Care

अंगावरील नको असलेले केस काढण्यासाठी बेस्ट क्रीम | Best Hair Removal Cream In Marathi

Trupti Paradkar  |  Nov 4, 2020
अंगावरील नको असलेले केस काढण्यासाठी बेस्ट क्रीम | Best Hair Removal Cream In Marathi

अंगावरील नको असलेले अनावश्यक केस काढणे म्हणजे एक डोकेदुखीच असते. आतापर्यंत यासाठी तुम्ही अनेक पद्धती आणि प्रकार ट्राय केले असतील. वॅक्सिंग, थ्रेडिंग पासून रेझर वापरण्यापर्यंत तुमचं सर्व काही करून झालं असेल तर आता यासाठी एक सोपा उपाय वापरून पाहा तो म्हणजे अंगावरील केस काढण्याची क्रीम. अंगावरील कुठल्याही भागावरचे केस काढण्यासाठी तुम्ही या हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकता. बाजारातील विविध क्रीम पाहुन तुम्हाला संभ्रम झाला असेल तर जाणून घ्या केस काढण्यासाठी कोणती क्रीम वापरावी.

Veet Silk & Fresh Hair Removal Cream

केस काढण्याची क्रीम चे नाव – व्हीट

बऱ्याचदा केस काढण्याच्या क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या हानिकारक केमिकल्समुळे त्वचेला दाह होतो. मात्र हे क्रीम तुमच्या त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी उत्तम आहे. कारण यात कोरफड आणि व्हिटॅमिन ईचा अर्क वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे केस काढल्यावर तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहते. या क्रीमचे एकुण तीन फायदे आहेत. या क्रीममुळे तुमच्या अंगावरील केस तर निघून जातातच शिवाय तुमच्या केसांची इनर ग्रोथ रोखली जाते. एवढंच नाही तर यामुळे तुमची त्वचा मॉईच्सराईझदेखील होते. म्हणूनच केस काढण्यासाठी वीट कंपनीचे हे क्रीम एकदा नक्कीच ट्राय करा.

फायदे  –

तोटे –

Sally Hansen Cream Hair Remover Kit

अंगावरील केस काढण्यासाठी वॅक्सचे विविध प्रकार वापरले जातात. मात्र त्यामुळे वॅक्स स्ट्रिप्समुळे होणाऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. यासाठी त्या  टाळायच्या असतील तर सॅली हंसेन कंपनीचे हे केस काढण्याचे क्रीम अवश्य वापरून पाहा. कारण या क्रीमने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केसदेखील सहज काढून टाकू शकता. चेहऱ्यावरील ओठांच्या वरील आणि हनुवटीवरील केस काढताना तुम्हाला मुळीच त्रास होणार नाही. यात व्हिटॅमिन ई भोपळ्यांच्या बियांचे घटक वापरले असल्यामुळे तुमच्या त्वचेची योग्य निगा राखली जाते. 

फायदे –

तोटे –

Klorane Hair Removal Cream

संवेदनशील त्वचेवरील केस काढण्यासाठी हे क्रीम अतिशय उपयुक्त आहे. कारण यामुळे तुमच्या अंगावरील केस हळुवारपणे काढले जातात. क्रिमी टेक्सचर आणि सुंगधित असल्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडू शकतं. यात तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी बदामाचा वापर करण्यात आलेला आहे. या क्रीममुळे तुमचे हात आणि पाय अगदी मऊमुलायम होऊ शकतात.

फायदे –

तोटे –

Anne French Hair Removal Cream – Aloe Vera Gel

अॅनी फ्रेंच हा केस काढण्याच्या क्रीमसाठी एक जुना आणि लोकप्रिय ब्रॅंड आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही क्रीम तुमच्या त्वचेवर वापरू शकता. मात्र त्याआधी पॅचटेस्ट घेण्यास मुळीच विसरू नका. ही क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेचा विचार करून डिझाईन करण्यात आलेली असून त्यात कोरफडाचा अर्क वापरण्यात आळेला आहे. नेहमीच्या बॉटलऐवजी आता ट्युबमध्ये आकर्षक पॅक तयार केलेला आहे. तुम्ही हे क्रीम तुमच्या इंटिमेट भागावरदेखील वापरू शकता. याला एक प्रकारचा सुंदर सुंगधदेखील आहे. कोरफडाचा अर्क असल्यामुळे या केस काढण्याची क्रीममुळे तुमच्या त्वचेची निगा राखली जाते.

फायदे  –

तोटे –

Nair Hair Remover Face Cream

काही प्रकारच्या हेअर रिमूव्हल क्रीम तुमच्या त्वचेला टाईट करतात आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. मात्र नायर हेअर रिमूव्हर फेस क्रिममध्ये बदामाचे तेल वापरण्यात आलं आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होते. तुम्ही या हेअर रिमूव्हल क्रीमने तुमच्या चेहऱ्यावरील जसे की, अपल लिप्स, चीन आणि इतर भागावरील केस काढू शकता.  अंगावरील केस काढण्यासाठी हे केस काढण्याची क्रीम वापरणं अधिक सोपं आणि सुलभ आहे. अप्पर लिप्सवरील केस काढणं नक्कीच डोकेदुखीचं असतं त्यामुळे त्याआधी काही गोष्टी तुम्हाला अवश्य माहीत असायला हव्या. 

फायदे –

तोटे –

Vcare Hair Removal Spray Foam & Hair Growth Retardant Gel Combo

हेअर रिमूव्हल क्रीमप्रमाणेच तुम्ही व्हि केअरचं हेअर रिमूव्हल स्प्रे फोम वापरू शकता. ज्यामुळे तुमचे केस सहज आणि पटकन निघू शकतात. या फोम क्रीमने केस काढणे वेदनामुक्त आहे. यासाठी तुम्हाला स्प्रेच्या मदतीने त्वचेवर क्रिम पसरावं लागतं. हात, पाय आणि अंडर आर्मचे केस काढण्यासाठी हे क्रीम अतिशय उपयुक्त आहे. यामुळे तुमच्या केसांची अतिरिक्त वाढ रोखली जाते.

फायदे –

तोटे – 

Fem Fairness Naturals Hair Removal Cream

फेम कंपनी महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने तयार करणारी एक जुनी आणि लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या या हेअर रिमूव्हल क्रीममध्ये गोल्ड पार्टिकल्स, जोजोबा ऑईल आणि अॅंटि डार्कनिंग फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे. हे क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. यात सोन्याचे नैसर्गिक घटक वापण्यात आलेले असल्यामुळे त्यामुळे तुमची त्वचा उजळ होते शिवाय जोजोबा ऑईलमुळे त्वचेतील मऊपणा टिकून राहतो.

फायदे –

तोटे – 

Everteen Bikini Line Hair Removal Cream

एव्हरटीन कंपनीचे हे बिकीनी लाईन हेअर रिमूव्हर तुमच्या संवेदनशील त्वचेला कोणत्याही त्रासाशिवाय केसमुक्त करते. तुम्ही बिकीनी आणि अंडरआर्मचे केस काढण्यासाठी या क्रीमचा वापर करू शकता. यात शंभर टक्के कॅमोमाईलचे नैसर्गिक घटक वापरण्यात आलेले आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेची योग्य निगा राखली जाते. कोणतीही खाज अथवा जळजळ न होता तुमच्या प्रायव्हेट भागावरील केस काढले जातात. 

फायदे –

तोटे – 

Securteen Hair Remover Cream

बिकीनी आणि अंडरआर्मवरचे केस काढण्यासाठी हे उपयुक्त क्रीम आहे. संवेदनशील त्वचेसाठी तयार करण्यात आलेले असल्यामुळे त्वचेवर दाह आणि जळजळ होत नाही. या क्रीममुळे तुमची प्रायव्हेट भागावरील त्वचा काळी पडत नाही. व्हजायनल हेअर स्वच्छ करणं हे नक्कीच नाजूक काम आहे. यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार करू शकता. मात्र या क्रीममुळे तुम्हाला ते अगदी सहज काढता येतात. 

फायदे –

तोटे –

Anne French Sandal Hair Remover Creme

अॅनी फ्रेंच या कंपनीचे सर्वच हेअर रिमूव्हल क्रीम उत्तम आहेत. या आधी आपण कोरफडयुक्त क्रीम पाहिले आहे. यातील चंदनाचे घटक असलेले क्रीमदेएखील तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण चंदन त्वचेसाठी नक्कीच उपयुक्त आहे शिवाय त्याला चंदनामुळे सुंदर सुंगधदेखील येतो. 

फायदे –

तोटे –

केस काढण्यासाठी क्रीमबाबत मनात असलेले प्रश्न – FAQs

1. अशी एखादी क्रीम आहे का ज्याने केस कायमस्वरूपी निघतात ?

कायमस्वरूपी केस काढणारी कोणतीही हेअर रिमूव्हल क्रीम सध्यातरी उपलब्ध नाही. लेझर पद्धतीने केस काढण्यामुळे कायमस्वरूपी केस येणं कमी होतं मात्र ती पद्धत खर्चिक आणि वेळ काढू आहे.

2. वॅसलिनने केस काढता येतात का ?

होय, वॅसलिनचा वापर करून तुम्ही घरच्या घरी नको असलेले केस काढू शकता. त्यासाठी तुमच्या घरात असलेल्या इतर काही गोष्टींची तुम्हाला गरज लागू शकते. शिवाय केस काढण्याची पद्धतदेखील तुम्हाला माहीत असायला हवी.

3. केस काढण्यासाठी शेव्ह करावे की हेअर रिमूव्हल क्रीम वापरावे ?

केस काढण्यासाठी कोणती पद्धत योग्य आणि कोणती अयोग्य असं खरंतर काहीच नसतं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही केस काढण्याची पद्धत वापरू शकता. आपले केस वस्तरासह दाढी करा, आपले केस काढा किंवा रिका वॅक्स वापरा. मात्र हेअर रिमूव्हल क्रीम वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट घ्यायला विसरू नका.

4. हेअर रिमूव्हलने केस काढण्यामुळे तुमच्या केसांची ग्रोथ जास्त होते का अथवा केस जाडसर येतात का ?

हेअर रिमूव्हल क्रीम बाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. वास्तविक सतत केस काढण्यामुळे हळूहळू तुमच्या केसांची वाढ कमी आणि इनर ग्रोथ कमी कमी होत जाते. मात्र त्यासाठी सातत्याने केस काढायला हवेत. आपण केसांच्या वाढीसाठी सल्फेट फ्री शैम्पू आणि केस काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स वापरू शकता. मात्र यामध्ये तुमच्या हेअर रिमूव्हल क्रीममुळे काहीही परिणाम होत नाही.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

Read More From Care