बिग बॉस

Bigg Boss14: डबल एविक्शनचा झटका, एका आठवड्यात कविता कौशिकने गुंडाळला गाशा

Leenal Gawade  |  Nov 2, 2020
Bigg Boss14: डबल एविक्शनचा झटका, एका आठवड्यात कविता कौशिकने गुंडाळला गाशा

वीकेंड का वारमध्ये अनेकांना बोलणी सुनावल्यानंतर सलमान खान निघून तर गेला पण या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाईल याची चर्चा जोरदार सुरु होती.पण आता या नव्या सीझनचा खरा खेळ आता सुरु झाला आहे. कारण एकाच वेळी घरातून दोन सदस्यांना बेघर करण्यात आले आह. अभिनेता निशांत मलखानी आणि कविता कौशिकला या आठवड्यात  बेघर करण्यात आले आहे. घरातील हालचालींना वेग यावा यासाठी अभिनेत्री कविता कौशिक, नैना सिंह आणि शार्दुल पंडित यांचा वाईल्ड कार्ड घरप्रवेश करण्यात आला. पण यापैकी कविताने अगदी एकाच महिन्यात आपला गाशा गुंडाळला आहे. जाणून घेऊया कविताला प्रेक्षकांनी का दाखवला घरचा रस्ता 

Bigg Boss14 :एजाज- कविताच्या मैत्रीत फूट, एजाजवर केले आरोप

एजाजसोबत भांडण पडले भारी

Bigg Boss च्या घरात जास्तीत जास्त काळ कॅमेऱ्यावर दिसण्यासाठी अनेक भांडण किंवा मुद्दे उकरुन काढले जातात. पण प्रेक्षकांचे मनोरंजन करताना कविताने कारण नसताना एजाजसोबत भांडण केल्याचे अनेकांना दिसले.हेच भांडण तिला जास्त भोवले. घरात आत येताना एजाज हा चांगला मित्र असल्याचे सांगत तिने रेड झोनमधून एजाजला बाहेर काढले. पण त्यानंतर झालेल्या कॅप्टनपदाच्या लढाईत कविताचे कॅप्टनपद एजाजकडे गेले. एजाज कॅप्टन झाल्यानंतर त्याचे सगळे वागणे बदलले असे सांगत कविताने एक संपूर्ण दिवस तमाशा केला आणि त्याला नको नको ते बोलली. या सगळ्यामुळे एजाजही फार दुखावला. ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये स्पर्धक पाठवण्याच्यावेळी एजाजने कविताला रेड झोनमध्ये पाठवले. त्यामुळे या दोघांमधील संबंध आणखी खराब झाले. अगदी पहिल्याच आठवड्यात हे सगळे झाल्यामुळे आणि मैत्रीला खोट्यात पाडल्यामुळे कविताला अनेक जणांनी टार्गेट केले. 

निशांतही झाला शांत

निशांत मल्खानीने Bigg Boss च्या घरात एंट्री केल्यावर त्याची बॉडी लॅंग्वेज पाहता तो काहीतरी वेगळा असेल आणि त्याच्या स्ट्रॅटर्जीमुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. पण अगदी दुसऱ्याच आठवड्यात कॅप्टन बनण्यासाठी त्याने केलेल्या नको त्या कॉम्प्रोमाईजमुळे अनेकांना तो डबल ढोलकीही दिसला. आपल्या चुका मान्य न करता केवळ त्या पदावर जाण्यासाठी त्याने मैत्रीत केलेल्या दुहेरी वागणुकीचा फटका त्याला चांगलाच बसला. सलमान खानने ही त्याला यावरुन सल्ला दिल्यानंतर आणि रुबिनाची कटपुतली म्हटल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. गेल्या काही दिवसापासून टास्कमध्येही निशांत उत्तम कामगिरी करु शकला नाही. केवळ मोठा आवाज आणि कोणताही खेळ नसणारा निशांत केवळ मैत्री आणि चुकीच्या निर्णयामुळे अनेकांच्या मनातून उतरला. 

सोनम कपूरने हॅलोविनसाठी केला मर्लिन मुनरो लुक, सोशल मीडियावर झाली ट्रोल

राहुलने मागितली माफी

या घरात खलनायकाची जागा घेतलेल्या राहुलला खुद्द सलमान खानने पाठिंबा दिला. त्याचे वागणे हे कोणत्याही व्हिलनसारखे नाही. असा पुरावाही सादर केला. त्यामुळे जास्मिन- रुबिना- अभिनव-निशांत यांना एक प्रकारे सलमानने चपराक दिली. गेल्या आठवड्यात संपूर्ण घरात केवळ राहुलचा बोलबाला होता. पण टास्क व्यतिरिक्त कोणाच्याही खासगी गोष्टींवरुन राहुलने कमेंट केली नाही. जास्मिनने त्याच्यावर घाणेरडे आरोप लावूनही राहुलने जास्मिनशी बोलून तिची माफी मागितली. जास्मिन वुमन कार्ड खेळत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी आणि सेलिब्सनेही केला. बाहेरचा रोष पाहता राहुलशी या गोष्टी सोडवण्याचा एक हात पुढे केला. 

आता या आठवडयात कोणते सदस्य नॉमिनेट होणार आणि कोणाची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ते लवकरच कळेल.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यची वाढतेय क्रेझ, प्रेक्षकही देतायत दाद

Read More From बिग बॉस