चटणी, सरबताची चव वाढवणारा पुदिना आपल्या सगळ्यांच्याच आहारात असतो. पचनासाठी पुदिना हा उत्तम आहे. पण केसांसाठीही त्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण केसांसाठी पुदिन्याचे तेल कसे फायदेशरी ठरते ते जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुम्ही आतापर्यंत कडीपत्त्याचे तेल, खोबरेल तेल, जास्वंद तेल, बदामाचे तेल आणि विविध घटकांनी युक्त असे महाभृंगराज तेल असे तेलाचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे अनुभवले असतील. पण आता पुदिन्याच्या तेलाचे फायदे (Pudina Hair Oil) तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील असे आहेत. चला जाणून घेऊया पुदिन्याच्या तेलाचे फायदे आणि त्याचा वापर
असे बनवा पुदिन्याचे तेल
पुदिन्याचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला पुदिन्याची काही पाने लागतील. ही पाने तुम्हाला कोणत्याही आवडीच्या तेलात उकळून घ्यायची आहेत. पुदिन्याचे तेल बनवताना तुम्हाला बेससाठी तेल, तूप अशा गोष्टींचा वापर करावा लागतो. पुदिन्याचा अर्क त्यात उतरल्यानंतर मगच तुम्हाला ते तेल थंड करुन केसांना वापरता येते. अशाप्रकारे पुदिन्याचे तेल करुन तुम्ही जास्तीत जास्त काळासाठी स्टोअर देखील करुन ठेवू शकता. उन्हाळ्यात या तेलाचा उपयोग करुन केसांना छान मसाज केल्यामुळे केसांना थंडावा मिळण्यास मदत मिळते.
पुदिन्याचे तेल केसांसाठी आहे वरदान
पुदिन्यापासून तेल (Pudina Hair Oil) कसे बनवायचे हे जाणून घेतल्यानंतर त्या तेलाचे तुमच्या केसांसाठी नेमके काय फायदे असतात ते जाणून घेऊया.
- पुदिन्यामध्ये मिंथोल असते. ज्यामुळे थंडावा मिळण्यास मदत मिळते. ज्यांना झोप येत नसेल तर अशांनी अगदी हमखास पुदिन्याचे तेल लावायला हवे. त्यामुळे चांगली झोप मिळण्यास मदत मिळते. शिवाय डोकंही शांत होते.
- केसांमध्ये मॉईश्चर असेल तर केस हे अधिक चमकदार दिसतात. पुदिन्याचे तेल बदामाच्या तेलासोबत लावले तर आपल्याला त्याचे दुप्पट फायदे मिळतात. केसांना पोषण आणि चमक अशी दोन्ही मिळण्यास आपल्याला मदत मिळते.
- पुदिन्यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यासही मदत मिळते. ज्यांची स्काल्प कोरडी झाली असेल अशांनी हे तेल लावल्यामुळे केस स्वच्छ होण्यास फायदा मिळतो.
- पुदिन्याचे तेल लावून चांगला मसाज केल्यामुळे रिलॅक्स व्हायला होते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही आवडीच्या शॅम्पूने केस धुवून शकता.
- केसांच्या वाढीसाठीही पुदिना तेल खूपच फायद्याचे असते. पुदिना तेलाचा वापर केल्यामुळे केस गळती कमी होते. केसांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते.
- केसांना घाण वास येत असेल तर पुदिन्याच्या रिफ्रेशिंग वासामुळे केसांनाही चांगला वास येतो. केसांची दुर्गंधी घालवण्यासाठी पुदिना हा उत्तम आहे.
- केसांची क्वालिटी चांगली ठेवायची असेल तर पुदिन्याच्या तेलाचा आठवड्यातून एकदा तरी वापर करा.
आता केसांसाठी या उन्हाळ्यात नक्की पुदिन्याचे तेल बनवा आणि वापरा.