बिग बॉसमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कोणाचं मन कधी कोणावर येईल आणि कधी नाती बिघडतील हेदेखील कळत नाही. असंच काहीसं घडलं आहे स्पर्धक सोनाली फोगाटच्या बाबतीत. पण तिच्या या वागणुकीमुळे बाहेर सोशल मीडियावर मात्र सोनालीला खूपच ट्रोल केलं जात आहे. भाजपाची नेता सोनाली फोगाट एकदम चर्चेत आली आहे ती तिच्या वागणुकीमुळे. विकेंड का वार नंतर सोनालीच्या स्वभावात अचानक बदल दिसून आला. त्याच दिवशी रात्री सोनालीने निक्की तांबोळीशी भांडण उकरून काढलं. यावरून सोनालीबद्दल नाराजी असतानाच आता तिने असं काही केलं की तिला ट्रोल करण्यात येत आहे.
जुनं ते सोनं’ म्हणत भाग्यश्री मोटेने केले फोटो शेअर, सोशल मीडियावर व्हायरल
अलीबद्दल मनात प्रेमाच्या भावना
अली आणि जास्मिन यांच्याबद्दल आता पूर्ण जगाला कळून चुकलं आहे. असं असतानाही सोनालीच्या प्रेमाच्या चर्चांनाही सुरूवात झाली. वास्तविक सोनालीने अर्शी खानसमोर आपल्याला अली आवडत असल्याचे मान्य केले. तर अर्शीने ही बाब अलीला जाऊन सांगितली. यानंतर सोनालीने अर्शीला असं करायला नको होतं असंही म्हटलं. अलीने हे समजल्यानंतर सोनालीशी जाऊन याबाबत चर्चा केली आणि तिला म्हटलं की अशी भावना कोणाहीसाठी जागृत होऊ शकते. ही गोष्ट त्याने अत्यंत लाईटली घेत शांतपणे हाताळली. अलीने जरी या गोष्टीकडे लाईटली पाहिलं असलं तरीही प्रेक्षकांनी मात्र सोनाली फोगाटच्या गोष्टी अजिबातच लाईटली घेतलेल्या दिसत नाहीत. यावरून सोनाली फोगाटला अत्यंत वाईट तऱ्हेने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सोनालीची खिल्लीदेखील उडविण्यात येत आहे. मुळात सोनाली फोगाट ही नेता असून तिला मोठी मुलगीही आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करत सोनालीला ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.
वरूण धवनच्या लग्नाची लगबग सुरू, या ठिकाणी रंगणार लग्नसोहळा
नवऱ्याच्या मृत्युनंतर पुन्हा झाले होते सोनालीला प्रेम
सोनाली फोगाट आपल्या आयुष्याबद्दल नेहमी बोलताना दिसून येते. मंगळवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये सोनालीने राहुल वैद्यला सांगितले की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडली होती. पण काही कारणांमुळे तिला हे नातं पुढे नेता आलं नाही. त्या व्यक्तीसह आपलं पूर्ण आयुष्य घालविण्याचा विचार सोनालीने केला होता. ही बाब दोन वर्षांपूर्वीची असून नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपण पूर्ण तुटलो होतो असंही सोनाली म्हणाली. पण काही कारणांमुळे तिला या नात्यापासून फारकत घ्यावी लागली होती. अलीबाबत आपल्या भावना खऱ्या असल्याचंही तिने म्हटलं. पण या सर्व गोष्टींमुळे तिला सध्या बाहेर ट्रोल करण्यात येत आहे. तर काहींनी केवळ या गेममध्ये पुढे जाण्यासाठी सोनालीचा हा डाव असल्याचाही अंदाज लावला आहे. इतकंच नाही तर अली हा सध्या इतर स्पर्धकांमध्ये नक्कीच स्ट्राँग आहे आणि त्याच्या मदतीने पुढे जाता येईल असंही प्रेक्षकांना वाटत आहे. पण अलीने ही गोष्ट फारशी गंभीर न घेता खूपच चांगल्या तऱ्हेने हाताळली आहे असंही सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे. अली केवळ जास्मिनसाठी आधी या शो मध्ये आला होता. मात्र जास्मिन गेल्यानंतर आता अली पुन्हा एकदा खेळायला सिद्ध झाला आहे. हा पूर्ण आठवडा अलीने शो चालवला असल्याचंही म्हटलं जात आहे.
अनुप जलोटांनी धारण केला सत्य साईबाबाचा लुक, दिसणार बायोपिकमध्ये
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक