आरोग्य

प्रतिकारशक्ती वाढवता येईल ओरेगॅनोने, जाणून घ्या अधिक फायदे – Benefits Of Oregano In Marathi

Dipali Naphade  |  Jul 13, 2020
oregano meaning in marathi

ओरेगॅनो हे एक अतिशय गुणकारी वनस्पतीमध्ये मोडते. याचा वापर अनेक ठिकाणी आयुर्वेदिक उपचारासाठी करण्यात येतो. या वनस्पतीचा उपयोग हा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी करण्यात येतो. ओरेगॅनोची पानं आणि ओरेगॅनोचे नक्की आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात ते आपण या लेखातून पाहणार आहोत. काही समस्यांवर ओरेगॅनो कशा प्रकारे फायदेशीर ठरते ते पाहणार आहोत. अर्थात कोणत्याही आजारावर पूर्ण उपचार करण्यासाठी ओरेगॅनोचा उपयोग होत नाही. पण घरगुती उपचारांसाठी मात्र तुम्ही त्याचा वापर नक्कीच औषध म्हणून करू शकता. वैद्यकीय उपचार मिळण्याआधी काही घरगुती उपाय म्हणून तुम्ही काही आजारांवर ओरेगॅनोचा वापर नक्कीच करू शकता. याचे अधिक फायदे काय आहेत आणि ओरेगॅनोचा वापर नक्की कशा प्रकारे करण्यात येतो ते आपण यातून जाणून घेऊया. 

ओरेगॅनो म्हणजे काय? (Oregano Meaning In Marathi)

Meaning Of Oregano In Marathi

ओरेगॅनो एक वनस्पती असून याच्या पानांचा खाण्यामध्येही उपयोग करण्यात येतो. ओरेगॅनोचे झाड हे साधारण एक ते तीन फूटांपर्यंत उंच असते. दिसताना हे झाड तुळशी आणि पुदिन्याच्या झाडाप्रमाणेच दिसते. जगभरात साधारण 60 पेक्षा अधिक ओरेगॅनोच्या वनस्पतींचे प्रकार आढळतात. ज्याचा रंग आणि स्वाद हा ओरेगॅनोप्रमाणेच असतो. हे अतिशय गुणकारी झाड असून शारीरिक समस्यांपासून आराम मिळण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. याशिवाय याचा उपयोग पिझ्झा, पास्ता, सूप आणि सँचविडसारख्या पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठीही करण्यात येतो. वास्तविक पिझ्झा आणि पास्तामध्ये याचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. काही वेळा नुसत्या चटणी सँडविचबरोबरदेखील ओरेगॅनो खाल्ले जाते. यामुळे पदार्थांचा स्वाद वाढतो. विशेषतः इटालियन पदार्थांमध्ये याचा वापर होतो.

ओरेगॅनोचे प्रकार (Types Of Oregano In Marathi)

what is oregano in marathi

ओरेगॅनोचे बरेच प्रकार आहेत मात्र त्यामध्ये तीन मुख्य प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. आपण त्याविषयी अधिक जाणून घेऊया. 

ओरेगॅनोचे फायदे (Benefits Of Oregano In Marathi)

ओरेगॅनोचे अनेक फायदे आहेत. आतापर्यंत आपल्याला केवळ खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारा आणि स्वादाबद्दल माहिती होती. मात्र याचे शारीरिक फायदे नक्की काय आहेत ते आपण यातून जाणून घेऊया.

हृद्य निरोगी राखण्यासाठी (Healthy Heart)

Shutterstock

कार्डिओवस्कुलर समस्या ही सध्या एक प्रकारची क्रोनिक इन्फ्लेमेटरी परिस्थिती बनली आहे. ज्यामध्ये पेशींना निरोगी होण्यासाठी सामान्य वेळेपेक्षा अधिक वेळ लागतो. धुम्रपान, मधुमेह आणि इन्फ्लेमेशनमुळे ही अवस्था तयार होते. ओरेगॅनो इसेन्शियल ऑईलमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात जे इन्फ्लेमेशन आणि हृदय रोगाला थांबविण्याचे काम करते. तसंच यामध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणदेखील असतात, जे हृदय निरोगी राखण्याचे काम करते. त्यामुळे ओरेगॅनो नेहमी आपल्या खाण्यात असावे. 

कॅन्सरचा धोका करते कमी (Reduces The Risk Of Cancer)

ओरेगॅनोच्या पानांचा फायदा कॅन्सचा धोका कमी करण्यासाठी होतो. ओरेगॅनोमध्ये थायमॉल, कार्वाक्रॉल आणि काही अन्य अँटीकॅन्सर गुण आढळतात. हे कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखण्याचे काम करते आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्याचे काम करते. विशेषतः पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका टाळण्यासाठी ओरेगॅनोचा उपयोग करून घेता येतो. याचा प्रॉपॉपोटिक प्रभाव हा कॅन्सरच्या पेशी संपुष्टात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो आणि याच्या मदतीने धोका टाळता येतो. त्याशिवाय ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, घरगुती उपचारांनी कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होतो पण कॅन्सरवरील हा उत्तम उपाय नाही. त्यामुळे कॅन्सर झाला असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून योग्य इलाज करून घ्यायला हवा. 

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Boosts Immunity)

ओरेगॅनोच्या पानांचा फायदा आजारामध्ये लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी करता येतो. ओरेगॅनोमध्ये अनेक पोषक तत्व असतात. विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई चे प्रमाण यात आढळते. या तिन्ही विटामिन्सना प्रभावी अँटिऑक्सिडंट्स मानले जाते. हे विटामिन्स शरीरारातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच शरीरावरील फ्री रेडिकल्सचा प्रबाव कमी करण्यासाठी याचा फायदा होतो आणि पेशी त्याच्या प्रभावापासून वाचतात. यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यात ओरेगॅनोची पाने घालून उकळवा आणि त्या पाण्याचे सेवन करा. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

अपचनापासून मिळेल आराम (Relief From Indigestion)

oregano leaves meaning in marathi

ओरेगॅनोच्या इसेन्शियल ऑईलमध्ये बरेच बायोलॉजिकल गुण असतात. अँटिमायक्रोबियल, अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडेटिव्ह जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. आतड्याला नुकसान पोहचविणाऱ्या ई कोलाईसारख्या बॅक्टेरियाची संख्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याची मदत होते. याशिवाय आतड्यांचे इन्फ्लेमेश कमी करण्यासाठीही याची मदत होते. ज्यामुळे तुमची अपचनाची समस्या दूर होते आणि आराम मिळतो. ओरेगॅनोच्या इसेन्शियल ऑईलमध्ये असणारे अँटिऑक्सिडेटिव्ह गुण आतड्यांतील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी आणि आतड्यांना निरोगी राखण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्हाला एक कप पेपरमिंट अथवा लेमन टी मध्ये एक अथवा दोन थेंब ओरेगॅनो ऑईल घालून प्यायचे आहे. या प्रकाराने तुमचे ओरेगॅनो तेल अपचनाची समस्या कमी करण्यासाठी उत्कृष्ट ठरते.

अपचन होतंय तर करा झटपट घरगुती उपचार

पोटदुखी थांबविण्यासाठी (Stomach Ache)

बऱ्याचदा खाण्यापिण्यात काहीतरी वेगळं आल्याने पोटात दुखणे, कब्ज, बद्धकोष्ठ, अपचन,  फूड पॉईजनिंग आणि अन्य कारणांमुळे अधिक पोटदुखी होते. अशावेळी ओरेगॅनोचा वापर करून घेता येतो. ओरेगॅनोच्या इसेन्शियल ऑईलमध्ये मोनोटेरेपिक फिनॉल नावाचे एक घटक असते. जे पोटदुखी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात अथवा ज्युसमध्ये एक अथवा दोन थेंब ओरेगॅनो तेल घाला आणि ते  प्या. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 

सांधेदुखीपासून आराम (Relief From Joint Pain)

तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी ओरेगॅनो हे संजीवनीसारखे काम करते. ओरेगॅनोमध्ये कारवाक्रॉल नावाचे एक मोनोटेरेपिक फिनॉल कंपाऊंड असते. या कंपाऊंडमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात जे ऑस्टियोअर्थराईटिसच्या कारणामुळे होणारी सूज कमी करतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही ओरेगॅनोच्या पानांचा वापर चहा बनवून करू शकता. रोज सकाळी एक कप पाण्यात ओरेगॅनोची काही पानं उकळून घ्या आणि ते पाणी प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही ओरेगॅनोच्या इसेन्शियल ऑईलने सांध्यांना मसाजही करू शकता. 

सूज कमी करण्यासाठी (Reduce Swelling)

what is oregano called in marathi

ओरेगॅनोच्या फायद्याचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा आपण याचा फायदा म्हणजे यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणदेखील आढळतात आणि त्यासाठी याच्या तेलाचाही वापर केला जातो. एनसीबीआयद्वारे केलेल्या तपासात आढळून आले आहे की, या तेलाचा उपयोग त्वचेवरील सूज कमी करण्यासाठी होतो. इतकंच नाही तर यातील तत्वामुळे अल्सची सूजही कमी होते आणि जखम भरण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

मधुमेहासाठी ठरते फायदेशीर (Beneficial For Diabetes)

ओरेगॅनोच्या पानांचा फायदा हा मधुमेहासाठीही होतो. या पानांचा अर्क हा शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिनची वाढती पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच हे लिपिड मेटाबॉलिजमदेखील सुधारते आणि मधुमेहग्रस्त लोकांना किडनी आणि लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. 

ताप आणि खोकल्यावर गुणकारी (For Fever And Cough)

oregano meaning in marathi

खोकला, ताप आणि सर्दी याची लक्षणं कमी करण्यासाठीही ओरेगॅनोचा उपयोग करून घेता येतो. ओरेगॅनो इसेन्शियल ऑईलमध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लुएंझा गुण आढळतात जे कॉमन कोल्डची लक्षणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याबरोबरच ओरेगॅनोच्या वनस्पतीमध्ये अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुण आढळतात जे संक्रमणाचा फैलाव करणाऱ्या व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढाई करतात आणि ताप आणि खोकला कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. 

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय

अनिमियापासून सुटका (Get Rid Of Anemia)

शरीरातील आयरनच्या कमतरतेमुळे अनिमियाचा त्रास होतो. आयरन शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करते जे एक प्रकारचे प्रोटीन असते. अनिमिया असणाऱ्या लोकांना ओरेगॅनोच्या पानांचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये आयरन योग्य प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यास उपयोगी ठरते. त्यासाठी  सुकी पानं पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी प्या. 

हाडांच्या मजबूतीसाठी (Bone Strength)

ओरेगॅनोची पानं ही हाडांच्या मजबूतीसाठी लाभदायक ठरतात. हाडं निरोगी राखण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असतात. यामध्ये सर्वात पुढे असते ते कॅल्शियम आणि ओरेगॅनोच्या पानांमध्ये  कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. याशिवाया यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जिंक, कॉपर आणि मँगनीजचे प्रमाणही असते. यामधून ओरेगॅनोमधून हाडांना आवश्यक असणारे विटामिन सी, विटामिन ए आणि विटामिन के देखील मिळते. 

त्वचेसाठी फायदा (Beneficial For Skin)

meaning of oregano in marathi

त्वचेवर होणाऱ्या संक्रमणाचा प्रभाव कमी करण्यासाठी ओरेगॅनो इसेन्शियल ऑईलचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो. यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियाला संपुष्टात आणतात. तसंच यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि इम्यूनोमॉड्युलेटरी गुण असतात जे त्वचेला येणारी सूज कमी करतात. तसंच यामध्ये अँटी कॅन्सर गुणही असतात जे त्वचेचा कॅन्सर होण्याचा  धोका टाळतात. 

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

केसांसाठी ओरेगॅनोचा फायदा (Beneficial For Hair)

what is oregano in marathi

तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठीही तुम्ही ओरेगॅनोचा उपयोग करून घेऊ शकता. केसांसाठी याचा चांगला फायदा मिळतो. एका शोधानुसार ऑक्सिडेटिव्ह तणावाने केसगळती अधिक प्रमाणात गळतात. पण त्यावर ओरेगॅनो एक प्रभावी अँटिऑक्सिडंट्सप्रमाणे काम करते. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. केसगळती समस्या कमी करण्यासाठी तुम्ही ओरेगॅनोचा वापर करू शकता. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

ओरेगॅनोचा वापर कसा करावा? (How To Use Oregano)

what is oregano called in marathi

ओरेगॅनोचा वापर पुढीलप्रमाणे तुम्हाला करता येऊ शकतो 

त्वचेसाठी कसा करावा उपयोग (How To Use Oregano For Skin)

साहित्य 

कसे करावे 

केसांसाठी कसा करावा उपयोग (How To Use Oregano For Hair)

साहित्य 

कसे करावे 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. ओरेगॅनोच्या वापराने कफ निघून जातो का?

तुम्हाला अगदी साधारण  कफ झाला असेल तर ओरेगॅनोच्या  वापराने नक्कीच बरा होतो. ओरेगॅनो इसेन्शियल ऑईलमध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लुएंझा गुण आढळतात त्यामुळे कफ बरा होतो. 

2. ओरेगॅनोमुळे कोणता आजार बरा होतो?

सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी, अनिमिया, पोटदुखी यासारखे शारीरिक आजार ओरेगॅनोच्या योग्य वापरामुळे बरे होतात. 

3. ओरेगॅनोची पानं कच्ची खाता येतात का?

काही भाज्यांच्या स्वाद वाढविण्यासाठी ओरेगॅनोची पानं वापरण्यात येतात. तसंच ओरेगॅनोची पानं कच्चीही खाता येतात. पण तुम्हाला त्याचं प्रमाण माहीत असायला हवं. 

4. ताजे अथवा सुके कोणते ओरेगॅनो जास्त चांगले?

दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी जास्त चांगले कोणते हे सांगणे तसे तर कठीण आहे. पण तरीही ताज्या गोष्टी या अधिक चांगल्या असतात. 

5. ओरेगॅनो टी रोज पिऊ शकतो का?

दिवसातून एकदा तुम्ही हा चहा पिऊ शकता. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. त्याचप्रमाणे यांचही योग्य  प्रमाण राखा. 

6. ओरेगॅनोमुळे काही नुकसान होतं का?

गर्भवती  आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी ओरेगॅनो  खाऊ नये. पाळीच्या दिवसात जास्त रक्तस्राव होत असेल तरीही तुम्ही याचं सेवन करू नये. ओरेगॅनोचं अतिसेवन ब्लड शुगरची पातळी कमी करते. त्यामुळे योग्य प्रमाणात याचे सेवन करावे. 

7. ओरेगॅनो कसे सुरक्षित ठेवयाचे?

ओरेगॅनो अधिक काळ टिकवायचे असेल तर ते ओल्या कपड्यात लपेटून फ्रिजमध्ये ठेवा. तसंच तुम्ही त्याचेी पाने कापून एका हवाबंद डब्यात ठेऊन फ्रिजरमध्येही ठेऊ शकता. अथवा ओरेगॅनोची सुकी पानं तुम्ही हवाबंद डब्यात ठेऊ शकता. हे व्यवस्थित टिकून राहते. 

Read More From आरोग्य