Travel in India

जंगल सफारीसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन्स

Trupti Paradkar  |  Dec 10, 2019
जंगल सफारीसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन्स

हिवाळा सुरू झाला की पर्यटक वेकेशनचा प्लॅन आखू लागतात कारण हा सिझन फिरण्यासाठी अतिशय बेस्ट असतो. शिवाय हिवाळ्यात तुम्ही भर दुपारीदेखील भटकंती  करू शकता. गुलाबी थंडी आणि मनसोक्त भटकंती असं समीकरण या काळात आपोआप जुळून येतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जंगल सफारी करण्यात एक वेगळीच मौज असते. कारण हिवाळ्यात प्राणी जंगलात मनसोक्त फिरत असतात. थंड वातावरणातून उन्हात भटकण्यासाठी प्राणी घनदाट जंगलातून बाहेर येतात. शिवाय वन्य जीवन, निरनिराळे वनस्पती, प्राणी, पक्षी हे जंगलातील खरं धन असतं. जंगलातील हे अद्भभूत विश्व अनुभवण्यासाठी प्राणी मित्र या काळात जंगल सफारीकडे वळतात. 

 

भारतात जंगलसफारीसाठी बेस्ट आहेत ही वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन्स –

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात जंगल सफारी करणं हा एक रोमांचक अनुभव असतो. जर तुम्हाला समुद्रकिनारा, बर्फाळ प्रदेश, वाळंवट अशा ठिकाणांपेक्षा काहीतरी एडवेंचर करायचं असेल तर एखाद्या वाईल्ड सेन्चुरीला नक्की जा. यासाठीच भारतातील या बेस्ट अभयारण्यांना जरूर भेट द्या. 

जिम कार्बेट, उत्तराखंड –

जिम कार्बेट हे भारतातील एक लोकप्रिय अभयारण्य आहे. ज्यामुळे पर्यटक या ठिकाणी दरवर्षी भेट देतात. ज्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणाची लोकप्रियता इतकी वाढत आहे. खरंतर एका ट्रिपमध्ये जिम कार्बेट फिरून होणं मुळीच शक्य नाही.  त्यामुळे तुम्हाला इथे परत परत जावंस वाटू शकतं. या ठिकाणी जीपमधून जंगल सफारी करायला मिळते. जर तुम्हाला हत्तीवरून सफारी करायची असेल तर हा देखील पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊनही जंगलात जाऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला जंगलसफारीचं प्री बुकींग करावं लागतं. जिम कार्बेटच्या जंगलात वाघ हा प्राणी हमखास दर्शन देते. शिवाय निरनिराळे वन्य जीव, घनदाट जंगल आणि नद्या ओहोळांच्या मधून केलेली जंगल सफारी तुमच्या कायम लक्षात राहील. 

कसे जाल – मुंबई अथवा दिल्ली हवाई मार्गे अथवा दिल्ली वरून रेल्वे मार्गाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 

Instagram

रणथंबोर, राजस्थान –

रणथंबोर नॅशनल पार्क हा टायगर रिझर्व्ह म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी वाघांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रॉयल बंगाल टायगर्स नक्कीच दिसतील. यासोबतच चित्ता, नीलगाय, जंगली डुक्कर, हरणं, सांबर, अस्वल, मगर असे अनेक जंगली प्राणी दिसतील. जीप सफारीमधून तुम्ही या जंगल सफारीचा आनंद लुटू शकता. 

कसे जाल – कोटा एअरपोर्ट हवाईमार्गे अथवा कोटा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही रणथंबोरला जावू शकता. 

Instagram

राजाजी नॅशनल पार्क, उत्तराखंड

राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंडाच्या डेहराडून आणि हरिद्वार यांच्या मध्ये वसलेलं आहे. जर तुम्हाला जंगल सफारी आणि अप्रतिम निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या वाईल्ड सेन्चुरीला अवश्य भेट द्या. दिल्ली पासून अगदी थोड्याच अंतरावर राजाजी नॅशनल पार्क आहे. नेचर लव्हर्ससाठी हे ठिकाण अगदी अप्रतिम आहे. या ठिकाणी तुम्हाला आशियायी हत्ती, चित्ता, वाघ,घोरपड, बिबट्या, अस्वल, हरणे, कोब्रा पाहायला मिळतील. 

कसे जाल -हवाईमार्गे दिल्ली आणि पुढे रेल्वेमार्गाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 

Instagram

दुधवा नॅशनल पार्क, उत्तर प्रदेश

जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जंगल सफारीचा आनंद लुटायचा असेल तर या नॅशनल पार्कला नक्कीच भेट द्या. तुम्हाला इतर नॅशनल पार्कच्या तुलनेत कमी गर्दी आणि निवांतपणा या ठिकाणी अनुभवता येईल. शिवाय काही दुर्मिळ प्रजातीचे प्राणीदेखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. 

कसो जाल – लखनऊ एअर पोर्टवरून अथवा दुधवा रेल्वे मार्गे तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 

Instagram

संजय गांधी नॅशनल पार्क (Sanjay Gandhi National Park)

मुंबईत बोरीवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. 104 क्षेत्रफळात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात अनेक पर्यंटक वर्षभर पिकनिकसाठी येत असतात. या ठिकाणी तुम्ही कान्हेरी लेणी, सिंहविहार, वनराणी अशा विविध ठिकाणी फिरू शकता. कुटुंब अथवा  मित्रमंडळींसोबत तुम्ही या ठिकाणी एक दिवस एकत्र फिरण्यासाठी जाऊ शकता. नॅशनल पार्कमधील वन्यजीव आणि वृक्षवेलींना कोणताही त्रास न देता तुम्ही या ठिकाणी तुमची पिकनिक नक्कीच एन्जॉंय करू शकता. या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. 

कसे जाल – मुंबई पश्चिम रेल्वे महामार्गावरील बोरीवली रेल्वेस्थानकावरून तुम्ही रिक्षा अथवा खाजगी वाहनाने नॅशनल पार्कमध्ये जाऊ शकता. नॅशनल पार्कमध्ये तुम्ही चालत अथवा सायकलवरून फिरू शकता. या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला भाडेतत्वावर सायकल मिळते. 

 

 

 

वाईल्ड लाईफ सेन्चुरीमध्ये फिरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल –

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं

 

 

Read More From Travel in India