DIY फॅशन

लग्नाच्या सीझनमध्ये रॉयल लुक देण्यासाठी वापरा बेंगलुरू सिल्क साडी

Dipali Naphade  |  Oct 1, 2021
bengaluru-silk-saree

लग्नाच्या कार्यात नक्की कोणती साडी स्टाईल करायची आणि साडी नेसण्यासाठी कोणत्या साडीची फॅशन फॉलो करायची असा प्रश्न नेहमीच महिलांच्या मनात येतो. सध्याचा ट्रेंड आहे तो सिल्क साड्यांचा (Silk Saree). अनेक कार्यक्रमांना आजकाल अभिनेत्रीदेखील सिल्क साड्यांचा वापर करताना दिसून येतात. पण या सिल्क साड्यांमध्येही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. सध्या अनेक लग्नांमध्ये आणि अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला बॉलीवूडमधील अभिनेत्रीही ज्या सिल्क साड्या नेसताना दिसत आहेत, त्या आहेत बेंगलुरू सिल्क साड्या (Bangalore Silk Sarees). या साड्या कार्यक्रमांमध्ये अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतात. अगदी दीपिका पादुकोणच्या लग्नातील बेंगलुरू सिल्क असो अथवा उत्सवामध्ये मराठी अभिनेत्रींनी नेसलेली असो. सर्वच साड्या दिसतात अधिक आकर्षक. तुम्हालाही लग्नाच्या या सीझनमध्ये रॉयल लुक हवा असेल तर नक्की बेंगलुरू सिल्क साड्यांची निवड करा आणि दिसा आकर्षक!

गोल्डन सिल्क साडी (Golden Saree)

लग्न हा खास दिवस असतो आणि त्यात प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावे असंच वाटतं. यासाठी तुम्ही जर रिसेप्शनसाठी साडी नेसणार असाल तर बंगलुरू गोल्डन सिल्क साडी (Banglore Golden Silk Saree) हा चांगला पर्याय आहे. अतिशय रॉयल वाटणारा लुक आणि त्याशिवाय सर्वांचे लक्ष वेधून घेणारे असे डिझाईन हे या साडीचे वैशिष्ट्य आहे. दीपिका पादुकोणनेदेखील तिच्या लग्नामध्ये हा लुक केला होता. तुम्हालाही असा लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच या साडीची निवड करू शकता. दाक्षिणात्य लग्नांमध्ये हा लुक अधिक दिसून येतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता अनेक महाराष्ट्रीयन लग्नातदेखील या साड्यांची स्टाईल करण्यात येते. तसंच हा लुक तुम्हाला अधिक चांगली आकर्षकता मिळवून देतो. 

बेंगलुरू साडीचा मॉडर्न आणि पारंपरिक लुक 

स्वतःचे लग्न असो अथवा आपल्या घरातील कोणते कार्य तुम्हाला पारंपरिक लुक आणि त्याचप्रमाणे आधुनिक लुक याचा मेळ घालायचा असेल तर तुम्ही बेंगलुरू सिल्क साड्यांचा पर्याय नक्की निवडू शकता. ज्या मुलींना नियमित साडी नेसायची सवय नसते त्यांच्यासाठी ही साडी उत्तम पर्याय ठरते. या साड्या अतिशय हलक्या असून सावरायला कठीण जात नाही. तसंच पांरपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ या साड्या ठरतात. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिन्यांपासून ते अगदी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांपर्यंत कोणत्याही दागिन्यांची स्टाईल करू शकता. या साड्यांबरोबर तुम्ही मिसमॅच ब्लाऊजची स्टाईलही करू शकता.

डिझाईनर बेंगलुरू साडी

बेंगलुरू सिल्क साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील डिझाईन आणि त्याची चमक. या साड्यांवर एक वेगळीच चमक असते ज्यावरून ही बेंगलुरू सिल्क आहे हे ओळखता येते. अशा साड्या तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेसू शकता. तसंच या नेसायला आणि सावरायलाही सोप्या आहेत. याशिवाय कोणत्याही लग्नात पटकन उठून दिसणाऱ्या आणि कोणाचेही लक्ष वेधून घेणाऱ्या अशा या साड्या आहेत. तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्हाला जास्त शो ऑफ करायला आवडत नसेल तर तुम्ही अशा बेंगलुरू सिल्क साड्यांवर पूर्ण हाताचा ब्लाऊज घालूनही अतिशय सुंदर दिसू शकता. यावर लेअर्ड झुमके अशी स्टाईल केल्यास, तुमच्यावरून कोणाचीही नजर हटरणार नाही. तसंच यावर तुम्ही अगदी पारंपरिक अंबाडा आणि केसात गजरा माळला की तुमचा पूर्ण लुक तयार. 

ग्लॅम लुक 

साडीमध्येदेखील तुम्ही तुमचा लुक अधिक ग्लॅम करू शकता. आजकाल अनेक अभिनेत्रीदेखील बेंगलुरू सिल्क साड्यांचा वापर अनेक कार्यक्रमांमध्ये करताना दिसून येत आहेत. अनेक सणासुदीलादेखील साडी नेसून ग्लॅम लुकसाठी तुम्ही या साडीचा पर्याय निवडू शकता. एखाद्या कार्यक्रमात अथवा सणासुदीसाठी बेंगलुरू सिल्क साडी, एका बाजूला येणारी वेणी अथवा शोल्डर साईड ओपन हेअर स्टाईल, कानात झुमके आणि स्लीव्हलेस ब्लाऊज अथवा व्ही कट ब्लाऊज तुमच्या लुकची शोभा वाढविण्यास मदत करते. एखाद्या पूजेसाठीही तुम्ही हा लुक करू शकता. 

या बंगलुरू सिल्क साडीसह तुम्ही मॅचिंग अथवा कॉन्ट्रास्ट अथवा मिसमॅच ब्लाऊज, फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज, कानात झुमके आणि गजऱ्याची हेअरस्टाईल हे नक्कीच करू शकता. यामुळे तुमच्या लुकमध्ये खूपच बदल येतो आणि तुमचा लुक अधिक आकर्षक आणि अधिक सुंदर, उठावदार दिसून येतो. कोणत्याही लग्नामध्ये तुम्हाला अधिक आकर्षक दिसायचे असेल आणि पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ करायचा असल्यास, तुमच्यासाठी ही साडी चांगला पर्याय आहे. तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही आमचे MyGlamm चे उत्पादनही वापरू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन