Bigg Boss 14 च्या घरातून राहुल वैद्यने ज्या दिवशी स्वत: हून एक्झिट घेतली. त्या दिवसापासून अनेकांनी हा शो पाहणेच बंद केले आहे.राहुल वैद्यसारखा चांगला स्पर्धक खेळातून बाहेर कसा पडू शकतो आणि त्याला सलमानकडून नेमकी त्याच आठवड्यात घराबाहेर जाण्याची ऑफर का येते? अशा उलट-सुलट चर्चा या सगळ्यात मोठ्या रिअॅलिटी शोविषयी होत असताना आता पुन्हा एकदा राहुल वैद्य घरात परतणार आहे असे कळत आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे मेकर्सना हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कळत आहे. त्यामुळेच या ‘वीकेंड का वार’ मध्ये तो पुन्हा एकदा घरी परतण्याची शक्यता सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन व्यक्त केली जात आहे.
Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी
सोशल मीडियामुळे घेतला का निर्णय
गेल्या आठवड्यात राहुलच्या शॉकिंग एक्झिटचा एक व्हिडिओ सतत प्रोमोमध्ये दाखवला जात होता.हे खरे नसेल असे अनेकांना वाटले. पण रविवारी अचानक राहुलने घरातून जाणे पसंत केले. त्याने स्वत:हून घराबाहेर जाण्यासाठी होकार दिला. पण त्याला अशी ऑफर का देण्यात आली. आतापर्यंतच्या इतक्या सीझन्समध्ये कधीच कोणत्या चांगल्या प्रसिद्ध स्पर्धकाला अशी ऑफर देण्यात आली नाही. पण राहुलला अशाप्रकारे घरातून बाहेर काढणे शोच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, अशा कमेंट्स या सेलिब्रिटींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिला. राहुल वैद्यचे फॅन्स आणि सेलिब्रिटींचा पाठिंबा या सगळ्यामुळे सोशल मीडियावर जिथे तिथे राहुलचीच चर्चा आहे. त्याला परत आणा असे सांगत फॅन्सनी हा रिअॅलिटी शो पाहणार नाही अशी धमकीच देऊन टाकली आहे. साहजिकच, इतकी वर्ष सुरु असणाऱ्या या रिअॅलिटी शोला गालबोट लागू नये म्हणूनच मेकर्सनी हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. पण अद्याप यावर कोणताही खुलासा झाला नाही. पण या बातम्या वाऱ्यासारख्या वाहू लागल्या आहेत.
असं काय झालं की रेस्टॉरंटमध्ये अचानक प्लेट फोडू लागली अर्पिता खान
राहुलची केली जातेय विनवणी
अनेकांनी केलेल्या व्हिडिओतून असे समोर आले आहे की. या खेळात कलर्सच्या रुबिना आणि जास्मिन यांना काहीही करु पुढे आणायचे होते. शिवाय एजाज हा टॉप 2 मध्ये आणण्याची मेकर्सची धडपड राहिली आहे. पण राहुल वैद्य नावाचे वादळ या घरात असल्यापासून त्याला इतर कोणत्याही सेलिब्रिंटीच्या तुलनेत अधिक वोट्स मिळाले आहेत. आता टॉप 4 मध्ये त्याने आपली जागा पटकावल्यानंतर त्याला विजेता म्हणून घोषित केले नाही तर अनेकांना हा खेळ ठरवून खेळला जात आहे असे लक्षात येईल. म्हणून राहुलला काहीतरी कारण काढून घरातून बाहेर काढण्यात आले. पण तो घरातून बाहेर पडल्यानंतरही 48 तास कोणत्याही पोस्ट नव्हत्या. त्यानंतर त्याने सगळ्या फॅन्सचे आभार मानणारी एक पोस्ट देखील केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गायब झाला आहे. मिळालेल्या आणखी एका माहितीनुसार घरातून राहुल बाहेर पडला असला तरी देखील तो अद्याप मेकर्सच्या निगराणीखाली आहे. त्याला गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या कमबॅकची तयारी करण्यात येत आहे. राहुलचा टीआरपी पाहता त्याला पुन्हा एकदा घरी बोलावण्यासाठी त्याच्या विनवण्या केल्या जात असल्याचे कळत आहे.
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावले स्टार्स, सडेतोडपणे मांडली मतं
निक्की, अली गोनी करु शकतात पुन्हा कमबॅक
कमी मतांमुळे बाहेर पडलेली निक्की आणि टास्कमधून स्वत: निर्णय घेत बाहेर पडलेला अली गोनी हे दोघेही वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून पुन्हा एकदा खेळात येणार असल्याचे कळत आहे. सध्या या घरात वेगवेगळ्या सीझनचे 5 स्पर्धक आले आहेत. त्यांच्या येण्यामुळे ढेपाळलेल्या या रिअॅलिटी शोला चार चाँद लागतील असा मेकर्सचा अंदाज आहे.
दरम्यान राहुलच्या येण्याची चर्चा जोरदार असून त्याच्या फॅन्सनी हा आनंद वेगवेगळ्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.