बिग बॉस

बिग बॉस फेम असीम रियाजने खास व्यक्तीला दिली खास भेट

Aaditi Datar  |  Feb 27, 2020
बिग बॉस फेम असीम रियाजने खास व्यक्तीला दिली खास भेट

‘बिग बॉस 13’ फेम असीम रियाज एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यांने बिग बॉस या नावाजलेल्या शोमध्ये फर्स्ट रनर अपचं स्थान मिळवून मनोरंजन उद्योगात स्वतःची वेगळी जागा त्याने बनवली आहे. करिअरमध्ये या स्थानावर पोचण्याचं श्रेय असीमने पूर्णपणे संगीता भाटिया यांना दिलं आहे. कोण आहेत संगीता भाटिया जाणून घेऊया.

संगीता भाटिया या तोएब मॅनेजमेंट कंपनीच्या फाउंडर आहेत. संगीता यांचे आभार मानण्यासाठी असीमने बिग बॉसमध्ये जिंकलेले ‘सुलतानी आखाडा मेडल’ त्यांना भेट दिले आहे. असीमने याबाबत सांगितले की, “हे मेडल संगीता यांचे आहे. माझ्या मॉडेलिंग असाईनमेंट, माझं करियर सर्व तुम्हाला समर्पित आहे. मी आता ज्या पदावर उभा आहे त्यामागे तुमची खरी मेहनत आणि परिश्रम आहे. तोएबने मला माझ्यापेक्षा चांगले समजून घेतले आणि मला करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. मी प्रत्येक गोष्टीबद्दल खरोखर आभारी आहे ”.

असीमने केलेलं कौतुक ऐकून संगीता यांनाही आनंद झाला आणि असीमला त्यांनी धन्यवादही केले. संगीता म्हणाली की, “आज फॅशन जगतात भारतीय चेहरे ओळखले जात आहेत आणि आम्ही सतत या दिशेने कार्य करीत आहोत. नवीन चेहऱ्यांपासून प्रस्थापित चेहऱ्यापर्यंत मॉडेलिंग आणि रंगमंचाच्या दुनियेला तोएबने काही उत्कृष्ट व्यक्तिमत्वं दिली आहेत.”

असीमने संगीता यांना “आईचा” दर्जा देऊन संबोधित केलं. कारण आसीमला जेवढा स्वतःवर विश्वास नव्हता त्याहून जास्त विश्वास संगीता यांनी असीमवर दाखवून त्यांला एक चांगलं मॉडेल आणि अभिनेता बनवण्यासाठी तयार केलं. असीम रियाजने बिग बॉसमधे आपली कामगिरी उत्कृष्ट पद्धतीने साकारली आहे आणि यात काहीही शंका नाही की, असीम या मेडलसाठी पात्र ठरला आहे.

तोएब एजन्सीने बॉलीवूडला दिशा पटाणी, नोरा फतेही, वारिना हुसेन, सपना पब्बी, एहान भट्ट, असीम रियाझ, जॅकलिन फर्नांडिस, प्रभू देवा, सूरज पंचोली, शर्ली सेतिया, टोनी ल्यूक आणि इतर बर्‍याच प्रतिभाशाली कलाकार दिले आहेत.

असीमच्या करियरबाबत बोलायचं झाल्यास तो कश्मिरी असून त्याने मॉडेलिंगने त्याच्या करियरला सुरूवात केली. त्याने अनेक मोठंमोठ्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केलं आहे. याशिवाय त्याने दोनतीन चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या आहेत. वरूण धवनच्या मैं तेरा हिरो या चित्रपटात व्हिलनच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या गुंडापैकी एकाची भूमिकाही त्याने केली होती. पण असीमला आज बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने ओळख आणि प्रसिद्धी मिळाली आहे. लवकरच तो अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच्या एका म्युझिक व्हिडिओमध्येही तो झळकणार आहे.

सिद्धार्थ शुक्लाचे जिंकणे आधीच होते निश्चित,कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला खुलासा

Bigg Boss 13: रश्मी देसाईने केलं अरहान खानबरोबर ब्रेकअप, हिमांशीकडून घरच्यांना निरोप

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From बिग बॉस