त्वचेची काळजी

टाचांना भेगा पडत असतील तर हे घरगुती उपाय करा

Vaidehi Raje  |  Feb 21, 2022
cracked heels remedies

सर्वसाधारणपणे ज्या लोकांची त्वचा कोरडी असते किंवा ज्यांना सोरायसिस किंवा एक्झिमा सारखा त्वचारोग असतो, त्यांच्या टाचांना भेगा पडण्याचे प्रमाण जास्त असते. टाचांना भेगा पडलेल्या असतील तर चालताना त्रास होतोच, शिवाय पाण्यात पाय घालताना देखील टेन्शन येते. तसेच काही खास दिवशी जर सुंदर ड्रेसवर मॅचिंग असे सँडल्स किंवा हिल्स घालायच्या असतील तर आपल्याला भेगा पडलेल्या टाचांची लाज वाटते. पण टेन्शन घेऊ नका. काही साधे, सोपे घरगुती उपाय करून टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या होऊ शकतात

टाचांना भेगा पडण्याची कारणे 

दीर्घकाळ उभे राहणे, विशेषतः कडक जमिनीवर जास्त वेळ उभे राहिल्यास, तसेच मागच्या बाजूने उघडे शूज किंवा सँडल घातल्यास टाचांना भेगा पडू शकतात. तसेच लठ्ठपणा किंवा वजन जास्त असले की टाचांवर दबाव वाढतो आणि टाचांना भेगा पडण्याची शक्यता असते. ऍथलेट्स फूट, सोरायसिस किंवा एक्जिमा यासारखे त्वचेचे आजार असतील तर भेगा पडण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच हिवाळा सुरू झाला की कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचा आणि केस खराब होऊ लागतात तसेच टाचांना भेगा पडतात. तसेच उष्णतेच्या त्रासाने देखील भेगांचा त्रास होऊ शकतो. 

अधिक वाचा – थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल

टाचांच्या भेगांवर घरगुती उपाय 

कोमट पाण्यात पाय बुडवा- कोमट पाण्यात मीठ किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून त्यात 15-20 पाय मिनिटे बुडवून ठेवा. नंतर लूफा किंवा मऊ ब्रश वापरून तळपाय स्क्रब करा. स्क्रब केल्याने टाचांवरील मृतपेशी निघून जातील आणि टाचा मऊ होण्यास मदत मिळेल. तसेच अंघोळ करताना आठवड्यातून तीनदा प्युमिस स्टोन वापरून पावले घासा. यामुळे त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यास आणि आपले पाय मऊ ठेवण्यास मदत होईल. पण प्युमिस स्टोनचा अति वापर करू नका नाहीतर त्वचेला इजा होऊ शकेल. 

पेट्रोलियम जेली वापरा- पेट्रोलियम जेली तुमच्या टाचांना खोलवर मॉइश्चरायझ करण्यास मदत करते आणि तुमची त्वचा मऊ ठेवते. झोपण्यापूर्वी नियमितपणे पाय स्वच्छ धुवून मग टाचांना व पावलांना पेट्रोलियम जेली लावा आणि मॉइश्चर टिकवून ठेवण्यासाठी झोपताना मोजे घाला. तसेच दररोज मॉइश्चरायझर लावा. तुमची त्वचा खूप कोरडी असल्यास एकदा सकाळी अंघोळ झाल्यानंतर व नंतर संध्याकाळी असे दोन वेळा मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची त्वचा कोरडी  पडणार नाही व त्वचेला भेगा पडणार नाहीत. 

खोबरेल तेल/ शिया बटर वापरा- कोमट पाण्यात पाय बुडवून ते स्क्रब करा व ते स्वच्छ कोरडे करून त्यांना खोबरेल तेल किंवा शिया बटर लावा. नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे टाचांच्या भेगा दूर होण्यास मदत होते. शिया बटरमध्येही व्हिटॅमिन ए, ई आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिड  (ALA) आणि लिनोलेइक ऍसिड (LA) भरपूर प्रमाणात असते जे कोरड्या त्वचेला आराम देते आणि बरे करते. पायाला नियमितपणे तेलाचा मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत.

भरपूर पाणी प्या – आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी दररोज 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहील आणि टाचांच्या भेगांवर उपचार करण्यास मदत करेल कारण त्वचेवरील भेगा या कोरडेपणामुळे उद्भवतात. म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

या  घरगुती उपायांनी टाचांच्या भेगा सहज बऱ्या होतात. पण याबरोबरच योग्य साईजच्या चप्पल/ शूज घालणे आणि आणि पायांची काळजी घेणेही आवश्यक आहे. बरेच दिवस हे उपाय करूनही भेगा बऱ्या होत नसतील तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

अधिक वाचा – सुंदर पायांसाठी नक्की करा हे ‘6’ घरगुती उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From त्वचेची काळजी