बॉलीवूड

Avengers: Endgameमुळे हिंदी चित्रपटांच्या गल्ल्यात खडखडाट

Leenal Gawade  |  May 3, 2019
Avengers: Endgameमुळे हिंदी चित्रपटांच्या गल्ल्यात खडखडाट

एप्रिल महिना हिंदी चित्रपटांच्या गल्ल्याला चांगलाच फटका देऊन गेला आहे. याचे कारण ठरला आहे. Avengers: Endgame हा चित्रपट… अजूनही अनेक चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरु आहे. तर अनेकांना या चित्रपटाला जायचे असूनही त्यांना याची तिकिटे मिळत नाहीएत. याचाच परिणाम की काय? अनेकजण हिंदी चित्रपटांकडे नाक मुरडून जात आहेत. Avengers: Endgameया चित्रपटाने 150 कोटींकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे साधारण एप्रिल महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई केली असे आकडे तरी सांगत नाहीत. आता हे चित्रपट कोणते ते देखील पाहुयात

मलायका आणि जेनिफर लोपेझ देणाल फिटनेसचे धडे

कलंक (Kalank)

धर्मा प्रोडक्शनचा बीग बजेट आणि ड्रिम प्रोजेक्ट असलेला हा चित्रपट Avengers: Endgame च्या आधी रिलीज झाला. या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आणि नात्याची गुंतागुंत पाहता लोकांना हा चित्रपट आवडेल अशी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. या चित्रपटाने आतापर्यंत  73.24 कोटी इतकी कमाईल केली आहे. आता धर्माचा चित्रपट आणि त्यात बीग बजेट म्हणता या चित्रपटाने तशी काहीच कमाई केली नाही. तब्बल 150 कोटीचा बजेट असलेल्या या चित्रपटाला लोकांनी नाकारल्यामुळे करण जोहरही चिंताग्रस्त झाला होता. कारण करणसाठी हा चित्रपट त्याच्या वडिलांचा ड्रिम प्रोजेक्ट होता. पण या चित्रपटातील गुंतागुंत प्रेक्षकांना आवडली नसावी म्हणूनच त्यांनी हा चित्रपट नाकारला असावा. त्यामुळे इतकी मोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट पडला असेच म्हणावे लागेल.

Raw रोमिओ अकबर वॉल्टर (Romeo Akbar walter)

एप्रिल महिन्यात रिलीज झालेला हा दुसरा चित्रपटही फार काही कमाई करु शकला नाही.  जॉन अब्राहिम या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. यात जॉनने एका रॉ एजंटची भूमिका साकारलेली होती. पण या चित्रपटाने तर 50 कोटीचाही गल्ला जमवला नाही.आतापर्यंत हा चित्रपट केवळ 38 कोटीचीच कमाई करु शकला आहे.

प्रियांका आणि नीकमध्ये काही झालं आहे का? पाहा व्हिडिओ

छोट्या चित्रपटांनी तर तगही धरला नाही

बीग बजेट चित्रपटांव्यतिरिक्त रिलीज झालेले अन्य चित्रपट तर अजिबात चालू शकले नाही. त्यांची नावेही या चित्रपटांच्या यादीत पुढे आली नाही. एकूणच काय Avengers: Endgameमुळे कोणत्याही चित्रपटाला चांगली कमाई करता आली नाही. हे चित्रपट होते ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है?’, ‘ताशकन फाईल्स’ ‘मरुधन एक्सप्रेस’, ‘तारपान’… अनेकांनी तर या चित्रपटाची नावेही ऐकली नसतील.

सारानंतर आता ही अभिनेत्रीही कार्तिक आर्यनच्या प्रेमात 

मे महिन्यामध्येही हॉलीवूड चित्रपटाचा बॉलीवूडला धोका

मे मध्ये धर्मा प्रोडक्शनचा आणखी एक चित्रपट येणार आहे तो म्हणजे #soty2. स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाचीही अशीच काही अवस्था होण्याची शक्यता आहे. कारण या चित्रपटाच्या ट्रेलरनंतरच या चित्रपटावर चांगलीच टीका झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना Godzilla: King of monsters या चित्रपटाचा पर्याय आहे. हा चित्रपट 30 मे रोजी रिलीज होणार आहे. आता मे महिनाच्या शेवटी हा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर आधी रिलीज होणाऱ्या हिंदी चित्रपटांना त्याचा थोडाफार फायदा होण्यास काहीच हरकत नाही.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From बॉलीवूड