बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत चित्रपटात काम करणं हे अनेकींचं स्वप्न असतं. सलमानचा चाहता वर्ग फारच मोठा आहे. ज्यामुळे सलमानचे जवळजवळ प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सलमानसोबत आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. बऱ्याच जणींना सलमानखानच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना एवढी मोठी संधी मिळूनही त्या चित्रपटसृष्टीत फार काळ टिकू शकल्या नाहीत. या अभिनेत्रींना सलमानसोबत केलेल्या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. मात्र आज त्या या क्षेत्रापासून फार दूर गेल्या आहेत.
भाग्यश्री
सुरज बडजात्या आणि सलमान खान हे एक वेगळंच समीकरण होतं. ज्यामुळे बडजात्यांच्या अनेक चित्रपटात सलमानने काम केलं आहे. मैने प्यार किया हा यापैकीच एक गाजलेला चित्रपट. या चित्रपटातील सुमन आणि प्रेमची जोडी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. यात सलमानसोबत भाग्यश्रीने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तिचा पहिलाच चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाला. मात्र यशाच्या शिखरावर असताना भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर भाग्यश्रीने चित्रपटात काम करणं कमी केलं. ज्यामुळे भाग्यश्री या क्षेत्रात फार यश मिळवू नाही शकली.
भूमिका चावला –
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आठ ते दहा चित्रपट केलेली ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये यश नाही मिळवू शकली. भूमिकाने तेरे नाम या बॉलीवूड चित्रपटातून सलमान खानसोबत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला चाहत्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या या चित्रपटामुळे भूमिका रातोरात स्टार झाली होती. मात्र त्यानंतर काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यावर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली.
स्नेहा उल्लाल –
ऐश्वर्यासारखी दिसणारी अशी स्नेहा उल्लालची ओळख झाली होती. तिने लकी – नो टाईम फॉर लव्ह या चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्या काळात सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं. स्नेहा ऐश्वर्याप्रमाणे दिसत असल्यामुळे कमी वयातच तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र काही चित्रपटात काम केल्यावर तीदेखील फिल्म इंडस्ट्रीपासून लांब गेली. ज्यामुळे तिला या क्षेत्रात यशस्वी करिअर नाही करता आलं.
झरिन खान –
ज्याप्रमाणे स्नेहा उल्लाल ऐश्नर्याची ड्युप्लिकेट अशा ओळख मिळाली तशीच जरिन खानला कतरिना कैफची ड्युप्लिकेट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. झरिन खानने सलमानच्या वीर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचं हावभाव आणि चेहरा अगदी हुबेहुब कतरिना कैफसारखेच होते. मात्र ती तिच्या पहिल्याच चित्रपटात यश मिळवू नाही शकली. ज्यामुळे आजही तिला हवी तशी प्रसिद्धी नक्कीच नाही मिळाली.
डेजी शाह –
कोरिओग्राफर गणेश आचार्यची सहाय्यक म्हणून काम केलेल्या डेजी शाहला बॉलीवूड अभिनेत्री होण्याची सहज संधी मिळाली. तिने सलमानच्या जय हो या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र या चित्रपटानंतर तिला अभिनयाची संधी मिळाली नाही. ज्यामुळे तिने अभिनयापासून दूर राहणंच पसंत केलं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या
या’ अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज
मराठीतल्या काही प्रसिद्ध अभिनेत्री ज्या झाल्या आहेत गायब
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade