फॅशन

टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज गळा डिझाईन (Blouse Back Designs In Marathi)

Sneha Ranjankar  |  Nov 26, 2018
Stylish Blouse Back Designs In Marathi

सणवार किंवा लग्न असो वा नसो तुम्हाला नेहमीच पार्टी ड्रेसेसची गरज तर लागतेच आणि जर तुम्ही साडी नेसत असाल तर ब्लाउज गळा डिझाईन कसं शिवायचं, ब्लाऊजचा गळा कोणती फॅशन करायची? असे प्रश्न नेहमी पडतातच. आजकाल तर ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या ब्लाउज गळा डिझाईन ची इतकी फॅशन आली आहे. पण जेव्हा तुम्ही टेलरकडे जाता तेव्हा मात्र तुम्हाला त्याच जुन्या ब्लाऊजचा गळाचे ऑप्शन्स तो दाखवतो. पण तुम्हाला हव्या असतात नवीन ट्रेंडी ब्लाउज गळा डिझाईन आणि तुम्हाला नेमकं कोणतं ट्रेंडी डिझाईन हवं आहे, हे त्याला धड समजावताही येत नाही. ह्या गोंधळामुळे तुमचा ड्रेस किंवा ब्लाऊज स्टायलिश कसा होणार? असा तुम्हाला प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमचा हाच प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. पहा 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाईन्स, ज्यामुळे तुम्ही दिसाल एकदम हटके.

10 स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाईन्स (Stylish Blouse Back Designs In Marathi)

1. सिंपल डोरी

साडीवरचा ब्लाऊज असो वा स्कर्ट किंवा तुमचा एखादा ड्रेस शिवायचा असेल. तर त्याला अशा पध्दतीची डोरी लावणं ही कॉमन स्टाईल आहे. पण ब्लाऊजवर जर हेवी वर्क केलं असेल तर ही डोरी ब्लाऊजचा गळा जास्त छान दिसेल. मात्र प्लेन कापडाचा ब्लाऊज असेल तर त्याला डोरी लावलेली अजिबात चांगली दिसणार नाही.

Also Read : नागपुरात भेट देण्याची ठिकाणे

2. डोरी ब्लाउज बॅक मिरर वर्कसह

ब्लाऊजची ही स्टाईल दिसायला जरी साधी असली तरी साध्या डोरी नेक आणि या डिझाईनमध्ये बरंच अंतर आहे. साध्या डोरी नेकमध्ये आपण डोरी मागे म्हणजेच मानेच्या खाली बांधतो, मात्र या डिझाईनमध्ये मागचा गळा पंचकोनी शिवला असून डोरी कंबरेजवळ पाठीवर आहे. याची खासियत म्हणजे यावर केलेलं नाजूकसं मिरर वर्क. ब्लाऊजच्या कापडाचा रंग प्लेन असो किंवा प्रिंटेड त्यावर असं मिरर वर्क केलं तर स्टायलिशच दिसेल. या गळ्याचं डिझाईन, साडी किंवा स्कर्टच्या ब्लाऊजवर चांगलं तर दिसेलच, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवरही ते छान वाटेल अगदी वनपीसवरसुध्दा. फक्त वनपीसवर असा गळा शिवताना खाली हल्की स्लिट द्यावी लागेल. ब्लाउज गळा डिझाईन हा पॅटर्न कोणताही टेलर सहज शिवून देऊ शकतो.

3. मिक्स अॅन्ड मॅच ब्लाऊज बॅक

साडी ड्रॉइंग स्टाईल मराठीमध्येही वाचा

मिक्स अॅन्ड मॅच ब्लाऊज बॅक प्रकारातला हा ब्लाऊज फक्त साडीवरच चांगला दिसेल. जर साडी बॉर्डरची असेल तर साडीतला ब्लाऊजपीस काढून, त्याच पीसमधली बॉर्डर काढून वापरा. हा ब्लाऊज नक्कीच उठून दिसेल. या पॅटर्नमध्ये दोन कपड्यांचं कॉम्बिनेशन केलं आहे. कापड कमी असेल तर हे डिझाईन चांगला पर्याय आहे. यामध्ये कंबरेच्या बाजूला दोन डोरी दिल्या आहेत, पाठीच्या मधोमध तिरक्या पध्दतीने बॉर्डर लावली आहे. ज्यावर मल्टीकलर गोंडे लटकन म्हणून वापरलेत. तुम्हाला मल्टीकलरमध्ये शिवायचं नसेल तर एकाच कापडात हा पॅटर्न शिवायचं असेल तरीही छान दिसेल. त्यासाठी तुमच्या टेलरला फक्त हा फोटो दाखवा, तो लगेच तुम्हाला या पध्दतीचा ब्लाऊजचा गळा शिवून देईल.

4. राउंड कट स्टाईल ब्लाऊज बॅक

राउंड कट स्टाईल ब्लाऊज बॅक साडीवरच्या ब्लाऊजवर तर चांगला दिसेलच पण त्याचबरोबर स्कर्टच्या टॉपसाठी किंवा अगदी वन पीससाठीही परफेक्ट दिसेल. ही गळ्याची स्टाईल कॉमन जरी असली तरी कपड्यावर हेवी वर्क असेल तर ते खूपच सुंदर दिसते. यामध्ये डोरी वर लावण्याऐवजी वर एक हूक आणि खाली कमरेजवळ दोन हूक शिवले आहेत.

Also Read: Latest Blouse Back Design in English

5. एम्ब्रॉयडरी वर्क केलेला स्टाइलिश बॅकनेक

असा बॅक नेक साडी किंवा स्कर्टसाठी बनलेलाच नाही. तो फक्त वन पीसवरच सूट होतो. हीच ह्याची खासियत आहे. सुबक असा बोट नेक आणि त्याच्यासोबत मागे नेटवर केलेलं सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क. तुम्ही हा ड्रेस एम्ब्रॉयडरी वर्क स्पेशलिस्ट असलेल्या टेलरकडूनच शिवून घ्या. तुमचा हा खास ड्रेस खास कार्यक्रमांसाठी परफेक्ट दिसेल.

6. एम्ब्रॉडरी आणि लेसी ब्लाऊज बॅक

ह्या पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही स्कर्ट किंवा कुठल्याही प्रकारच्या ड्रेसवर शिवू शकता. काही खास कार्यक्रम किंवा फंक्शन असेल तेव्हा ही स्टाईल छान दिसेल. या स्टाईलची खासियत अशी आहे की, त्यामध्ये नाजूकश्या वीणकामासोबतच नाजूकसे लटकन लावले आहे. अशा प्रकारच्या लेसही मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला लागेल एखादी खास लेस किंवा शोधावा लागेल एक चांगला टेलर जो हे इतकं नाजूक काम कौशल्याने करु शकतो. या पॅटर्नमध्ये कमरेवर सिंपल डोरी दिली आहे.

ब्लाउजचे डिझाईन लेहेंगा आणि साडीसाठी

7. मोठे गोंडे लावलेला ब्लाऊज बॅक

साडी किंवा स्कर्टच्या ब्लाऊजकरिता आपण वरील काही सिंपल डिझाईन्स पाहिल्याच आहेत. पण या डिझाईनची खासियत काय आहे माहितीए का? ब्लाउज गळे डिझाईनच्या मागच्या बाजूला लावलेली डोरी आणि गोंडे हे नेटपासून तयार केलेले आहेत. जर तुमची साडी, किंवा ड्रेस नेटचा असेल तर तुम्ही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. त्यावर एम्ब्रॉयडरी करुन घेतल्यास ब्लाऊज अजूनच सुंदर दिसेल. मात्र त्यासाठी असा टेलर शोधावा लागेल, जो हे काम अगदी परफेक्ट करेल.

8. नाव लिहीलेला स्टाइलिश ब्लाऊज बॅक

तुमचं लग्न असेल किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि जर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठी काहीतरी खास करायचं असेल, तर हे डिझाईन तुमच्यासाठी परफेक्ट असेल. या ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी संपूर्ण नेटचा वापर केला असून त्यावर डायमंडच्या सहाय्याने नावाची एम्ब्रॉयडरी केली आहे.

9. डायमंड वर्क असलेला स्टाइलिश ब्लाऊज बॅक

साडीवरचा किंवा स्कर्टवरचा ब्लाऊज असो वा कोणताही ड्रेस त्यावर हे डायमंड वर्क असलेलं डिझाईन मस्तच दिसेल. अशा पध्दतीचं डिझाईन घातल्यावर तुम्हाला कोणी वळून बघितलं नाही असं होणारच नाही. या पॅटर्नमध्येही नेटवर विणकाम केलंय आणि ते करुन घेण्यासाठी तुम्हाला एखाद्या स्पेशलिस्ट टेलर किंवा बुटीकची मदत घ्यावी लागेल.

10. डायमंड चेन्स असलेला ब्लाऊज बॅक

हा जो गळा आहे ना… तो ए टू झेड अगदी कोणत्याही प्रकारच्या ड्रेससाठी बनवता येऊ शकतो. ही अतिशय सुंदर आणि ग्रेसफुल स्टाईल आहे. यामध्ये डायमंडचा वापर करुन चेन्स बनवल्या आहेत आणि पाठ झाकलीयं. त्यासाठी स्पेशलिस्ट टेलर मस्ट आहे. नाहीतर अशा रेडीमेड चेन्स तुम्हला बाजारात ही मिळू शकतात. या डायमंड चेन्स तुम्हाला मिळाल्यावर तुमचं अर्ध काम झालंच म्हणून समजा. डायमंडऐवजी मोत्याच्या किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या चेन्स वापरु शकता. एकदा हा ड्रेस शिवून झाला आणि तुम्ही तो घातला की सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळल्या म्हणून समजा.

फोटो सौजन्य : Shaadimagic, Studio149, Wedlista, Wittyvows

हेही पहा –

1. डिझायनर ब्लाउजसाठी पहा टॉप डिझाईनर्सचे हे सुंदर ब्लाउज

2. ह्या डिझायनरने सेट केलेत ब्राइडसाठी सुंदर भारतीय ट्रॅडीशनल ब्लाउजचे नवीन ट्रेंड

3. फॅशन डिझाईनर्सच्या आउटफिट्सवरून आइडिया घेऊन मिळवा अनोखा स्टाइलिश पार्टी लुक

4. जर तुम्हाला साडी नेसता येत नसेल तर ट्राय करा ह्या स्टाइलिश ड्रेप्ड साड्या

5. Lehenga Blouse Designs in English

Read More From फॅशन