बिग बॉस

Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात होणार पुन्हा राडा

Leenal GawadeLeenal Gawade  |  Dec 3, 2021
असा झाला नुसता राडा

 सीझन 3 साठी कॅप्टनसी कार्य म्हणजे नुसता राडा… असंच झालं आहे. घरात कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये जुंपली नाही तर ते कॅप्टन्सी कार्य कसलं? असंच म्हणून आपलं समाधान मानावं लागत आहे. फिनालेच्या जवळ पोहोचत असताना आता कोणालाही घरातून बाहेर पडायची रिस्क घ्यायची नाही. आता सगळ्यांना या घरात टिकून राहण्यासाठी इम्युनिटी हवीहवीशी झाली आहे. त्यामुळेच या आठवड्यातील घराचा कॅप्टन होण्यासाठी घरामध्ये जी काही गुंडगिरी आणि मारामारी सुरु आहे ती प्रोमोतून पाहताना ‘आरारारा खतरनाक’ असेच म्हणावेसे वाटते. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया.

जय आणि उत्कर्षला विशाल पडला भारी

घरात विशालला झालंय तरी काय? असा प्रश्न पडलेला असताना आता विशाल इज बॅक असे म्हणावे लागेल. कारण नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये घरात सुरु असलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये विशाल, मीनल चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. कॅप्टन्सीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून लढणारे विकास, विशाल, मीनल, सोनाली यामध्ये पुन्हा खेळताना दिसून आले आहेत. प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार विशाल हा जय आणि उत्कर्षला चांगलाच भारी पडला आहे. महेश मांजरेकर दर आठवड्याला येऊन राड्यांविषयी बोलत असतात.विशेषत: जय हा खेळात बरेचदा चिडतो. आपला पराजय दिसू लागला की, जयला अजिबात सहन होत नाही असे दिसते. अशावेळी तो अंगावर धावून जातो. यावेळी खेळात जय आणि उत्कर्ष यांनी आपल्या सीमा पार केल्या आहेत. कारण टास्कदरम्यान त्यांनी विशालला नाहक ओढले आहे. त्यामध्ये तो जखमी झालाय असे देखील दिसत आहे. त्यामुळे सर्वार्थाने विशाल जय-उत्कर्षवर भारी पडला आहे.

टीम A मधून गायत्री पडली बाहेर

शाळेत ज्याप्रमाणे टग्या मुलांचा ग्रुप असतो अगदी तसाच ग्रुप या घरात दिसून आला तो जय, उत्कर्ष, मीरा, गायत्री, दादूस, अक्षय, सुरेखा यांचा या गटात सुरुवातीपासून अनेक जण जोडली गेली. तर विकास, विशाल, सोनाली, मीनल हे कायम एकत्र राहिले. कमी संख्या असल्याचा फटका कायम दुसऱ्या टीमला झाला. कायम त्यांना बहुमत मिळाले नाही. पण गेम जसा पुढे सरकत गेला तसा जय-उत्कर्षच्या टीममधील अनेक खेळाडू हे घराबाहेर पडले. त्यामुळे आता जय-उत्कर्ष-मीरा इतकीच टीम राहिली आहे. या गटातील मुख्य चेहरा गायत्री ही देखील यातून बाहेर पडत सोनाली आणि मीनलमध्ये जाऊन बसू लागली आहे. त्यामुळे आता जय-उत्कर्ष- मीरा असे तिघेच राहिलेले दिसत आहे

चावडीवर कोणाची घेणार शाळा

 महेश सरांची चावडी ही खास जय- उत्कर्ष आणि मीरा यांच्या राड्यासाठीच असते. सगळ्या चुका करुनही कायम गीरे तो भी टांग उपर अशा प्रकारे त्यांचे घरात वावरणे असते. त्यामुळे आता या कॅप्टन्सी टास्कला घेऊन कोणाला ते बोल सुनावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

वाचा- Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा

हा आठवडा होता इमोशनल

आता फिनाले जसा जवळ येऊ लागला आहे तसा खेळ हा अधिक चुरशीचा होऊ लागला आहे. त्यामुळे आता घरातील सदस्यांना बळ मिळवून देण्यासाठी सदस्यांना त्यांच्या कुटुंबाची भेट घडवण्यात आली. सगळे आपल्य कुटुंबातील लोकांना पाहून इतके भावूक झाले की, त्यांना टास्क खेळण्यासाठी अधिक जोश आलेला पाहायला मिळाल आहे. 

आता कोण होईल कॅप्टन याचा निकाल लवकरच लागेल. दरम्यान तुम्ही हा राडा पाहिला नसेल तर नक्की पाहा

Read More From बिग बॉस