Eye Make Up

आयमेकअपची ही ट्रिक मास्कमध्येही येईल कामी

Leenal Gawade  |  Jun 22, 2021
आयमेकअपची ही ट्रिक मास्कमध्येही येईल कामी

कोरोना आला आणि सगळ्यांच्या तोंडावर मास्क आला. हा मास्क आल्यामुळे लिपस्टिक लावण्याची आवड असूनही लिपस्टिक काही लावता येत नाही. अशा या काळात मेकअप करायचा तो काय असे अनेकांना वाटते. कारण लिपस्टिक मास्कला लावून वाया जाते. त्यामुळे आता मेकअपमध्येही वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. सध्या लिपस्टिक लावता येत नाही म्हणून काय झाले. या मास्कमधून दिसणारे तुमचे डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काही आयमेकअप नक्कीच ट्राय करु शकता. तुम्ही इन्स्टाग्राम किंवा काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहिले तर तुम्हाला नक्कीच काही नवे आणि हटके आयमेकअप ट्रेंड दिसतील जे तुम्हाला नक्कीच आवडतील असे आहेत. चला जाणून घेऊया असे काही मेकअप ट्रेंड

बोल्ड आयलायनर ( Bold Eyeliner)

Instagram

सध्या मास्कमध्ये तुम्हाला आयलायनर लावणेच तितके जमू शकते. पण हे आयलायनर पातळ लावण्यापेक्षा तुम्ही थोडे बोल्ड आयलायनर लावा. तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार तुम्ही या आयलायनरची जाडी ठरवा. म्हणजे ते आयलायनर तुम्हाला छान उठून दिसेल. आयलायनरचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असतील. त्यापैकी जाड आणि डोळ्यांच्या बाहेर जाणारा असा आयलायनरचा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बोल्ड आयलायनरचा पर्याय निवडा. असे करताना तुम्ही वॉटरप्रुफ आयलायनर लावा. कारण असे आयलायनर हे जास्त वेळासाठी टिकते.

सोशल मीडियावरील नवा ब्युटी ट्रेंड, ब्रो सोपने करा भुवया सेट

कलर्ड आयलायनर (Colored Eyeliner)

Instagram

कलर्ड आयलायनर हे मास्कमुळे पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहेत. हे आयलायनर खूप छान उठून दिसतात. तुम्ही ज्या रंगाचा टॉप घातला आहे त्या रंगाचे आयलायनर तुम्ही त्यावर लावू शकता. कलर्ड आयलायनर लावायचा विचार करत असाल तर ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने लावता येतात. हल्ली cutcrease डोळ्यांचा ट्रेंड आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही कलर्ड आयलायनर लावू शकता. कलर्ड आयलायनर थोडे बोल्ड लावले तर चालते पण ते खूप बोल्ड लावू नका. कारण ते दिसायला चांगले दिसत नाहीत.  असे लायनर थोडे पातळ लावल्यावर खूप छान दिसते. हल्ली वेगवेगळ्या ब्रँडमध्ये तुम्हाला असे लायनर मिळू शकतील. 

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

टिंटेड आयब्रोज (Tineted Eyebrows)

Instagram

जर तुम्हाला खूप आयलायनर लावायला आवडत नसेल तर तुम्ही  आयब्रोजवरही काही प्रयोग करु शकता. हल्ली आयब्रोज जाड करण्यापासून ते  त्याला रंग करण्यापासून अनेक वेगळे ट्रेंड तुम्हाला यामध्ये नक्कीच दिसतील. त्यामुळे तुम्ही टिंडेट असे आयब्रोज असे लुक करता येतील. कलर आयब्रोजसुद्धा छान आणि उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही मस्त आयब्रोजचा हा लुक करायला देखील काहीच हरकत नाही. 


याशिवाय तुम्ही लीप टिंट आयलीडला लावूनही काही मेकअप करु शकता. जे तुम्हाला नक्कीच शोभून दिसतील. 

तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा

Read More From Eye Make Up