मनोरंजन

“भेटली ती पुन्हा 2” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

Dipali Naphade  |  Jul 29, 2021
bhetli ti punha 2

“भेटली तू पुन्हा” या चित्रपटाचा “भेटली ती पुन्हा 2” हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीस येणार  आहे. “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट 28 जुलै 2017 रोजी प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे . त्यामुळे अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. आता पुन्हा ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी आहे. या चित्रपटातून मालिका दिग्दर्शक जयंत पवार यांचे सिनेदिग्दर्शक म्हणून पदार्पण होणार आहे. जयंत पवार हे नावाजलेले असून आता या चित्रपटाचे दिग्दर्शन कसे असणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अधिक वाचा – कोण होणार करोडपती’च्या मंचावर होईल मयूरीची स्वप्नपूर्ती

पूजा आणि वैभवची केमिस्ट्री

नावावरून हा नक्कीच रोमँटिक आणि भावनिक चित्रपट असणार असे दिसून येते आहे. देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज याचित्रपटाची निर्मिती करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर “भेटली ती पुन्हा 2” या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचे दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत. “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी “भेटली ती पुन्हा 2” चे लेखन करत आहेत. अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, “हरवू जरा….”, “जानू जानू….” अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ “भेटली तू पुन्हा” या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेल होताना चित्रपटाच्या कथेने काय वळण घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र पुन्हा एकदा आपली आवडती जोडी दिसणार याचेच प्रेक्षकांना समाधान आहे. 

अधिक वाचा – होम मिनिस्टरमध्ये लिटिल चॅम्प्स मिळवून देणार पैठणीचा मान

पूजा आणि वैभवच्या सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव 

Instagram

पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यानंतर या जोडीला पाहून त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. केवळ चाहतेच नाही तर इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रमैत्रिणींनीही त्यांच्या या नव्या प्रोजेक्टसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट्समध्ये अभिनंदन करत अनेकांनी त्यांना नव्या चित्रपटासाठी ऑल दे बेस्टही केले आहे. पूजा सावंत आणि वैभवचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी एकत्र काम करावं अशी त्यांची इच्छा होतीच. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तसंच पूजा आणि वैभव बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले असून सर्वांना आतुरता आहे. 

अधिक वाचा – श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर, या मालिकेतून येतोय परत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन