बिग बॉस

Biggboss Marathi 3: विकासला पाहून होते का राहुल वैद्यची आठवण

Leenal Gawade  |  Sep 30, 2021
विकास पाटील

Biggboss Marathi 3 चा खेळ जसजसा पुढे जाऊ लागला आहे. तसतसे अनेकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. टीव्हीवर दिसणारे काही सोज्वळ कलाकार या घरात प्रत्यक्ष वेगळे आहेत हे देखील दिसून आले आहे. घरात पहिल्या दिवशी टफ वाटणारे कलाकार आता काहीसे मागे पडताना दिसत आहेत. तर काही कलाकार आता नव्याने या शो मधून पुढे येताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात शांत किंवा चुगल्या करतो अशी काहीशी इमेज झालेला स्पर्धक अभिनेता विकास पाटील आता पूर्णपणे वेगळा आहे ते दिसून आले आहे. ज्याप्रमाणे हिंदी बिग बॉसमध्ये गायक राहुल वैद्य हा अचानक पुढे आला आणि सेमी फिनाले पर्यंत येऊन पोहोचला अगदी तसाच विकास पाटील देखील आता या शोमध्ये राहुल वैद्यची आठवण करुन देत आहे. जाणून घेऊया विकासमुळे का होतेय राहुलची आठवण 

Biggboss मराठी 3 : स्नेहा आणि आविष्कारमध्ये पडणार वादाची ठिणगी

वुमन कार्डचा खेळ

जर तुम्ही गेल्या वर्षीचा हिंदीचा सीझन पाहिला असेल तर पहिले काही आठवडे घरात राहुल वैद्यची इमेज सगळ्यांनी महिलांविरोधी अशी केली होती. राहुल वैद्य महिलांचा आदर राखत नाही. त्याला इतरांचा कोणताही आदर नाही अशा काही गोष्टी व्हायरल होऊ लागल्या होत्या. घरात रुबिना, जास्मिन, पवित्र पुनिया, एजाज खान, अभिनव शुक्ला  यांनी त्याच्या विरोधात जणू मोहीमच आखली होती. पण ज्यावेळी सलमान खानने त्याची बाजू घेत तो असा अजिबात नाही हे सांगितले त्यावेळी अनेकांचे डोळे उघडले. सध्या Biggboss Marathi 3 च्या घरातही असेच काहीसे दिसून येत आहे. विकास पाटील याने आपला गट तयार करायचा विचार केल्यावर त्याच्याविरोधात घरात काही लोकं उभे राहिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मीरा, गायत्री, स्नेहा या त्याला आता नको ते बोलून टार्गेट करत आहेत. त्याच्यावर अनेक पर्सनल कमेंट देखील करत आहेत. घरात टास्कच्या दरम्यान दुसऱ्या टीमच्या सदस्यांनी लपवलेले सामान घेण्यासाठी ज्यावेळी विकास स्टोअर रुममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याला स्नेहाने अडवलं. अनेकदा स्नेहाला विनंती करुनही ती बाजूला झाली नाही तेव्हा त्याने थोडासा जोर लावून आत जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो सफल देखील झाला. पण स्नेहा हिने वुमन कार्ड खेळत धक्का लागल्याचे सांगितले. त्याला गायत्री आणि मीरा यांनी तमाशा करत सपोर्ट देखील केला. त्यामुळे आता गायत्री आणि मीरामुळे घरात वातावरण हे बऱ्यापैकी खराब झालेले दिसून येत आहे. आता या खेळात विकासला राहुलप्रमाणेच एकटे पाडले जात आहे. पण यातूनच नक्की तो पुढे येऊन त्याच्या फॅन्सचे मन जिंकेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे.

गायत्रीमुळे बिघडू लागलाय का जयचा खेळ

 जय दुधाणे हा खेळाडू अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. रिअॅलिटी शोचा अनुभव असलेला हा मातब्बर खेळाडूने अगदी पहिल्याच दिवशी सगळ्यांचे मन जिंकले खरे पण आता मात्र तो काही वेळा नको त्या मुद्द्यांमध्ये पडून आपली इमेज खराब करुन घेत असल्याचे दिसत आहे.  गायत्रीमुळे त्याचा खेळ हा पूर्णपणे वाया जाताना  दिसत आहे. गायत्री आणि मीरा एखाद्याला ज्या पद्धतीने टार्गेट करते अगदी तसाच जय करताना दिसत आहे. जो स्पर्धक खेळण्याच्या इराद्याने आला होता तो घरात टिकण्यासाठी कपट करताना दिसत आहे. जे खूप जणांना पटेनासे झाले आहे. त्यामुळेच की काय आता जयचा खेळ बिघडू लागला आहे असेच दिसत आहे. 

दरम्यान, विकास पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम राहिला आणि त्याची विशालची मैत्री टिकून राहिली तर अली गोनी- राहुल वैद्य अशी एक छान मैत्री यामध्ये नक्की दिसून येईल. 

Biggboss Marathi season 3 : लहानपणी खूप खोडकर होता बिग बॉस मराठी मधला हा स्पर्धक

Read More From बिग बॉस