बिग बॉस

Bigg Boss Marathi: पहिल्या भागापासून लक्ष वेधून घेतोय जय दुधाणे

Dipali Naphade  |  Sep 22, 2021
jay dudhane

बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) नुकताच सुरू झाला आहे. अनेकांना हा सीझन आवडतोय तर अनेक जण यावर टीका करत आहेत. हवे तसे मराठीतील तगडे कलाकार सहभागी झाले नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र पहिल्या दिवसापासून यावेळी लक्ष वेधून घेतलं आहे ते रांगड्या जय दुधाणे (Jay Dudhane) या स्पर्धकाने. स्प्लिट्सविला (Splitsvilla) या रियालिटी शो चा अनुभव असणारा जय पहिल्याच भागापासून अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वांचेच लक्ष वेधण्यात जय यशस्वी झाला आहे. आपल्या दिसण्यासह आपल्या वागण्याबोलण्यानेही तो सध्या मनं जिंकत आहे. पहिल्याचा टाकाऊ आणि टिकाऊ या टास्कमध्ये घरातील बऱ्याच जणांना जय टिकाऊ वाटला असून पहिल्याच आठवड्यात तो सुरक्षित झाला आहे आणि पुढेही अगदी शेवटपर्यंत राहील अशी घरातील स्पर्धकांनाच नाही तर अगदी प्रेक्षकांनाही त्याच्याकडे बघून खात्री वाटते आहे. 

अधिक वाचा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

कोण आहे जय?

जय दुधाणे एक प्रसिद्ध जिमनॅस्ट आणि फिटनेस ट्रेनर आहे. राष्ट्रीय स्तरावर जिमनॅस्ट म्हणून त्याने कामगिरी केली असून राज्य स्तरावर लाँग जंपर म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याशिवाय एक मॉडेल आणि अभिनेता म्हणून जय आता आपल्या कारकिर्दीला सुरूवात करत आहे. 25 जुलै, 1998 रोजी जयचा जन्म झाला असून जयने आतापर्यंत स्वतःच्या कष्टाने सर्व काही कमावले आहे. ठाण्यामध्ये त्याचे स्वतःचे जिम असून तो कोच म्हणूनही काम पाहतो. जय अतिशय फिटनेस फ्रिक (Fitness Freak) असून त्याने कमावलेल्या शरीरयष्टीकडे पाहून याचा अंदाज येतच आहे. त्याच्या लुकने अनेकांना घायाळ केले आहे. मुळात मराठी बिग बॉसमध्ये आल्यानंतर उगीचच इंग्रजी शब्दांचा वापर न करणे हे जयचे वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा मराठी मुले आणि मुलीही आपल्याला मराठी येत नाही असं दाखवतात मात्र जय अतिशय स्पष्ट आणि उत्तम मराठी बोलताना दिसून येतो आणि हीच त्याची सर्वांना जिंकून घेण्याची खासियत आहे असे म्हणावे लागेल. सलमान खान आणि जॉन अब्राहम हे दोन्ही अभिनेते जयचे आदर्श आहेत. त्याच्याकडे बघून कोणालाही हा अंदाज येऊ शकतो. 23 वर्षाचा जय अविवाहित असून सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिमरन बावा (Simaran Bawa) हिला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जयचे सोशल मीडियावरदेखील खूपच फॅन फॉलोईंग आहे. या शो नंतर त्याला अधिक काम मिळेल असंच सध्या चित्र आहे.

अधिक वाचा – Bigg Boss मराठी : स्पर्धकांवर होतेय या गोष्टींमुळे टीका

भांडणामध्येही मुद्देसूद जय

बिग बॉसच्या घरात पहिलाच वाद झाला तो जय आणि मीरा जगन्नाथ यांच्यामध्ये. पण भांडणामध्येही अगदी मुद्देसूद आणि उगीच आरडाओरडा न करता जयने आपले मुद्दे मांडले आणि हेच प्रेक्षकांना अधिक आवडले आहे. तसंच सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचे आणि तरीही आपला वेगळेपणा सिद्ध करायचा हे जयने जाणले आहे आणि तो तेच करत आहे. त्यामुळे या खेळात पुढे जाण्यासाठी त्याला चांगलीच संधी आहे असंही त्याचे चाहते आता म्हणून लागले आहेत. तर अगदी पहिल्याच आठवड्यात जयचे फोटोही व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे आता पुढे नक्की जय काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

अधिक वाचा – दीपिका पादुकोण पी व्ही सिंधूसोबत खेळतेय बॅडमिंटन, सुरू झाली बायोपिकची चर्चा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस