापैकी बऱ्याच जणी कांदा आणि लसूण सोलून झाल्यावर त्याची सालं फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का, ही सालंसुद्धा किती फायदेशीर आहेत ती. या सालांमध्ये आढळणारी पोषक तत्त्व तुमचं इम्यून सिस्टम मजबूत करतात. तसंच कॉलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात आणतात. पाहा कसा वापर करता येईल लसूण आणि कांद्याच्या सालांचा. 

Instagram

तांदूळ शिजवताना लसूण न सोलता त्याचा वापर तुम्ही त्याची चव वाढवण्यासाठी करू शकता. तसंच भात शिजल्यावर लसणाची सालं त्यात ठेवल्यास छान फ्लेवर येतो. 

लसूण आणि कांद्याची सालं सूप बनवताना घातल्यास सूपला उत्तम चव येते. तुम्ही सूप तयार झाल्यावर ही सालं गाळून घेऊ शकता. यामुळे जास्त प्रमाणात शरीराला पोषक तत्त्वं मिळतात. 

लसूण आणि कांद्याची सालं भाजून त्याची पावडर करा. याचा वापर तुम्ही जेवण बनवताना चव वाढवण्यासाठी करू शकता. या पावडरचा वापर सलाडवर घालून खाण्यासाठीही करू शकतो. बाजारात मिळणाऱ्या पावडरपेक्षा तुम्ही घरी बनवलेली ही पावडर वापरणं कधीही चांगलच. 

कांद्याच्या सालांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात. पॅनमध्ये एक कप पाणी आणि कांद्याची सालं उकळून घ्या. हे पाणी इतकं गुणकारी असतं की, यामुळे कोलोन कॅन्सरसारख्या आजारांपासूनही शरीराचा बचाव होतो. 

कांद्यात सल्फर असतं जे केसांसाठी फायदेशीर असतं. त्यामुळे कांद्याची सालं चार ते पाच कप पाण्यात उकळून घ्या. केसांना शँपू करून झाल्यावर मग या पाण्याने धुवा. 

कांद्याची सालं आणि चहाची पावडर पाण्यात उकळून घ्या. हे पाणी गाळून घ्या. हा चहा पिताच मेंदूचा क्षीण दूर होतो आणि झोपही चांगली लागते.

पायाला जर खाज येत असेल तर कांदा आणि लसणीची सालं पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात काही वेळ पाय घालून बसा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

वाचा – कांद्याचे फायदे , आरोग्य आणि सौंदर्यासाठी

मग तुम्हीही पुढच्या वेळेला कांदा किंवा लसूण सोलून झाल्यावर त्याची सालं फेकून देता त्याचा असा चांगला उपयोग करू शकता.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

शास्त्र सांगतं की, रात्री खाऊ नका हे पदार्थ

चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका ‘या’ गोष्टी

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स

चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

Read More From Fitness