Table of Contents
- रीइक्विल पिटसॉप जेल (RE’ EQUIL Pitstop Gel)
- बायोटिक एंटी एक्ने क्रीम (Biotique Bio Winter Green Spot Correcting Anti Acne Cream)
- मामाअर्थ अँटी-पॉल्यूशन फेस क्रीम (Mamaearth Anti-Pollution Daily Face Cream)
- विको टर्मरिक स्किन केअर (Vicco Turmeric Skin Care)
- हिमालया हर्बल्स क्लॅरिना अँटी अॅक्ने क्रिम (Himalaya Herbals Clarina Anti-Acne Cream)
- मेडी प्लस नंबर 1 (Medi Plus Number 1)
- जोवीस अँटी-अॅक्ने अँड पिंपल क्रिम (Jovees Anti-Acne And Pimple Cream)
- न्यूट्रोजेना ऑन-द-स्पॉट अॅक्ने ट्रीटमेंट (Neutrogena On-The-Spot Acne Vanishing Formula)
- बेला वीटा अँटी अॅक्ने फेस जेल क्रिम (Bella Vita Organic Anti Acne Cream Gel)
- वादी हर्बल्स अँटी-अॅक्ने क्रिम (Vaadi Herbals Value Anti Acne Cream)
- प्लम ग्रीन टी क्लिअर स्पॉट लाईट जेल (Plum Green Tea Clear Spot-Light Gel)
- मुरूमांकरिता उत्कृष्ट क्रिम कसे निवडावे (How To Choose Best Cream For Pimple In Marathi)
- मुरूमांसाठी क्रिम वापरण्यासाठी सोप्या टिप्स (Tips For Using Cream For Pimples In Marathi)
आपल्याला कुठेतरी मस्त नटूनथटून जायचं असतं आणि सुंदर दिसायचं असतं तेव्हाच न बोलावता चेहऱ्यावर टपकून पडतात ते म्हणजे मुरूमं. पार्टी असो अथवा पिकनिक, एक ना एक पिंपल अर्थात मुरूम आपल्या पूर्ण कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करण्यासाठी येतातच. यामुळे सर्वात जास्त बिघडतो तो मूड. पण मुरूमांच्या या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आपल्याकडे बाजारात अनेक क्रिम्स मिळतात. लवकरात लवकर चेहऱ्यावरील मुरूमं दूर करून आपल्याला नितळ चेहरा मिळवून देणारी उत्कृष्ट क्रिम्स कोणती आहेत याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. मुळात हे क्रिम्स नक्की कसे आहेत आणि त्याच्यामधी गुण आणि अवगुण काय आहेत, फायदे आणि तोटे काय आहेत याचीही इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर बाजारात गेल्यानंतर कोणत्या क्रिमची खरेदी करायची आहे याबाबत शंका असेल तर त्याआधी तुम्ही हा लेख नक्की वाचावा. डे क्रिम असो वा नाईट क्रिम क्रिम्सबाबत योग्य माहिती घेऊन मगच त्याची खरेदी करावी. तसंच तुम्ही चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी MyGlamm चे वाईटआऊटही वापरू शकता.
रीइक्विल पिटसॉप जेल (RE’ EQUIL Pitstop Gel)
मुरूमांसाठी जेव्हा उत्कृष्ट क्रिम्स शोधावे लागते तेव्हा रिइक्विल पिटसॉप जेलचं नाव सर्वात वर येतं. बऱ्याच लोकांना याबाबत जास्त माहिती नाही. यामध्ये युरोपियन ऑलिव्ह आणि कांद्याच्या पानांच्या अर्काचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटिअॅक्ने आणि अँटिइन्फ्लेमेटरी हे गुण असून हे एक नॉन-कॉमेडोजेनिक (छिद्रांना बंद करणारे) जेल असून अगदी जुने मुरूमांचे निशाणही घालवण्यास मदत करणारे क्रिम आहे. हे अत्यंत हलके जेल असून त्वरीत त्वचेमध्ये मिसळते. ही मलई आपल्याला मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.
फायदे (Pros)
- हे कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त आहे
- त्वचेला अत्यंत नितळ बनवते
- जुन्या मुरूमांच्या डागांनाही काढून टाकण्यास मदत करते
- पोअर्स बंद करत नाही
- त्वचारोगतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले आहे
- यामध्ये सल्फेटचा वापर करण्यात आलेला नाही
तोटे (Cons)
- काही जणांना हे महाग वाटू शकते
- याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो
- प्रत्येक ठिकाणी हे उपलब्ध नाही
बायोटिक एंटी एक्ने क्रीम (Biotique Bio Winter Green Spot Correcting Anti Acne Cream)
मुरुम काढून टाकण्यासाठी आपण घरगुती उपचार करून पाहू शकता. तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी काही हर्बल नैसर्गिक हवे असेल तर मुरूमांना दूर करण्यासाठी तुम्हाला हे क्रिम उत्तम आहे. यामध्ये बायोटिक क्रिमचा उपयोग करण्यात आला आहे. या क्रिममध्ये नैसर्गिक आणि हर्बल तत्व असून हळद आणि कडिलिंबाचे गुणही आढळतात जे तुमच्या त्वचेला कोणतीही हानी होण्यापासून वाचवतात. बायोटिकचे हे क्रिम स्पॉट ट्रिटमेंटसाठी उपयोग ठरते. हे क्रिम लावल्याने मुरूमांमुळे येणारी सूजही कमी करण्यास मदत करते.
फायदे (Pros)
- हे तेलकट आणि अॅक्ने प्रॉन त्वचेसाठी उपयुक्त आहे
- हे त्वचेवर आरामदायी प्रभाव देण्यास उपयुक्त ठरते
- मुरूमांमुळे होणारी लालिमा चेहऱ्यावरून कमी करण्यासाठी फायदेशीर
- पुन्हा चेहऱ्यावर मुरूमं होण्यापासून रोखते
- कंपनीच्या दाव्याप्रमाणे हे अँटिपिंपल उपचाराप्रमाणे परिणामकारक आहे
- त्वचेवरील कोरडी त्वचा असल्यास, त्यावर उपायकारक आहे
- त्वचेला निरोगी बनवते
तोटे (Cons)
- याचे टब पॅकेजिंग आहे
- तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमांचे डाग असल्यास, कमी करत नाही
- काही दिवसांनंतर काही जणांना कदाचित जळजळ जाणवू शकते
मामाअर्थ अँटी-पॉल्यूशन फेस क्रीम (Mamaearth Anti-Pollution Daily Face Cream)
मामाअर्थचे अनेक उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यापैकीच एक आहे मामाअर्थ अँटिपॉल्युशन फेस क्रिम. मुरूमं आणि अॅक्ने हटविण्याच्या क्रिम्सच्या यादीचा या क्रिमचा समावेश करण्यात यायला हवा. हे अत्यंत हलके क्रिम आहे जे रोज आणि प्रत्येक ऋतूमध्ये वापरता येऊ शकते. प्रदूषणाने त्वचेवर येणारे डाग कमी करण्यासाठी आणि रोखण्यासाठी याचा वापर करता येतो. कंपनीच्या दाव्याप्रमाणे यामध्ये सल्फेट, पेराबेन्स, एसएलएस, पेट्रोलियम, आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह्ज आणि रंग आढळत नाहीत.
फायदे (Pros)
- मुरूमांसाठी हे उत्कृष्ट क्रिम असून प्रत्येक त्वचेसाठी उपयुक्त आहे
- महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात
- यामध्ये हळद असून अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते
- हे फ्री रॅडिकल्सपासून त्वचेला होणाऱ्या हानीपासून वाचवते
- सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते
- ऑईल फ्री फॉर्म्युला आहे
- हे नॉन कॉमेडोजेनिक क्रिम आहे
- त्वचेला मॉईस्चराईज करते
- त्वचारोगतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले आहे
तोटे (Cons)
- संवेदनशील नाक असणाऱ्याना कदाचित याचा सुगंध आवडणार नाही
- काही जणांना हे चिकट वाटू शकते
विको टर्मरिक स्किन केअर (Vicco Turmeric Skin Care)
मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स शोधत असताना विको टर्मरिक स्किन केअर क्रिमचे नाव घेतले नाही तर कसं चालेल. मुरुम काढून टाकण्यासाठी हळद वापरू शकता. हे अत्यंत औषधीय क्रिम असून कित्येक वर्षापासून याचा उपयोग करण्यात येत आहे. यामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटिबॅक्टेरियाल गुण असणारी हळद आहे. तसंच चंदनाचेही गुण आहेत. हे क्रिम जखम, खुणा, मुरूमं, पुरळ आणि जळजळ यासारख्या अनेक समस्यांवरील एक उपचार आहे. तसंच चेहऱ्यावरील डाग कमी करून अधिक चमकदार करण्यासाठीही उपयुक्त आहे.
फायदे (Pros)
- यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश आहे
- मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम
- यामध्ये चंदनाचे तेल असून हे क्रिम स्किन टोनवर अधिक चमक घेऊन येते
- हे अँटिसेप्टिक असून मुरूमांवर सूज आल्यासही याचा फायदा होतो
- त्वचेला अधिक मुलायम बनवते
- भारतीय कंपनी आहे
- याचा सुगंध अत्यंत मनमोहक आहे
तोटे (Cons)
- कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त नाही
- थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी करते
- जास्त लागल्यास, त्वचा सफेद होऊन पॅच पडू शकतात
- अलर्जी असणाऱ्यांंनी हे लाऊ नये
हिमालया हर्बल्स क्लॅरिना अँटी अॅक्ने क्रिम (Himalaya Herbals Clarina Anti-Acne Cream)
मुरूमं घालवण्यासाठी हिमालया हर्ब्ल्स क्लॅरिना अँटी अॅक्ने क्रिमचा खूप उपयोग होतो. हिमालयाचं हे क्रिम तुमची त्वचा अधिक मुलायम आणि मऊ राखून मुरूमं आणि पुरळ कमी करते. यामध्ये कोरफड, बदाम आणि मंजिष्ठासारखे नैसर्गिक तत्व आहेत. तसंच यामध्ये कूलिंग, अँस्ट्रिजेंट आणि अँटिसेप्टिक गुणही आहेत, जे त्वचेला संक्रमण, सूज आणि जळजळीपापसून मुक्त करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
फायदे (Pros)
- यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुण आहेत
- नैसर्गिक घटक असून मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम आहे
- मुरूमांमुळे येणारी खाज आणि जळजळीपासून सुटका मिळवून देते
- अत्यंत कमी प्रमाणात या क्रिमचा वापर केला तरीही याचा परिणाम दिसून येतो
तोटे (Cons)
- हे क्रिम थोडे घट्ट आहे
- डागासाठी फायदेशीर नाही
- केवळ रात्रीच याचा वापर करता येऊ शकतो कारण हे चिकट आहे
- बाजारात पटकन उपलब्ध नाही
मेडी प्लस नंबर 1 (Medi Plus Number 1)
बऱ्याच लोकांसाठी हे क्रिम नवे असू शकते. कंपनीच्या दाव्याप्रमाणे हे क्रिम विटामिन ए, सी आणि ई युक्त असून त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा फायदा होतो. हे त्वचेमध्ये अधिक चमक आणते आणि भारतामध्ये तयार करण्यात आलेले हे एक हर्बल क्रिम आहे.
फायदे (Pros)
- हे मुरूमांसाठी त्वचेवर एखाद्या ट्रीटमेंटप्रमाणे काम करते
- मुरूमं कमी होण्यासाठी उपयुक्त
- सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठीही फायदेशीर
- त्वचेला मुलायम बनवते
- त्वचेची कसावट अधिक सुधारते
तोटे (Cons)
- याचे पॅकिंग जारमध्ये आहे
- हे डाग काढून टाकण्यासाठी परिणामकारक नाही
- चिकट वाटण्याची शक्यता
- क्रिमचा परिणाम होण्यास वेळ लागतो
जोवीस अँटी-अॅक्ने अँड पिंपल क्रिम (Jovees Anti-Acne And Pimple Cream)
जोवीस अँटिअॅक्ने अँड पिंपल क्रिम हे नैसर्गिक उत्पादन आहे. यामध्ये कडिलिंबाचा अर्क, लाल चंदन आणि अन्य वनस्पतींचा अर्क आहे. जे केवळ मुरूमं कमी करत नाहीत तर पुन्हा चेहऱ्यावर मुरूमं येऊ नयेत याची काळजीही घेते. हे क्रिम तुमच्या त्वचेला अधिक नितळ आणि स्वच्छ बनवते. तसंच त्वचेला मॉईस्चराईज करण्यासही हे क्रिम मदत करते.
फायदे (Pros)
- तेलकट आणि मुरूमग्रस्त त्वचेसाठी हे उपयुक्त
- यामध्ये कडिलिंबाचा अर्क असून अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल क्रिम आहे
- यातील काळी मिरी पोअर्स ओपन करून त्वचेवरील अशुद्धता मिटविण्याचा प्रयत्न करते
- त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी फायदेशीर
- थोडेसे वापरले तरीही परिणाम चांगला होतो
- याचा सुगंध चांगला आहे
तोटे (Cons)
- याचा परिणाम दिसण्यास वेळ लागतो
- हे क्रिम घट्ट आहे
न्यूट्रोजेना ऑन-द-स्पॉट अॅक्ने ट्रीटमेंट (Neutrogena On-The-Spot Acne Vanishing Formula)
न्यूट्रोजेना हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे आणि त्याचेच हे मुरूमांवरील एक उत्पादन आहे. हे औषधीय क्रिम असून यामध्ये 2.5 टक्के बेंझाईल पेरॉक्साईड असते, जे मुरूमं हटविण्यासाठी फायदेशीर ठरते. हे क्रिम हलके असून त्वचेमध्ये पटकन शोषून घेतले जाते आणि त्वचेला कोरडे बनवत नाही. तसंच मुरूमं घालविण्यासाठी उत्तम क्रिम आहे.
फायदे (Pros)
- हे मुरूमांना रोखते
- हे लावल्याने त्वचेवर तेल जमत नाही
- त्वचेवर जळजळ अथवा खाज निर्माण होऊ देत नाही आणि संवेदनशील त्वचेसाठीही उपयुक्त आहे
- त्वचेसाठी सौम्य आहे
- सनस्क्रिनसह याचा वापर करता येतो
- त्वचारोगतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले आहे
- मुरूमांचा आकार कमी करण्यास फायदेशीर
तोटे (Cons)
- अन्य क्रिमच्या तुलनेत महाग आहे
- जुन्या आणि जिद्दी मुरूमांवर परिणामकारक नाही
- त्वचेला कोरडे बनवू शकते
बेला वीटा अँटी अॅक्ने फेस जेल क्रिम (Bella Vita Organic Anti Acne Cream Gel)
हे एक जेल बेस्ड अँटी अॅक्ने क्रिम आहे. यामध्ये तुळस, कडिलिंबाची पाने, कोरफड आणि जोजोबा ऑईलसारखे नैसर्गिक घटक आढळतात. कंपनीच्या दाव्यानुसार हे एक ऑर्गेनिक आणि आयुर्वेदिक उत्पादन आहे. हे केवळ मुरूमांसाठीच परिणामकारक नाही तर त्यामुळे होणारे व्रण, जखम आणि सूज आल्यास त्यावरही परिणामकारक आहे. हे मुरूमं निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढतात आणि मुरूमांना रोखू शकतात.
फायदे (Pros)
- हे हलके आहे
- अॅक्नेमुळे झालेले डाग काढून टाकण्यास फायदेशीर
- त्वचेला डिटॉक्सिफाय करते
- हे अँटीबॅक्टेरियल क्रिमप्रमाणे काम करते
- यामध्ये पॅराबेन, सल्फेट, एसएलईएस आणि अन्य हानिकारक तत्व आढळत नाहीत
- मुरूमांमुळे येणारी सूज आणि लालिमा कमी करते
- अत्याधिक सीबम संतुलित करते
- त्वचा मॉईस्चराईज आणि हायड्रेट करते
- एफडीएद्वारे प्रमाणित
तोटे (Cons)
- परिणाम दाखविण्यास वेळ लागतो
- काही प्रमाणात हे क्रिम चिकट आहे
वादी हर्बल्स अँटी-अॅक्ने क्रिम (Vaadi Herbals Value Anti Acne Cream)
लवंग तेल हे कडिलिंब आणि संत्र्याच्या अर्कासह मिसळून या क्रिमचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. हे क्रिम मुरूमं निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाना मारून मुरूमं हटविण्याचे काम करते. हे त्वचेमधून अतिरिक्त तेल निर्माण करण्यास रोख लावते आणि पोअर्स बंद होण्यापासूनही वाचवते. यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण मुरूमांपासून होणारी खाज येण्यापासून वाचवते. हे नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले आहे.
फायदे (Pros)
- मुरूमांसह डागही कमी करते
- त्वचेला एक्सफोलिएट करते
- त्वचेतून अतिरिक्त तेल घालवते
- त्वचेच्या इलास्टिसिटीमध्ये करते सुधारणा
- हे क्रिम प्रिमॅच्युअर एजिंग अर्थात सुरकुत्या येण्यापासून थांबवते
- त्वचेला मॉईस्चराईज करते
- त्वचेमध्ये पटकन शोषून घेतले जाते
तोटे (Cons)
- पैशाच्या तुलनेत क्रिमचे प्रमाण कमी वाटू शकते
- त्वचेचा रंग अधिक गडद होऊ शकतो
प्लम ग्रीन टी क्लिअर स्पॉट लाईट जेल (Plum Green Tea Clear Spot-Light Gel)
प्लम ग्रीन टी क्लिअर स्पॉट लाईट जेल हे 17 नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले आहे. ग्लायकॉडिक अॅसिड आणि सॅलिसिलिक अॅसिडयुक्त असणारे हे जेल मुरूमांसाठी उपयुक्त आहे. याशिवाय यात ग्रीन टी, कडिलिंबाची पाने, टी ट्री ऑईल, कोरफड रस, बिटाईन लिकोरिस आणि अन्य नैसर्गिक तत्वही आढळतात. वास्तविक हे उत्पादन केवळ स्पॉट अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर न लावता केवळ मुरूमं आलेल्या ठिकाणी वापरावे.
फायदे (Pros)
- अॅक्ने प्रोन स्किनसाठी उपयुक्त
- पटकन त्वचेमध्ये शोषून घेतले जाते
- जळजळ अथवा खाजेपासून सुटका मिळवून देते
- मुरूमांचा आकार लहान करते
- हे जेल त्वचेमध्ये जळजळ निर्माण करत नाही
- विगन उत्पादन आहे
तोटे (Cons)
- हे संपूर्ण चेहऱ्यावर लाऊ शकत नाही
- मॉईस्चराईजर नाही
- महाग आहे
मुरूमांकरिता उत्कृष्ट क्रिम कसे निवडावे (How To Choose Best Cream For Pimple In Marathi)
पिंपल्सपासून सुटकेसाठी त्यावर क्रिम लावणं गरजेचं असतं. पिंपल्स किंवा मुरूमांसाठी क्रिम कसं निवडावं जाणून घ्या. क्रिम्सबद्दल आपण माहिती घेतली. पण याची निवड नक्की कशी करायची याचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे निवड करताना नक्की कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या ते पाहूया.
- सॅलिसिलिक अॅसिडयुक्त क्रिमची निवड करा कारण हे मुरूमांच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात
- अशा क्रिमची निवड करा जे हायपोअलर्जिक असेल आणि त्यामुळे अलर्जी होणार नाही
- आपल्या त्वचेनुसार क्रिमची निवड करा कारण मुरूमांची समस्या कोणालाही होऊ शकते. पण तेलकट त्वचा असणाऱ्यांना ही समस्या जास्त प्रमाणात होते
- लक्षात ठेवा की, मुरूमं हटविण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांद्वारे प्रमाणित आणि परिक्षित करण्यात आलेले क्रिम्स वापरा
- नॉन कॉमेडोजेनिक क्रिम घ्या ज्यामुळे पोअर्स ओपन होतील
- मुरूमांच्या ज्या क्रिममध्ये एसपीएफ असेल ते क्रिम नक्की निवडा
- नैसर्गिक घटक असतील तर असे क्रिम नक्की निवडा. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी अशाच क्रिमची निवड करावी
- नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच क्रिमची खरेदी करा
- प्रमाणित ब्रँडचे क्रिम निवडा
- नेहमी क्रिम खरेदी करताना त्याची समाप्ती तारीख पाहूनच निवड करा
मुरूमांसाठी क्रिम वापरण्यासाठी सोप्या टिप्स (Tips For Using Cream For Pimples In Marathi)
काही सोप्या टिप्स खास तुमच्यासाठी –
- सर्वात पहिले आपल्या त्वचेनुसार उत्कृष्ट क्रिमची निवड करा
- आपला चेहरा फेसवॉशने धुवा
- त्यानंतर मऊ टॉवेलने पॅट ड्राय करून घ्या
- नंतर हातावर थोडंसं क्रिम घेऊ चेहऱ्याला लावा
- कधीही हे क्रिम रगडून लाऊ नका
- नेहमी झोपण्याच्या आधी अर्धा तास क्रिम चेहऱ्याला लावावे, परिणाम चांगला होतो
लक्षात ठेवा की, कसे मुरूमं दूर करण्यासाठी तुम्ही जे क्रिम्स वापरता त्याने त्वरीत परिणाम मिळत नाही. तुम्ही जे क्रिम वापरणार आहात त्यातील घटकांची व्यवस्थित माहिती करून घ्या. आपल्या त्वचेनुसारच याची निवड करा आणि वापरण्यापूर्वी त्वचेवर एकदा याची खात्रीलायक परीक्षा घेऊन बघा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक