मनोरंजन

भूमी पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करत आहे शेती, घरातच पिकवल्या भाज्या आणि फळं

Trupti Paradkar  |  Apr 27, 2020
भूमी पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करत आहे शेती, घरातच पिकवल्या भाज्या आणि फळं

देश सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये आहे. अनेकांना असं घरात अडकून पडल्यामुळे खरंतर वैताग आलेला आहे. कधी हा लॉकडाऊन संपतो आणि आम्ही पुन्हा एकदा आमचं नेहमीचं जीवन जगू लागतो असं प्रत्येकालाच झालं आहे. मात्र काही लोकांनी मात्र या लॉकडाऊनचा काळ चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खर्च केला आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात असा निवांत वेळ काढायचा म्हटला तरी काढणं नक्कीच शक्य नाही हे या लोकांना नक्कीच माहीत आहे. म्हणूनच की काय अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या एक अनोखी गोष्ट शिकत आहे.

Instagram

भूमी शिकतेय हायड्रोपोनिक्स शेतीचं तंत्र

भूमीने लॉकडाऊनच्या काळात तिची खूप दिवसांपासून असलेली एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिला आणि तिच्या आईला खूप दिवसांपासून हायड्रोपोनिक्स शेती करण्याची इच्छा होती. हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे जमिनीवाचून अथवा घरातच पाण्यावर केलेली शेती. भूमीने आणि तिच्या आईने लॉकडाऊनमध्ये या शेतीचं तंत्र शिकून घेतलं. एवढंच नाही तर तिने सेंद्रिय शेतीतून महिन्याभरात मेथी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, वांगं आणि स्टॉबेरी अशा अनेक गोष्टी घरातच पिकवल्या आहेत. भूमीने  घरातच शेतीतून मिळालेल्या भाज्या आणि फळं तिच्या अकाउंटवर शेअर केल्या आहेत. हिरव्या गार भाज्या आणि ताजी फळं पाहून तिचे चाहते तिचं फार कौतुक करत आहेत. 

भूमीची ही आहे कौतुकास्पद कामगिरी

एकीकडे लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडल्यामुळे अनेकांचा वेळ जाता जात नाही आहे. तर दुसरीकडे मात्र भूमीने तिला मिळालेल्या या वेळेचं अक्षरशः सोनं केलं आहे. खरंतर  जगावर आलेल्या या भयानक संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्या आणि फळं मिळणंही कठीण झालं होतं. शिवाय बाजारात मिळत असलेल्या भाज्या, फळं सुरक्षित असतीलच असं नाही. भूमीला मात्र या शेतातून घरातच ताजी आणि पौष्टिक फळं मिळत आहेत. ज्यातून भूमीने अनेकांना खऱ्या अर्थाने स्वावलंबनाचा संदेशही दिला आहे. बऱ्याचदा अभिनेता अथवा अभिनेत्री चित्रपटांमधून आदर्श भूमिका साकारताना दिसतात मात्र खऱ्या आयुष्यात असा आदर्श ठेवणारे नक्कीच दुर्मिळ असतात.  भूमीने आता पर्यंत अनेक हिंदी चित्रपटातून निरनिराळ्या भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र तिने लॉकडाऊनमध्ये जोपासलेला छंद पाहून तर तिचे चाहते नक्कीच चकीत झाले आहेत.लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी भूमी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेसोबत पती पत्नी और वो या चित्रपटातून दिसली होती. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. लवकरत ती करण जोहरच्या तख्तमध्ये झळकणार आहे. या आधी तिने दम लगा के हैशा, बाला, शुभ मंगल सावधान, सांड की ऑंख, टॉयलेट एक प्रेमकथा, भूत अशा अनेक चित्रपटांमधून निरनिराळ्या भूमिका केल्या आहेत

instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

अधिक वाचा –

सुहाना खानच्या जन्मानंतर असं बदललं शाहरूखचं आयुष्य

या अभिनेत्रींनी प्रेग्नंट असूनही घेतला नव्हता अभिनयातून ब्रेक

या कारणामुळे तोडावा लागणार आहे ‘गंगुबाई काठियावाडी’चा सेट

Read More From मनोरंजन