लाईफस्टाईल

दुबईत या ठिकाणी करा मनसोक्त शॉपिंग

Trupti Paradkar  |  Dec 17, 2019
दुबईत या ठिकाणी करा मनसोक्त शॉपिंग

दुबई हे पर्यटनासाठी अगदी बेस्ट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दुबईत पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दुबई सर्वात जास्त प्रसिद्ध आहे शॉपिंगसाठी… म्हणूनच जर तुम्ही यंदा दुबईला जाणार असाल तर तुमच्या शॉपिंग बॅग्ज नक्की तयार ठेवा. दुबईत फिरताना तुम्हाला  कोणत्या गोष्टी घेऊ आणि कोणत्या नको असं होऊ शकतं. कारण चारी बाजूने असलेले शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग मार्केट्स तुम्हाला खरेदीसाठी खुणावत राहतात. म्हणूनच दुबईला जाण्याआधीच तिथल्या शॉपिंग सेंटर्सविषयी थोडंसं जाणून घ्या. ज्यामुळे तिथे गेल्यावर तुम्हाला मनसोक्त शॉपिंग करता येईल. डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ दुबईत जाण्यासाठी परफेक्ट आहे कारण या काळात तिथे अनेक शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतात. पर्यटकांनी शॉपिंग करावी म्हणून या काळात खरेदीवर भरघोस सुटही देण्यात येते. तेव्हा यंदाच्या सुट्टीत दुबईला जा आणि शॉपिंगचा आनंद लुटा.

दुबईतील बेस्ट शॉपिंग मार्केट्स –

दुबईला गेल्यावर या  ठिकाणी जरूर शॉपिंग करा.

दुबई मॉल –

जगभरातील एक भव्यदिव्य आणि आलिशान मॉल म्हणून ओळख असलेल्या दुबई मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाणं हा एक नेत्रसुखद अनुभव असतो. कारण या मॉलमध्ये जवळजवळ 1500 शॉप आहेत. दुबईमॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी  देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. तुम्हाला या ठिकाणी सर्वात महागड्या आणि ब्रॅंडेड वस्तू मिळू शकतात. शिवाय या मॉलमध्ये शॉपिंगप्रमाणेच आणखी अनेक मनोरंजक गोष्टींचा आस्वाद तुम्ही एकाच वेळी घेऊ शकता. दुबई मॉल प्रमाणेच वाफी मॉल, एमिरेट्स मॉल असे अनेक शॉपिंग मॉल्स दुबईत आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता.

Instagram

ग्लोबल व्हिलेज –

ग्लोबल व्हिलेज मध्ये तुम्हाला फक्त संध्याकाळ नंतरच जाता येतं. ज्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी फिरण्यासोबतच शॉपिंगचा आनंद घेता येतो. एमिरेट्स रोडवरील या विश्वविख्यात शॉपिंग इव्हेंटला भेट देणं आणि मनसोक्त शॉपिंग करणं हा एक आनंददायी सोहळाच असतो. तुम्हाला ग्लोबल व्हिलेजमध्ये शॉपिंग करणं नक्कीच आवडेल कारण तुम्हाला इथे एकाच ठिकाणी निरनिराळ्या देशातील वस्तू खरेदी करता येऊ शकतात. 

गोल्ड मार्केट –

दुबईत या मार्केटला Gold Souk असं म्हणतात. वास्तविक यामुळे दुबईची ओळख ‘सिटी ऑफ गोल्ड’ अशीच आहे. कारण इथे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोन्याच्या दागिन्यांचे चाहते या ठिकाणी सोनं खरेदी करतातच. आश्चर्य म्हणजे इथे सोन्याचं स्वतंत्र मार्केटच उभारण्यात आलेलं आहे. जिथे गेल्यावर सोन्याचे दागिने आणि वस्तू पाहून तुमचे डोळे अक्षरशः दिपतात. एका मागोमाग असलेल्या सोनाराच्या दुकानांतील वस्तू आणि दागदागिने पाहत तुमचं मन तिथेच रमून जातं. पहिल्याच दुकानाच एक अवाढव्य सोन्याची अंगठी आणि सोन्याचा पेहराव तुमचं मन वेधून घेतो. मग सोन्याचे पेन, मोठेमोठे नेकलेस, सोन्याचा बूट, मोबाईल फोन अशा अनेक गोष्टीचं दर्शन तुम्हाला घडत जातं. दुबईत सोने खरेदीवर कर आकारण्यात येत नसल्यामुळे इथे सोनं तुम्हाला इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात मिळतं. त्यामुळे पर्यंटक इथे सोन्याची खरेदी अवश्य करतात.

Instagram

मीना बाजार –

सोनं खरेदी करून झाल्यावर जर तुम्हाला काही लोकल मार्केटमध्ये खरेदी करायची असेल तर या ठिकाणी जरूर जा. या मार्केटमध्ये उत्तम गुणवत्तेच्या मात्र कमी दरातील वस्तू तुम्हाला मिळू शकतात. बरेच पर्यटक कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी या ठिकाणी जातात. मात्र वस्तू खरेदी करताना नीट चौकशी आणि पाहणी करा. कारण हे स्ट्रीट मार्केट असल्यामुळे इथल्या वस्तूंची गॅरेंटी दिली जात नाही. प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी सुंगधित परफ्युम्स, गॉगल्स, घडाळ्यांचे विविध प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात.

टेस्कटाईल मार्केट –

दुबईतील ‘बर दुबई’ या भागात तुम्हाला विविध प्रकारच्या स्ट्रीट मार्केट्समध्ये खरेदी करता येते. इथलं कपड्यांचं मार्केटही फारच प्रसिद्ध आहे. कारण इथे मिळणारं विविध प्रकारचे कापड आणि डिझाईन्स तुम्हाला इतर ठिकाणी नक्कीच सापडत नाहीत. लोकरीच्या आणि पश्मीना वर्कच्या शॉल आणि स्टोल्स, डिझाईनर ड्रेस, जॅकेट्स असं बरंच काही तुम्ही इथे खरेदी करू शकता. 

स्पाईस मार्केट –

स्पाईस अर्थात मसाल्यांच्या खरेदीसाठीदेखील दुबई प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये जगभरातील विविध प्रकारचे मसाले, दुबई स्पेशल बार्बेक्यू मसाला, बिर्याणी मसाला, उत्तम दर्जाचं केशर, मध, सुकामेवा असे अनेक पदार्थ तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. या वस्तू तुम्हाला स्पाईस मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या आणि स्वस्त दरात मिळतात ज्यामुळे तुम्ही विश्वासाने या ठिकाणी खरेदी करू शकता. 

तेव्हा यंदाच्या दुबई टूरला जाताना एक ते दोन रिकाम्या सुटकेस नक्कीच घेऊन जा. ज्यामुळे दुबईत मनसोक्त खरेदी करता येईल. मात्र खरेदी करण्यासाठी या शॉपिंग मॉल्स, शॉपिंग फेस्टिव्हल आणि स्ट्रीट मार्केटमध्ये चालण्याची तयारी नक्की ठेवा. 

Instagram

फोचोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं

 

Read More From लाईफस्टाईल