बिग बॉस

Bigg Boss मराठी: पहिल्याच आठवड्यात मिराची घेतली महेश मांजरेकर यांनी शाळा

Leenal Gawade  |  Sep 26, 2021
मिरा जगन्नाथ

Bigg Boss मराठीच्या तिसरा सीझनचा पहिला आठवडा पूर्णपणे धमाकेदार होता. यामध्ये इमोशन, ड्रामा, आनंद, भांडणं असे बरेच काही बघायला मिळाले. त्यामुळे पहिलाच आठवडा चांगलाच हिट ठरला होता. आठवड्याच्या शेवटी महेश मांजरेकर यांना देखील बोलण्यासाठी बरेच काही मिळाले. पहिला आठवडा पाहता काही जणांनी खेळण्याच्या नादात आपला खेळ आधीच उघड केला आहे. तर काही जण या घरात असूनही दिसत नाही. पहिल्याच आठवड्यात मिरा जगन्नाथ आणि उत्कर्ष यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

मिराला ऐकून घ्यायची नाही सवय

पहिल्याच आठवड्यात चर्चेत आलेली मिरा जगन्नाथ हिला पहिल्या आठवड्यात खूप चांगली प्रसिद्धी मिळाली असे तिला जरी वाटत असले तरी देखील तिचा हा गेम पहिल्या दिवसापासूनच सुरु झाला आहे आणि त्याचा अंदाज अनेकांना आला आहे. तिचे काही मुद्दे आणि भांडणं पाहता मिराला महेश मांजरेकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. ‘एखादे हट्टी लहान मुलं योग्य वेळी सुधरले नाही तर त्याला मोठे झाल्यावर एक चापट मारावीशी वाटते. अगदी तशीच मिरा सध्या दिसत आहे. मला हे हवं मला ते हवं म्हणून उगाच हट्ट करणारी असा हा स्वभाव मिराचा असल्यामुळे तिचा खेळ हा कारण नसताना उगाच भांडण करायची असा दिसून येताना हे सांगताना ते दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात मिराला अशा पद्धतीने शाळा घेतल्यामुळे ती आता बदलणार की, तिचे असे वागणे पब्लिसिटी सुरु राहणार का ते पुढच्या आठवड्यात नक्कीच कळेल.

उत्कर्ष डबलढोलकी

नव्या सीझनचा पहिला कॅप्टन डॉ. उत्कर्ष शिंदे हा खेळात विजय मिळवून त्या पदावर पोहोचला आहे. पण अगदी पहिल्याच आठवड्यात आपले साध्य करण्यासाठी त्याने एकाचे दुसऱ्याला आणि दुसऱ्याचे मत तिसऱ्याला असे सांगितले. पण असे असले तरी खेळात त्यांचे वेगळेच रुप दिसून आले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक खूप जणांनी केले आहे.  टास्कच्या बाबतीतही उत्कर्षची बाजू ही महेश मांजरेकरांनी घेतली आहे. त्यामुळे त्याचा खेळ त्याला अत्यंत सावध असा खेळावा लागणार आहे.

दादूसने जिंकले मन

या घरातील अत्यंत साधे असे व्यक्तिमत्व म्हणजे दादूस अर्थात संतोष चौधरी. अगदी पहिल्याच दिवसापासून यांना या घरात कॉर्नर करण्यात आले. पण तरी देखील दादूस या घरात टिकून आहे. चिऊताईचा टास्क सुरु असताना  दादूस यांनी अक्षयने बनवलेला जो काही पदार्थ होता तो अगदी न कारणं देता खाल्ला होता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना हे खाऊ नका असे सांगण्यात आले.त्यांनी केलेला टास्क हा उत्तम असतानाही त्यांना या खेळात कोणीही जिंकू दिले नाही. शेवटी महेश मांजरेकर यांनी त्याची बाजू उचलून धरली आणि त्यांना या आठवड्याचा बेस्ट प्लेअर म्हणून घोषित केले. 

आविष्कारला दिली तंबी 

आविष्कार आणि स्नेहा वाघ यांच्या नात्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होताना दिसत आहेत. त्यांच्या गत आयुष्यातील खासगी गोष्ट त्याने एकदा दोनदा चर्चिण्याचा प्रयत्न केला आहे. पण असे करत जाऊ नकोस अशी तंबी त्याला महेश मांजरेकरांनी दिली आहे. इतकेच नाही. तर त्याला घरातील कामांमध्ये आणि टास्कमध्ये दिसत जा असा देखील सल्ला देण्यात आला आहे. 

या आठवड्यात घरातून कोणीही इलिमिनेट झालेले नाही. पण पुढील आठवड्यात नक्कीच एक सदस्य बेघर होणार आहे.

Bigg Boss मराठी : मीरा जगन्नाथ होऊ पाहतेय का निकी तांबोळी

Read More From बिग बॉस