DIY फॅशन

ब्रा चा कोणता प्रकार ठरु शकतो त्रासदायक

Leenal Gawade  |  Jul 20, 2022
ब्राचे प्रकार ठरु शकतात त्रासदायक

 अगदी कधीही न टाळता येणारा महिलांच्या कपड्याचा प्रकार म्हणजे ब्रा (Bra). अगदी काहीही झाले तरी नित्यनेमाने ही गोष्ट घालणे सगळ्याच महिलांना अनिवार्य आहे. दिवसभर ब्रा घातल्यानंतर ती कधी एकदा काढून टाकतो असे अनेकांना होऊन जाते. तुम्हालाही ब्रा घालणे असेच त्रासदायक वाटते का? तर तुमच्यासाठी आज अत्यंत महत्वाची अशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. कारण कधी कधी चुकीच्या प्रकारातील ब्रा घातल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होऊ लागतो. ब्रा चा असा कोणता प्रकार तुम्ही टाळायला हवा. ते आता जाणून घेऊया 

अधिक वाचा : लहान स्तन आकर्षक दिसण्यासाठी सोप्या टिप्स

अंडरवायर्ड ब्रा

 स्तनाचा आकार आकर्षक दिसण्यासाठी खूप जण अंडर वायर्ड ब्राचा उपयोग करतात. या ब्रामध्ये स्तनाच्या खाली वायर्ड असते. जी तुमच्या स्तनांना रोखून ठेवण्याचे काम करत असते. पण अनेकदा अशा ब्रा सगळ्यांनाच सूट होतील असे नाही. ज्यांच्या ब्रेस्ट हेवी असतात. अशांना या ब्रा अधिक त्रासदायक ठरतात. कारण त्यामुळे त्यांच्या छातीखाली वळ येण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही या ब्रा वापरत असाल तर त्या ब्रा जास्त काळासाठी नाहीत हे लक्षात घ्या. कारण या ब्रा सगळ्यांनाच सूट होत नाहीत 

ब्रा लेट ब्रा

ब्रा लेट ब्रा

सध्या सगळीकडे ब्रालेट ब्राचा ट्रेंड आहे. खूप जण या ब्रा घातल्यामुळे स्तन आकर्षक दिसतात म्हणून त्याचा वापर करतात. पण या ब्रा थोड्या ब्रा च्या आकाराहून मोठ्या असतात. त्यामुळे त्या पोटाच्या थोड्या वर असतात. ज्यामुळे अनेकदा थोडे हट्ट आणि छाती दाबल्यासारखी वाटते. अशा ब्रा जास्त काळ घालायची इच्छा होत नाही. त्यातच जर अशा ब्रामध्ये वायर्ड असेल तर त्याचा त्रास अधिक होतो. जर तुम्हाला बाहेर जायचे असेल तर ब्रा चा असा प्रकार थोडा कमीच घाला.

क्रॉस बॅक ब्रा

हल्ली ब्रामध्ये इतके फॅन्सी प्रकार मिळतात की, ते सगळे प्रकार घालायची इच्छा आपल्याला होते.कारण हल्ली असे बरेच टॉप असतात ज्यांच्यासाठी आपल्याला डिप स्लिव्हज घालावे लागतात. अशावेळी या ब्रा खूपच कामी येतात. पण अशा ब्रा ची फिटिंग जर खूप टाईट असेल तर अशावेळी त्याचा त्रास मानेला खूप होऊ लागतो. त्यामुळे मानेसाठी अशा क्रॉस बॅक वापरताना थोडी काळजी घेणे फार गरजेचे असते. क्रॉस बॅक असलेल्या ब्रा मानेला खूप जवळ येत असतील तर त्या टाळलेल्या बऱ्या 

लांब आकाराच्या ब्रा

हल्ली आरामदायी ठराव्यात म्हणून ब्रा चा आकार थोडा मोठा असतो. छातीच्या खाली हा आकार असल्यामुळे अनेकदा बसल्यानंतर या ब्राची फिटिंग वेगळी होऊ लागते. अशा ब्रा कपड्यांची फिटिंग चुकीच्या करतात. इतकेच नाही तर या ब्रा सतत वर गेल्यामुळे त्यांना सतत खाली खेचावे लागते. त्यामुळे अशा लांब ब्रा घालत असाल तर थोडी काळजी नक्की घ्या. 

लेस ब्रा

लेस ब्रा

लेस ब्रा दिसायला खूपच सेक्सी असतात. पण या ब्रा अनेकदा तुमच्या लाईट किंवा पातळ कपड्यांमधून सहज दिसतात. इतकेच नाही तर खूप जणांना लेस ब्राची सवय नसेल तर अशा ब्रा अगदी हमखास टोचतात किंवा लागतात. असा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा लेस ब्रा टाळा.

ब्रा चा असा प्रकार तुम्हीही घालत असाल तर तुम्ही तो टाळायला हवा. 

Read More From DIY फॅशन