बिग बॉस

Bigg Boss Marathi: पुन्हा स्नेहा फसेल का जयच्या गोड बोलण्याला

Leenal Gawade  |  Dec 9, 2021
बिग बॉस मराठी

 नको ती नाती वाचवताना खेळातून बाहेर पडलेली स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आली आहे. गेल्यावेळी जयला वाचवताना स्वत:ला नॉमिनेट करुन घेतलेल्या स्नेहाला घराबाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थाने खेळ कळला. त्यामुळे आता पुन्हा घरात आल्यानंतर ती अधिक कडक आणि आपल्या मतांवर ठाम असताना दिसली आहे. जयने जे केले ते तिने नॅशनल टेलिव्हिजनवर परत सांगितले खरे. पण कधी कधी स्नेहा आणि जयचे बोलणे पाहता ती पुन्हा एकदा या ट्रॅपमध्ये फसेल की काय? अशी शंका अनेकांना वाटू लागली आहे. अनेकदा स्नेहाने हा आव आणला आहे असे देखील खूप जणांना वाटत आहे. पण असे असतानाही स्नेहा काही गोष्टीत आपले निर्णय घेताना दिसतेय हे नक्की!

तरीही स्नेहाने केले नॉमिनेट

स्नेहाने घरी आल्यानंतर जो काही हायबोल्टेड ड्रामा केला त्यांनतर ही स्क्रिप्ट आहे की, ती खरंच तिच्या मनातील भावना बोलून दाखवते असा प्रश्न घरातील सदस्यांनाही पडला होता. त्यानंतर जयने आपला हात फोडून घेतला. हा सगळा ड्रामा उभा महाराष्ट्र पाहात होता. दोघांमध्ये कोणतेही नाते नसताना अशापद्धतीने केवळ मैत्रीसाठी असे कोण करतं? असा प्रश्द देखील खूप जणांना पडला. त्यानंतर खूप वेळा जयने स्नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याप्रत्येक वेळी दोघांच्या डोळ्यात जे गोड हसू दिसले त्यामुळे अनेकांना कळून चुकले की हा ड्रामाच आहे. पण थांबा कारण लगेच यावर पोहोचण्यात काहीच अर्थ नाही. कारण चक्क स्नेहाने जयला नॉमिनेट करण्यासाठी पाठिंबा दिलाय. इतकेच नाही तर उत्कर्ष आणि जय या दोघांना नॉमिनेट करण्यासाठी तिने पाठिंबा दिला. त्यामुळे स्नेहा खरंच या खेळामध्ये अॅक्टिव्ह झालेली दिसत आहे.

वाचा: कशासाठी मराठी अभिनेत्री करतायत #BanLipstick

उत्कर्षचा खेळ मंदावला

घरात उत्कर्ष हा मास्टर माईंड दिसून आला आहे. पण आता त्याचा खेळ कुठेतरी बुजलेला दिसत आहे. जयसोबत राहून त्याचा खेळ बुजलेला दिसत आहे, असे खूप जणांना वाटते. आठवडाभर चांगला गाजवून सुद्धा आठवड्याच्या शेवटी त्यांना महेश मांजरेकरकडून नेहमीच ओरडा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचे कुठेतरी चुकते हे सांगून मांजरेकरांना आणि ते सतत बघून लोकांनाही कंटाळा आला आहे. पण आता जर उत्कर्षला खेळात टिकायचे असेल तर त्याने काही गोष्टींचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. 

विकासलाही कसावी लागेल कंबर

विकास पाटील या घरातील दुसरा मास्टर माईंड आहे. पण त्याला या घरात आणि घराबाहेर काही लोकांकडून सपोर्ट मिळतो असा दिसत नाही. फिजिकल टास्क न करता तो त्याच्या डोक्याने खेळ खेळतो. पण आता घरात केवळ दोन आठवडे शिल्लक असताना त्याला कंबर कसणे गरजेचे आहे. कारण कॅप्टन होण्यसाठी त्याची सुरु असलेली धडपड त्याला करण्याची गरज नाही. कारण त्याला या खेळात प्रेक्षकांच्या मतांनी अगदी पहिल्या आठवड्यापासून वाचवले आहे. तर विशालही अगदी पहिल्या दिवसापासून चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. आता घरात आठ सदस्य शिल्लक असून या पैकी नक्कीच 5 जणांना ग्रँड फिनलेमध्ये जाण्याची संधी मिळेल यात काहीही शंक नाही. 

स्नेहा घरात आल्यापासून काय काय करेल? आणि ती जयला धडा शिकवेल की त्याच्या जाळ्यात फसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Bigg Boss15: अखेर तेजस्वी आणि करणने व्यक्त केले प्रेम

Read More From बिग बॉस