भोंडला हा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक खेळ आहे. महाराष्ट्रात विविध प्रातांत त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कुणी या खेळाला भोंडला म्हणतं तर कुणी भुलाबाई. काही ठिकाणी या खेळाला हादगा असंही म्हटलं जातं. नावं वेगवेगळी असली हा या खेळ खेळण्याचा आनंद मात्र सारखाच असतो. या सणाच्या निमित्ताने महिला आणि मैत्रिणी एकत्र येतात आणि सण साजरा करतात. भोंडला मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
काय आहे भोंडल्याचं महत्त्व
अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला नवरात्रौत्सवाला सुरूवात होते. अश्विन महिन्यात सुर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. हस्त नक्षत्राला सुरूवात झाली की भोंडल्याला सुरूवात होते. पाटावर तांदूळ अथवा इतर धान्याचा वापर करून हत्तीचे चित्र काढण्यात येते. त्याशेजारी फुलांची आणि रांगोळीची सजावट केली जाते. हस्त नक्षत्राचं प्रतिक म्हणून हत्तीची पुजा केली जाते आणि त्याभोवती फेर धरून निरनिराळी मराठी लोकगीत गाणी गायली जातात. हा एक खेळ एक सामुदायिक खेळ असल्याने घराच्या आजूबाजूच्या महिला अथवा मैत्रिणी या निमित्ताने एकत्र येतात. पूर्वीच्या काळी महिलांना विरंगुळा म्हणून भोंडला साजरा केला जात असे. त्या निमित्ताने महिलांना एकत्र येऊन सुखदुःख शेअर करण्याची संधी मिळत असे. शिवाय नेहमीच्या कामांचा ताण कमी करण्यासाठी यात मनोरंजनात्मक खेळ खेळले जात असत. मात्र आजकालची जीवनशैली ही फारच धकाधकीची आणि दगदगीची झाली आहे. त्यामुळे या ताणतणावाला कमी करण्यासाठी असे पारंपरिक खेळ आवर्जून खेळले गेले पाहिजेत. ज्यामुळे आपली संस्कृती जपली जाईल आणि विरंगुळाही मिळेल. मराठी शाळांमध्ये अथवा हाऊसिंग सोसायटीमध्ये काही ठिकाणी आजही मोठ्या उत्साहात भोंडला साजरा केला जातो. भोंडल्यासाठी प्रत्येकजण घरातून येताना खिरापत घेऊन येतो आणि मग ती खिरापत एकत्र करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटली जाते. ज्यांनी ज्यांनी भोंडला खेळला असेल त्यांना भोंडल्यांची गाणी नक्कीच आठवत असतील.
जहांगीर आर्ट गॅलरी बद्दल देखील वाचा
भोंडल्यासाठी पारंपरिक गाणी
भोंडल्यात विविध प्रकारच्या गाण्यांचा समावेश केला जातो. पूर्वीच्या काळी रचलेली ही गाणी त्या काळातील परिस्थितीनुसार रचलेली आहेत. मात्र ज्यांनी लहानपणी हा खेळ खेळला आहे. त्यांना ही गाणी नक्कीच आठवत असतील. कोणत्याही कार्यक्रम अथवा सणाची सुरूवात ही गणपतीच्या आराधनेने केली जाते. त्यामुळे यात सर्वप्रथम गायलं जातं ते ‘ऐैलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’. याशिवाय त्याकाळी खेळात वापरण्यात येणाऱ्या घरगुती वस्तू आणि नातीगोती यांचा उल्लेख केलेली अनेक गाणी यात म्हटंली जातात. या गाण्यातून पूर्वी महिला त्यांच्या मनातील भावभावना शब्दात व्यक्त करत असतं. जसं की, एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू, खारिक खोबरं बेदाणा, अडकित जाऊ खिडकीत जाऊ. वास्तविक आताच्या काळाशी या गाण्यांचा मुळीच संबध दिसून येत नाही. मात्र या निमित्ताने जुन्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेचं दर्शन पुढच्या पिढीली नक्कीच घडू शकतं. त्यामुळे भोंडला, हादगा, भुलाबाईसारखे पारंपरिक आणि सामुहिक खेळ आजच्या आधुनिका काळात थोडासा बदल करून आधुनिक पद्धतीने खेळण्यास नक्कीच काहीच हरकत नाही. भोंडला हा केवळ मनोरंजन नाही तर कृतज्ञता व्यक्त करणारा खेळ आहे. कारण नवरात्रीनंतर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. शिवाय हत्ती हे पावसाचे प्रतिक मानलं जातं. पावसाच्या कृपेने धरणीमाता समृद्ध झालेली असते. पिकपाणी भरपूर आलेलं असतं. त्यामुळे या पावसाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे सण आणि खेळ साजरे केले जातात.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी
नवरात्रीसाठी मुंबईत कुठे करता येईल मनसोक्त शॉपिंग
जाणून घ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे महत्व आणि आख्यायिका
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar