लवकरच प्रसिद्ध असणारा मात्र दरवर्षी तितक्याच वादामध्ये सापडणारा ‘बिग बॉस’ चा 14 वा सीझन सुरू होत आहे. यावर्षी कोण कोण स्पर्धक असणार यावरून हळूहळू पडदा उठत असून आता त्याचा टीझर यायला सुरूवात झाली आहे. जान सानू, एजाज खान, निक्की तंबोल यांचा टीझर आल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे ते ‘राधे माँ’ च्या पहिल्या झलकने. स्वतःला देवीचा अवतार सांगणारी सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ यावर्षी या घरामध्ये प्रेक्षकांना दिसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी ‘बिग बॉस’ वर माँ चा आशिर्वाद असणार अशा अफलातून चर्चेलाही सुरूवात झाली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावरही खूपच कमेंट्स येत आहेत. त्यामुळे या वर्षी या शो मध्ये किती आणि काय काय वाद होणार आहेत याचा विचारही करू शकत नाही असंही काही जण म्हणत आहेत.
डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा
गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे विचारणा
सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ ला गेल्या कित्येक वर्षांपासून या शो साठी विचारण्यात येत आहे. मात्र दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने राधे माँ या शो पासून लांबच राहिली आहे. पण यावर्षी मात्र तिचा होकार मिळविण्यात निर्मात्यांना यश मिळाले आहे. आपण देवी आहोत इथपासून ते अगदी अनेक वादांमध्ये राधे माँ चं नाव बऱ्याचदा घेण्यात आलं आहे. तिच्या असण्याबद्दल एक टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहे. घरामध्ये प्रवेश करताना तिला दाखविण्यात आले आहे. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये राधे माँ या शो ला आशिर्वाद देत असून ‘हे घर असंच कायम राहू दे, बिग बॉस यावर्षी खूप प्रसिद्ध होऊ दे’ म्हणताना दिसत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
एका नवोदित अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू
नेहमी विवादांमध्ये राधे माँ
सुखविंदर कौर अर्थात राधे माँ ही गुरदासपुर जिल्ह्यातील असून अतिशय लहान वयात तिला राधे माँ या नावाने ओळख मिळाली. अतियश अजीब वेशभूषा, बोली आणि वेगळ्या तऱ्हेने कोणत्याही समस्यांवर समाधान देणारी म्हणून राधे माँ ओळखली जाते. इतकंच नाही तर ‘आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट’ हे तिचं वाक्य खूपच प्रसिद्ध झालं. ‘बिग बॉस’ च्या चौथ्या सीझनमध्ये आलेल्या डॉली बिंद्राने तर राधे माँ वर 2015 रोजी यौन शोषणाचा आरोपही लावला होता. डॉली बिंद्रा ही राधे माँ ची भक्त होती. पण तिने तिच्याविरुद्ध यौन शोषणाचा आरोप लावत, चंदीगढमध्ये एका पंजाब पोलीस अधिकाऱ्याच्या घरी आपले शोषण करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिने राधे माँ भक्ती करणं सोडून दिलं.
गरोदरपणात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हीही वापरा अनुष्का शर्माच्या टिप्स
याआधी बिग बॉसमध्ये आले होती स्वामी ओम
बिग बॉसमध्ये अशा प्रकारची माणसं येणं काही नवे नाही. याआधी दहाव्या सीझनमध्ये स्वामी ओमने बिग बॉस दणाणून सोडले होते. अतिशय चुकीची वक्तव्य करत स्वामी ओमने हा सीझन गाजवला होता. इतकंच नाही तर बानी जे आणि रोहन मेहरा यांच्यावर आपले मूत्र फेकण्यापर्यंतचे घाण कृत्यही स्वामी ओमने केले होते. त्यानंतर सलमान खानने त्याला घराबाहेर काढले होते. त्यामुळे आता आधीच विवादात असणारी राधे माँ यावर्षीच्या हंगामात काय काय नवे कारनामे करते याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इतकंच नाही तर या घरात येणारे अन्य सेलिब्रिटी तिच्यासह कसे वागतील आणि त्यांना तिच्याकडून कशी वागणूक मिळेल हेदेखील पाहणे यावर्षी बिग बॉसच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक