सौंदर्य

विटामिन ए क्लिंन्झरचे काय आहेत त्वचेसाठी फायदे

Dipali Naphade  |  Apr 28, 2022
benefits-of-vitamin-a-clenser-for-skin-in-marathi

आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहेच. पण अनेक जण याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. त्वचेची काळजी घेताना विटामिन ए असे एक पोषण आहे जे शरीरासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. याबाबत अधिक माहिती नाही. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो याबाबत आतापर्यंत माहिती होती. मात्र त्वचेसाठीही विटामिन ए चा फायदा होतो. विटामिन ए कमी असेल तर त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुमच्या त्वचेला अधिक चांगले हायड्रेशन मिळण्यासाठी तुम्ही विटामिन ए चा वापर करू शकता. तसंच विटामिन ए च्या वापरामुळे तुमची त्वचा अधिक तरूण राहते. तसंच विटामिन ए हे कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते. त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग काढण्यासाठीही विटामिन ए चा उपयोग होतो. तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये याचा समावेश नक्की करून घ्या. त्वचेच्या समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक आणि ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करू शकता. याबाबत अधिक माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. 

ऑर्गेनिक विटामिन ए फेस क्लिंन्झर (ORGANIC VITAMIN A FACE CLEANSER)

तुमच्या सौंदर्याच्या रूटिनमध्ये सर्वात पहिली स्टेप म्हणजे चेहरा स्वच्छ करणे. यासाठी तुम्ही ऑर्गेनिक फेस क्लिंन्झरचा वापर करू शकता. ऑर्गेनिक विटामिन ए फेस क्लिंन्झरध्ये ब्रोकोली आणि कोरफड या दोन्हीचा समावेश आहे. यामुळे तुमच्या त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत होते. तसंच तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि तुमचा स्किन टोन अधिक चमकदार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 100% ऑर्गेनिक असून क्रुएल्टी फ्री असे हे उत्पादन आहे. याशिवाय पॅराबेन मुक्कत, मिनरल ऑईल मुक्त हे उत्पादन आहे आणि याचा उपयोग कोणत्याही प्राण्यावर करण्यात आलेला नाही. कोरड्या आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी हे उपयुक्त ठरते. 

विटामिन ए फेस वॉश (ORGANIC VITAMIN A FACE WASH)

त्वचेची काळजी घेताना चेहऱ्यावरील घाण निघून जाणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही ऑर्गेनिक विटामिन ए फेस वॉशचा वापर करून घेऊ शकता. तुमच्या पोर्समध्ये साचलेली घाण काढण्यासाठी आणि तुमच्या त्वचेचे पीएच संतुलन सांभाळून ठेवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा मिळतो. तसंच यात असणारे विटामिन ए तुमच्या त्वचेवरील घाण काढून टाकण्यास मदत करते. साधारणतः कोरड्या आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी हे उत्पादन अत्यंत उत्तम ठरते. तसंच महिला आणि पुरूष दोन्ही व्यक्तींना हे उपयोगी ठरते. 

विटामिन ए शीट मास्क (ORGANIC VITAMIN A SHEET MASK)

तुमची त्वचा तुम्हाला क्लिन अर्थात स्वच्छ ठेवायची असेल तर तुम्ही शीट मास्कचा वापर करणेही आवश्यक आहे. तुमची त्वचा हायड्रेट करण्यसाठी तसंच अधिक चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. या विटामिन ए शीट मास्कमध्ये अँटीएजिंग घटक आहेत, जे तुमच्या रोजच्या स्किन रूटीनला उपयोगी ठरतात. तसंच त्वचेला चमक येण्यासाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होतो. 100% ऑर्गेनिक असून क्रुएल्टी फ्री असे हे उत्पादन आहे. 

विटामिन ए फेस टोनर (ORGANIC VITAMIN A FACE TONER)

पोर्स कमी करून ते टाईट करण्यासाठी आणि चेहरा क्लिंन्झिंग करण्यासाठी विटामिन ए फेस टोनरचा वापर करता येतो. पोर्समध्ये साठलेली घाण काढण्यासाठी तुम्हाला या टोनरचा वापर करता येतो. विटामिन ए तुमच्या त्वचेच्या आतील आणि बाहेरील घाण काढण्यास मदत करते. फेस टोनर हादेखील तुमच्या त्वचेच्या क्लिंन्झिंगचा एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही या ऑर्गेनिक उत्पादनाचा वापर करू शकता. 

ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करून तुम्ही विटामिन ए चा वापर करू शकता आणि तुम्हाला याचा त्रासही होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From सौंदर्य