मनोरंजन

निसा देवगणच्या सतत ट्रोल होण्याबाबत काजोलची प्रतिक्रिया

Trupti Paradkar  |  Mar 10, 2020
निसा देवगणच्या सतत ट्रोल होण्याबाबत काजोलची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेक कारणांसाठी सेलिब्रेटीज ट्रोल होत असतात. एखादी साधीशी अथवा छोटीशी चुक ट्रोल होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. सेलिब्रेटीजप्रमाणे त्यांच्या  मुलांवर अर्थात स्टारकिड्सवर ट्रोलर्सची बारीक नजर असते. त्यामुळे काही स्टारकिड्स अनेकदा ट्रोल होतात. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होते. तिचे फोटो, तिचं वागणं अशा अनेक गोष्टींसाठी ती ट्रोल होते. मात्र निसाला सतत ट्रोल करण्याबाबत आता काजोलने तिचं मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्री काजोलमधील आईने या टोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

काजोलने काय दिली आहे प्रतिक्रिया

बऱ्याचदा सेलिब्रेटीजची मुलं पापाराझींच्या कॅमेरात कैद होतात. प्रवास करताना एअरपोर्टवर, सलोनला जाताना अथवा शॉपिंगसाठी घराबाहेर पडल्यावर, मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताना कलाकारांच्या मुलांचे फोटो काढले जातात. सेलिब्रेटीज किड असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर फॉलो केलं जातं. कधी कधी त्यांच्या या फोटोजला चांगली प्रतिक्रिया मिळते तर कधी कधी ट्रोल केलं जातं. ज्यामुळे या सेलिब्रेटीजच्या सामाजिक प्रतिष्ठेवर त्याचा नक्कीच परिणाम होतो. जसं प्रसिद्धीचा फायदा होतो तसं ट्रोल झाल्यामुळे बऱ्याचदा नुकसानही होतं. काजोल आणि अजयच्या निसाला चांगल्या प्रतिक्रिया कमी ट्रोलच जास्त केलं जातं. तिच्या लुक्स आणि कपड्यांवरून ती यापूर्वी अनेकदा ट्रोल झालेली आहे. ज्यामुळे काजोलला एक आई म्हणून नेहमीच वाईट वाटतं. 

Instagram

काजोलमधील आई जेव्हा भावनिक होते

एका मुलाखतीत काजोलला निसाला ट्रोल करण्याबाबत तिचं काय मत आहे असं विचारण्यात आलं होतं. या प्रश्नावर उत्तर देताना काजोलमधील आई अक्षरशः भावनिक झाली होती. काजोलचं तिचा पती अजय आणि दोन्ही मुलांवर प्रचंड प्रेम आहे. मुलगी निसा आणि मुलगा युगची ती फार काळजी घेते. अजय आणि काजोलच्या प्रसिद्धीमुळे तिच्या मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घेते. मात्र तरिही निसाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. याबाबत काजोलन म्हणाली की, ” मुलांना ट्रोल केलं जाणं हे सेलिब्रेटीज नेहमीच त्रासदायक असतं. एक आई म्हणून मला माझ्या मुलांना साधा ओरखडाही येऊ नये असं वाटतं. त्यांना काही झालं तर मला फार दुःख होतं. कारण मी माझ्या मुलांना प्रत्येक समस्येपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते ”  निसाला ट्रोल करण्याबाबत ती म्हणाली की, ” निसाला जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं तेव्हा तेव्हा मी भावनिक होते. मागे निसाला जेव्हा वाईट पद्धतीने ट्रोल केलं होतं तेव्हा ती भारतात नव्हती. परमेश्वर कृपेने ती तेव्हा सिंगापूर मध्ये होती ज्यामुळे तिला याबाबत माहीत नाही. मात्र सोशल मीजिया ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे कोणतीही गोष्ट त्वरीत जगभरात पसरू शकते. ज्यामुळे अजय आणि मला याची नेहमीच भिती वाटत राहते. मी नेहमीच माझ्या मुलांना सांगत असते की, ट्रोलिंग ही समाजातील एक अशी छोटीशी गोष्ट आहे जिच्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं. भविष्यात पुढे जाण्यासाठी असं करणं फार गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कशाप्रकारे पाहता यावर सर्व काही अवलंबून आहे. यासाठी मी  आणि माझं कुटुंब अशा ट्रोलिंगकडे कधीच लक्ष देत नाही “

Instagram

अजय आणि काजोल निसाची अशी घेतात काळजी

सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असल्यामुळे निसाने आता तिचं अकाऊंट सोशल मीडियावर प्रायव्हेट केलं आहे. यापूर्वी शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये असल्यामुळे तिला या  गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता मात्र भारतात आल्यावर तिच्या फोटोंवरून तिला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगमुळे ती नक्कीच नाराज होत असणार. यासाठीच काजोल आणि अजयने त्यांच्या मुलीला तिचं सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट करण्याचा सल्ला दिला असणार. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

अंबानीच्या घरी साजरी झाली निक-प्रियांकाची होळी

स्त्रियांचा तिरस्कार करणाऱ्या दांडेकरांना पुरून उरणार ‘प्राची’

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

Read More From मनोरंजन