बिग बॉस

‘बिग बॉस’ मराठीचे तिसरे पर्व 19 सप्टेंबरपासून, प्रतिक्षा संपली

Dipali Naphade  |  Aug 27, 2021
bigg boss marathi

अखेर तो क्षण आला आहे. प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. ‘बिग बॉस’ मराठीचे (Bigg Boss Marathi) तिसरे पर्व कधी येणार आणि यामध्ये कोणकोणते मराठी कलाकार दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. कलाकार कोणते असणार हे जरी अजून गुलदस्त्यात असले तरीही 19 सप्टेंबरपासून हे नवे पर्व चालू होणार असल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसून येत आहे. मेघा धाडे आणि शिव ठाकरे यांनी दोन सीझन गाजवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता नव्या सीझनमध्ये नक्की कोणकोणते कलाकार दिसणार आणि कशी असेल नव्या कलाकारांची स्ट्रॅटेजी याचा अंदाज लावायला प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी सुरूवात केली आहे.

अधिक वाचा – Bigg Boss OTT: मराठमोळ्या राकेशच्या प्रेमात पडली का शमिता शेट्टी

अनलॉक एंटरटेनमेंट आहे टॅगलाईन

‘अनलॉक एंटरटेनमेंट’ अशी टॅगलाईन घेऊन हे नवे पर्व येत आहे. कलर्स मराठी वाहिनीवरच या नव्या पर्वाला सुरूवात होणार असून तिसऱ्या हंगामाच्या निवेदनाची धुरादेखील महेश मांजरेकर यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच प्रेोमोमध्ये काहीतरी धमाल असणार याची खात्री महेश मांजरेकरांनी चाहत्यांनी दिली आहे. यावेळी घरात नक्की कोणकोणते कलाकार असतील आणि आपल्या आवडत्या कलाकारांचा यामध्ये समावेश असेल की नाही याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. अल्पावधीच हा प्रोमो व्हायरल झाला असून असंख्य लाईक्स आणि कमेंट्स या प्रोमोला मिळत आहेत. तर यावेळी बिग बॉस मराठीच्या घराचा सेट कसा असणार, कोणकोणते खेळ रंगणार आणि यावेळी निवेदक म्हणून महेश मांजरेकर काय वेगळे करणार या सगळ्याचीच उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या दिवशीचा मुहूर्त पाहून आता हे नवे पर्व सुरू होत आहे. प्रेक्षकांसाठी हा नवा हंगाम अनलॉक करण्यात येणार आहे. मनोरंजन हमखास मिळणार अशी ग्वाहीच एक प्रकारे या प्रोमोमधून देण्यात आली आहे. 

अधिक वाचा – तारा सुतारियाने का नाकारली कार्तिक आर्यनसोबत ‘फ्रेडी’मधली भूमिका

आता केवळ कलाकारांची प्रतिक्षा

हे पर्व कधी सुरू होणार याची जरी प्रतिक्षा संपली असली तरीही यावर्षी मराठी कलाकारांची कोणती फौज असणार याची प्रतिक्षा मात्र संपलेली नाही. याआधी संग्राम समेळ, नेहा जोशी या कलाकारांच्या नावाची चर्चा होती. मात्र या दोन्ही कलाकारांनी याबाबत कोणताही होकार अथवा नकार मीडियाशी बोलताना सांगितलेला नाही. साधारण या खेळात 12 खेळाडू असतात. पहिल्या दोन्ही पर्वात तगडे खेळाडू होते. त्यामुळे आता नक्की कोणते असे कलाकार यावेळी होकार देतील याचीही उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. यावेळी मोठ्या कलाकारांची नावे असावीत अशीही चाहत्यांची इच्छा आहे. हिंदी बिग बॉसचे पर्व नेहमीच गाजते कारण प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार नेहमीच यामध्ये सहभागी होत असतात. पण मराठी कलाकारांसाठी हे जरा नवीनच आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत नक्की कोण सहभागी होणार, कोण कोणाचे मित्र होणार आणि कोण कोणाचा शत्रू होणार हेच बघण्यासाठी सगळे तयार आहेत. पण आता काही दिवसांची यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 19 सप्टेंबरपासून हे पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाल्याचे सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे.

अधिक वाचा – महाएपिसोडनंतर प्रेक्षकांचा संताप, येऊ कशी तशी मी नांदायला बंद करण्याची मागणी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस