बिग बॉस

Bigg Boss 14 : राखी सावंतचा MBBS केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Leenal Gawade  |  Dec 29, 2020
Bigg Boss 14 : राखी सावंतचा MBBS केल्याचा व्हिडिओ व्हायरल

ड्रामा क्वीन राखी सावंत कधी काय करेल याचा नेम कधीच कोणाला नसतो. आता तिचा व्हायरल होत असलेला नवाच व्हिडिओ पाहा ना! या व्हिडिओमध्ये राखी सावंत MBBS केल्याचा दावा करत आहे. राहुल वैद्य आणि अली गोनी या दोघांनी तिने MBBS केल्याचे सांगते. त्यावर राहुल वैद्य प्रतिक्रिया देताना तिला MBBS चा फुलफॉर्म विचारतो? आणि त्यानंतर जे घडतं त्यावर सगळ्या घरामध्ये एकच हशा पिकतो. घरातच नाही तर घराबाहेर असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये सध्या राखी सावंतच्या या MBBSहोण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. Bigg Boss च्या घरात आल्यापासून राखी सावंत एकदम हिट आहे. तिच्या इंटरटेन्मेंटमुळे अनेकांनी पुन्हा हा शो पाहायला घेतले आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटनंतर फराह खानचे ट्विटर अकाऊंट हॅक

राखी- बटाटा आणि MBBS

https://fb.watch/2GOshSguF8/

राखी सावंत घरात उत्तम जेवण बनवते हे अनेकांनी आतापर्यंत सांगितले आहे. जेवणाच्या तयारीला लागलेल्या राखी अली आणि राहुलमध्ये ही चर्चा होताना दिसत आहे. राखी बटाटा चिरताना त्याचे फायदे सांगत म्हणते की, बटाटा खाल्यामुळे हार्टचे ब्लॉकेजेस उघडण्यास मदत मिळते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहते. बटाटा खाल्यामुळे जो ढेकर येते. त्या ढेकरामधून ब्लॉकेजेस कमी होतात. राहुल वैद्यला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने राखीला मुद्दाम MBBS चा अर्थ विचारला. तो विचारण्यासाठी राखी बाहेर जाते आणि अभिनवला MBBS चा फुलफॉर्म विचारला त्यावर अभिनवलादेखील त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही. त्यामुळे राखीनेच स्वत:चे डोके लावत याचा असा फुलफॉर्म सांगितला की, ज्यामुळे सगळीकडेच हशा पिकला. 

Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग

राखी सावंत असते कायम हिट

राखी सावंत या खेळात ज्या दिवसापासून आली आहे. त्या दिवसापासून ती काहीना काही करतच आहे. इतरांना न दुखावता तिला खेळायला आवडते असे सध्या दिसले तरी इकडे तिकडे गोष्टी सांगणे आणि त्यातून काहीतरी मनोरंजक गोष्टी तयार करण्यामध्ये तिचा हातखंडा आहे. तिचे हेच वागणे तिच्या प्रेक्षकांना आवडत असावे. म्हणूनच घरात तिचे सगळ्यांशी सूत जुळले आहे. राखी सावंत तिचा प्रत्येक दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात घालवते. घरातील सगळ्या खेळांमध्ये सहभागी होत सगळ्यांना आनंद देण्याचे काम करते हे मात्र नक्की! 

जास्मिन भसीनवर चिडली राखी

नव्या अपडेटनुसार राखी आणि घरातील स्पर्धक जास्मिन भसीन यांची जबरदस्त भांडणं झालेली आहेत. टास्क दरम्यान झालेल्या या भांडणानंतर राखी जो काही ड्रामा करते ते पाहून हसावे की रडावे हे अर्थातच कोणालाही कळत नाही. त्यामुळे हा एपिसोड तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पाहायला हवा. 

राखी- राहुलची मैत्री

घरात येण्यापूर्वी राखी सावंतचा आवडता खेळाडू हा राहुल वैद्य होता. पण आता घरात आल्यानंतर तिने बरीच गणित बदलेली आहेत. सध्याच्या घडीला ती या घरात अभिनव- रुबिनाच्या जास्त जवळ असताना दिसत आहे. राहुल वैद्यशी वैर नसले तरी देखील त्यांच्यासोबत आपले नाते टिकवून ठेवण्यासाठीही ती त्यांच्याशी चांगलीच राहताना दिसत आहे.

राखीचा हा कारनामा  अजून किती दिवस चालणार आणि राखी खेळात आणखी किती मजा आणणार हे येत्या काळात नक्कीच कळेल. 

कपिल शर्मा शोमध्ये परत येणार का सुंगधा मिश्रा, केला मोठा खुलासा

Read More From बिग बॉस