DIY फॅशन

स्टायलिश दिसण्यासाठी वापरा हूप इअररिंग्ज

Dipali Naphade  |  Sep 14, 2021
hoop-earrings-styles

कोणतेही कपडे घालताना यावर नक्की कोणते कानातले घालायचे? असा कॉमन प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात येतोच. मग कोणते कपडे आहेत आणि त्यानुसार कोणत्या इअररिंग्ज (Earrings) हव्यात याची शोधाशोधही सुरू होते. पण एकदम सहज मिळणारे असे हूप इअररिंग्ज (Hoop Earrings) सध्या ट्रेंड्समध्ये आहेत. सहसा जीन्स, टॉप, पंजाबी अथवा कोणत्याही कपड्यांवर सहजपणाने तुम्ही याची स्टाईल करू शकता. लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत हे इअररिंग्ज कसे स्टाईल करायचे ते जाणून घेऊया. तसंच हूप इअररिंग्जमध्येही बऱ्याच व्हरायटी असतात. त्याबाबत महत्त्वाची माहिती. तुम्हीही इअररिंग्ज नेहमी घालत असाल तर तुम्हालाही हूप इअररिंग्जच्या फॅशन स्टाईलबाबत माहिती असायला हवी. एव्हरग्रीन फॅशनेबल हूप इअररिंग्ज या सर्व आकारात उपलब्ध असतात.

लहान हूप इअररिंग्ज (Small Hoop Earrings)

Instagram

लहान हूप इअररिंग्ज तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी घालून जाऊ शकता. ऑल टाईम वेअर (All time wear) असे हे कानातले आहेत. तसंच हे घालायला पण सोपे आणि कानाला जडही होत नाहीत. याशिवाय स्मॉल हूप इअररिंग्ज हे दिसायलादेखील स्टायलिश दिसतात. तुम्ही क्रॉप टॉप आणि जीन्सवर हे कानातले वापरून तुमची स्टाईल अधिक आकर्षक करू शकता. याशिवाय मिडी, वनपिस यावरही हे कानातले उठावदार दिसतात.

हाफ मून बिग हूप इअररिंग्ज (Half Moon Big Hoop Earrings)

Instagram

बॉलीवूड दिवाज अर्थात अनेक अभिनेत्रींना आपण अशा हाफ मून बिग हूप इअररिंग्ज घालताना पाहिलं आहे. तुम्हीही या कानातल्यांचा वापर करू शकता. अधिक स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. सोनेरी, चंदेरी अथवा ब्लॅक मेटलमध्ये हे कानातले अधिक स्टायलिश लुक देतात. क्रॉप टॉप असो अथवा एखादा पूर्ण हाताचा टीशर्ट असो असे कानातले तुम्हाला अधिक आकर्षक लुक मिळवून देतात.

अधिक वाचा – कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

ओव्हरसाईज हार्ट हूप इअररिंग्ज (Oversize Heart Hoop Earrings)

तुम्हाला कानातले घालताना काहीतरी वेगळे हवे असेल आणि गोल आकारांच्या हूप कानातल्यांचा कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शर्ट अथवा स्कर्ट टॉपवर अशा प्रकारचे कानातले शोभून दिसतात. वेगळा लुक मिळविण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच यामध्ये गोल्डन रंगाचे कानातले अधिक सुंदर दिसतात. 

पर्ल हूप इअररिंग्ज (Pearl Hoop Earrings)

Instagram

मोत्यांचे दागिने कोणाला आवडत नाही असं नाही. मोत्यांच्या दागिन्यांची काळजीही तितकीच घ्यावी लागते. मात्र तरीही काही कपड्यांवर असे दागिने शोभून दिसतात. तुम्ही जंपसूट अथवा कॉर्पोरेट कपड्यांवर पर्ल हूप इअररिंग्ज घालू शकता. साधारण फिक्या रंगाच्या कपड्यांवर अथवा पांढऱ्या, ऑफव्हाईट कपड्यांवर असे पर्ल हूप कानातले अधिक आकर्षक दिसतात. केसांचा अंबाडा बांधून तुम्ही या कानातल्याने तुमचा लुक अधिक बोल्ड करू शकता. 

अधिक वाचा – स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या फॅशन अॅक्सेसरिज

स्क्रिप्ट हूप इअररिंग्ज (Script Hoop Earrings)

स्क्रिप्ट हूप इअररिंग्ज आजकाल खूपच ट्रेंड्समध्ये आहेत. विशेषतः अभिनेत्री असे कानातले अनेकदा घालताना दिसून येते. अशा कानातल्यांवर काही शब्द लिहिलेले असतात. जीन्स, डेनिम आणि अन्य स्वरूपाच्या कपड्यांवर असे कानातले अधिक सुंदर दिसतात. तुम्हालाही हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर तुम्हाला बाजारात ठिकठिकाणी असे कानातले उपलब्ध होतील. 

स्टोन हूप इअररिंग्ज (Stone Hoop Earrings)

Instagram

स्टोन हूप इअररिंग्जदेखील तुम्ही ट्राय करू शकता. मॉडर्न कपड्यांवर अथवा कुरती वा पंजाबी सूटवर हे कानातले अधिक उठावदार दिसतात. विशेषतः प्रिंटेड कपडे असल्यास तुम्ही स्टोन हूप इअररिंग्जचा पर्याय वापरलात तर अधिक सुंदर दिसतो. सिल्क अथवा सुळसुळीत प्रिंटेड कपड्यांवर ही फॅशन अधिक चांगली दिसते. 

अधिक वाचा – झुमका गिरा रे…नक्की ट्राय करा झुमक्याचे हे प्रकार

चैन हूप इअररिंग्ज (Chain Hoop Earrings)

ऑफ शोल्डर कपडे घालण्याची तुम्हाला आवड असेल अथवा ट्युब टॉप, क्रॉप टॉप आणि कॉर्सेट टॉपसह चैन हूप इअररिंग्ज अधिक आकर्षक दिसतात. सध्या हे कानातले ट्रेंडमध्ये असून कोणत्याही पार्टी अथवा होम पार्टीसाठीही याचा उपयोग तुम्ही करू शकता. स्टायलिश दिसण्यासाठी हे कानातले उत्तम पर्याय आहेत. 

याशिवाय तुम्हाला रेक्टॅंगल इअररिंग्ज, ट्रँगल इअररिंग्ज असे अनेक हूप इअररिंग्ज बाजारामध्ये दिसून येतील. तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की याचा समावेश करून घ्या आणि दिसा अधिक स्टायलिश. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन