Recipes

चहा, कॉफी ऐवजी सुरु करा या पेयांचे सेवन आणि मिळवा फायदेच फायदे

Leenal Gawade  |  Apr 29, 2020
चहा, कॉफी ऐवजी सुरु करा या पेयांचे सेवन आणि मिळवा फायदेच फायदे

अनेकांची सकाळ ही चहा, कॉफीच्या सेवनाने सुरु होते. अनेकांना या पेयांनी किक मिळते. तर अनेकांना सकाळ झाल्याची जाणीव होते. पण आरोग्यासाठी या गोष्टींचे उपाशीपोटी सेवन करणे चांगले नाही. हे माहीत झाल्यामुळे आता अनेक जण या पेयांऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी याचे सेवन करतात. पण या गोष्टीही उपाशी पोटी पिणे चांगले नाही असे म्हणतात. आता जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात गरम गरम किंवा काही तरी असे पिऊन करायची आहे ज्याने तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा दिवसही एकदम फ्रेश जाईल. तर तुमच्यासोबत आम्ही अशी काही पेय शेअर करणार आहोत. चला करुया सुरुवात

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

मेथी दाणा पाणी

shutterstock

मेथी दाण्याचा उपयोग हा आपण अनेक पदार्थांमध्ये करतो. म्हणजे डोसा, इडलीच्या बॅटरमध्ये मेथीचे दाणे घातले जातात. पण याचा आणखी एक उपयोग असा की, त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट कमी होण्यास मदत मिळते. नको ते खाण्याची इच्छाही कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे. एका ग्लासमध्ये आदल्या रात्री एक चमचाभर मेथी दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. मेथी दाण्याचे पाणी प्यायलानंतर तुम्हाला तुमची भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. आता जर तुम्हाला हे गरम पडतील अशी भीती वाटत असेल तर आठवड्यातून 3 वेळा या पाण्याचे सेवन करा.

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

जिरे आणि बडिशेप पाणी

shutterstock

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला काही तरी गरम प्यायाचे असेल तर तुम्ही तुम्ही हे पेय पिऊ शकता. एका ग्लासात कोमट पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा बडिशेप पावडर घाला. हे पाणी प्या. या पाण्याला फार अशी काही वेगळी चव लागत नाही. त्यामुळे त्याची चव कशी लागेल याची काळजी करु नका. कारण याचे फायदे वाचाल तर तुम्हाला ते किती चांगले आहे ते कळेल. जिरे आणि बडिशेपचे हे पाणी तुमच्या शरीरातील फॅट कमी करण्याचे काम करते. याशिवाय तुम्हाला जर पोटाचे विकार, शौचाला होत नसेल तर तुम्हाला त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय (How To Clean Stomach In Marathi)

दालचिनी आणि जिऱ्याचे पाणी

Instagram

वजन कमी करणे आणि तुमची सकाळी चांगली करणारे आणि एक पेय म्हणजे दालचिनी आणि जिऱ्याचे पाणी. एका ग्लासात आदल्या रात्री जिरे भिजत घाला. मसाल्याच्या डब्यातील एक छोटा चमचा तुमच्यासाठी पुरेसा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गरम करा. त्यामध्ये अगदी एक लहान चमचा दालचिनी पूड घाला आणि या पाण्याचे सेवन करा. उपाशीपोटी या पाण्याच्या सेवनाचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील. वजन कमी करण्यासोबत तुमचा ताण कमी करण्याचे काम हे पेय करते. 

आता तुम्हालाही वजन कमी करायचे आहे किंवा पोटाच्या विकारापासून तुम्हालाही सुटका हवी असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करायला विसरु नका.  

 

 

Read More From Recipes