Planning

लग्नासाठी खास ब्रायडल एंट्री आयडियाज (Bridal Entry Ideas In Marathi)

Aaditi Datar  |  Oct 25, 2019
लग्नासाठी खास ब्रायडल एंट्री आयडियाज (Bridal Entry Ideas In Marathi)

प्रत्येक मुलगी तिच्या लग्नाच्या दिवसाबाबत उत्सुक असते. त्या खास दिवसासाठी तुम्ही अनेक ब्युटी पार्लर सेशन्स आणि शॉपिंग वाऱ्या केलेल्या असतात. तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका वेळ तुम्ही आणि तुमच्या घरचे या एका दिवसासाठी देता. मग या दिवशी तुमची #bride म्हणून एंट्रीसुद्धा तशी हटकेच झाली पाहिजे ना. अजूनही महाराष्ट्रीयन लग्नात विवाहसोहळा ची तेवढी क्रेझ नसली तरी बऱ्याच लग्नांमध्ये आता वर-वधू हटके पद्धतीने एंट्री घेताना दिसतात.

तुमचं अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो या दिवशी जर तुमची ब्रायडल एंट्री एकदम हटके झाली तर त्याची नजर तुमच्यावरून हटणारच नाही. कारण लग्नाच्या दिवशी आधीच नवरी मुलगी जास्त उठून दिसतच असते. त्यात तुम्ही जर छान वेडिंग गाऊन किंवा रिसेप्शन लुकमध्ये एंट्री घेतली तर त्याच्या मनात तुमची विवाहसोहळा
कायमचे साठी कोरली जाईल. तसंच त्याच्या घरचे आणि तुमचे नातेवाईकही पाहत राहतील. कारण याचा इम्पॅक्ट वेगळाच असतो. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत काही ब्रायडल एंट्री आयडियाज. ज्यात आहेत काही पारंपारिक, काही हटके आणि काही फनी ब्रायडल एंट्रीज. यापैकी तुम्ही तुमच्या लग्नासाठी एक निवडू शकता. तसंच तुमच्या या स्पेशल एंट्रीसाठी आम्ही ब्रायडल एंट्री साँग्ज्ससुद्धा देत आहोत. लग्नाचा दिवस हा तुमच्या आणि त्याच्या आयुष्यात कायम लक्षात राहील, असा बनवा तुमच्या खास ब्रायडल एंट्रीने. चला पाहूया काही खास ब्रायडल एंट्री आयडियाज

Instagram

पारंपारिक ब्रायडल एंट्रीज (Traditional Bridal Entry Ideas)

काही मुलींचा विश्वास हा आपल्या परंपरा आणि चालीरितींवर जास्त असतो. त्यामुळे लग्नाच्या दिवशी सगळं कसं पारंपारिक पद्धतीने पार पडावं असं त्यांना वाटतं. कारण आपल्या संस्कृतीशी आपलं कनेक्ट कायम राहावं असं त्यांना वाटणं साहजिक आहे. त्यांच्यासाठी काही खास पारंपारिक पद्धतीने करता येतील अशा ब्रायडल एंट्रीज.

वाचा – पारंपारिक भारतीय देखावा 

राजकुमारीसारखी शाही एंट्री (Royal Princess Palkhi Entry)

Instagram

आपल्या आईवडिलांसाठी त्यांची मुलगी राजकन्याच असते. मग अशा राजकन्येची एंट्री मेणा किंवा पालखीतून झाली तर किती छान. तुतारीच्या गजरात नऊवारी नेसलेली वधू जेव्हा ब्रायडल एंट्री करते. तेव्हा हॉलमधल्या प्रत्येकाचं लक्ष वेधलं जातंच. अशी एंट्री तुम्हाला लार्जर दॅन लाईफ अनुभव नक्कीच देईल.

वाचा – 25 नवीनतम आणि सोपे वधूसाठी मेहंदी डिझाइन

Instagram

तेजोमय आणि देवांच्या आशिर्वादाने करा एंट्री (Bridal Entry With Blessing Of God)

Instagram

अशा प्रकारची ब्रायडल एंट्रीही अगदी छान आणि पारंपारिक वाटते. तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूने समया किंवा छान दिवे हातात घेऊन येणाऱ्या तुमच्या मेैत्रिणी किंवा कुटुंबिय. देवाच्या आशिर्वादाने केलेले प्रत्येक कार्य हे निविर्वादपणे यशस्वी होतंच. मग या पद्धतीनेही तुम्ही प्रसन्न वातावरणात ब्रायडल एंट्री करू शकता.

Instagram

फुलांच्या जाळी किंवा चादरीखालील एंट्री (Entry With Floral Jaali)

Instagram

जर तुम्हाला पंजाबी किंवा बॉलीवूड लग्नातल्या वधूसारखी एंट्री करायची असेल तर ही आयडिया छान आहे. वधूच्या डोक्यावर छान फुलांची चादर किंवा लाईट असलेली चादर धरलेले तिचे भाऊ आणि मामा किंवा फ्रेंड्स जेव्हा एंट्री करतात तेव्हा नजर हटतच नाही. तो क्षण काही औरच असतो.

फुलांच्या छत्रीसोबत करा एंट्री (Entry With A Floral Umbrella)

Instagram

जर तुम्हाला फुलांची किंवा लाईट्सची चादर ही आयडिया खूपच फिल्मी किंवा फॅन्सी वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही फुलांनी सजवलेली छान रंगबेरंगी छत्री घेऊनसुद्धा एंट्री करू शकता. या छत्रीला तुम्ही टॅसल्स किंवा तुमच्या वेडिंग आऊटफिटशी मॅच होणाऱ्या फुलांनीही डेकोरेट करू शकता.

तुमच्या आयुष्यातील मुख्य व्यक्तींच्या सोबतीने करा एंट्री (Entry With Your Main Man)

Instagram

तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार येण्याआधी तुमचे बाबा आणि भाऊ हेच मुख्य व्यक्ती होते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांनासुद्धा स्पेशल फिलींग द्या. ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी आधार दिला, तुमचं रक्षण केलं आणि तुमची जडणघडण केली. तुमच्या नव्या आयुष्यात प्रवेश करताना ते तुमच्यासोबत असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे ना.

फुलांची उधळण (With Floral Shower)

Instagram

जर तुम्हाला वरील कोणतीही आयडिया आवडली नसेल किंवा ती प्रत्यक्षात आणणं शक्य नसेल तर तुम्ही छानपैकी फुलांची उधळण तुमच्या कुटुंबियांना करायला सांगून तशी एंट्री करू शकता. आजकाल बरेचदा पाहुणे मंडळीही मंगलाष्टकांच्या वेळी अक्षता न टाकता मुलीच्या किंवा कपलच्या एंट्रीवेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करतात.

वाचा – नववधूकरिता 10 लहान उखाणे (Short Ukhane for Bride)

हटके ब्रायडल आयडियाज (Quirky Bridal Entry Ideas)

काहीजणींना इतरांपेक्षा वेगळ्या आणि हटके पद्धतीने आपली ब्रायडल एंट्री असावी अशी वाटते. यासाठी अगदीच काही जगावेगळंच करायला हवं असं काही नाही. फक्त असं करा जे तुमच्या आणि लग्नाला आलेल्या सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहिलं. काहीवेळा अशा हटके आयडियाज कुटुंबियांना पसंत पडतीलच असं नाही. त्यामुळे असं काही करायच्या आधी घरच्यांना आणि तुमच्या पार्टनरला नक्की विश्वासात घ्या.

ठुमके आणि लटके-झटके (Entry with Thumka’s)

Instagram

भरपूर उत्साह आणि आवडतं गाणं वाजत असताना मस्तपैकी नाचत गात एंट्री करायला काय हरकत आहे नाही का? मग वरातीत नाचण्याची मजा काय फक्त नवरा मुलगा आणि सासरच्यांनीच घ्यावी असा नियम आहे का?

फटक्यांच्या आवाजात करा धमाकेदार एंट्री (Lit Entry Like A Firecracker)

Instagram

लग्नातल्या इमोशनल वातावरणाला थोडं हलकंफुलकं करण्यासाठी असं काहीतरी करणं आवश्यक आहे. मग फटाक्यांच्या आतिषबाजीत होऊ दे तुमची धमाकेदार एंट्री. मग ती तुम्ही एकटीने करा किंवा तुमच्या पार्टनरसोबत करा.

तुमच्या ब्राईडमेड्ससोबत एंट्री (Entry With Your Bridesmaids)

Instagram

सध्या जमाना आहे वीरे दी वेडिंगचा. मग तुमच्या मैत्रिणींनाही सामील करा तुमच्या या खास दिवसात. ज्या प्रत्येक प्रोब्लेममध्ये तुमच्यासोबत होत्या. तुमचा प्रत्येक आनंद ज्यांनी द्विगुणित केला. तुमच्या बेस्टीजसोबत करा मस्त एंट्री. अजून एक आयडिया म्हणजे तुमच्या क्युट भाच्या किंवा भाचीसोबत एंट्री करा. तेही खूपच गोड वाटेल.

आधुनिक ब्रायडल एंट्री (Modern Bridal Entry)

Instagram

तुमचं लग्न आणि तुमची ब्रायडल एंट्री म्हणजे तुमचा लाईमलाईट आणि चमकण्याचा दिवस. मग हे लाईमलाईट तुमच्या नवऱ्यासोबत शेअर करायला काय हरकत आहे. जर तुम्हाला हे शक्य वाटत नसेल तर नो प्रोब्लेम रिसेप्शनला एकत्र एंट्री करा.

फनी ब्रायडल एंट्री आयडियाज (Funny Bridal Entry Ideas)

तुम्हीही बाईक चालवता का सैराटमधल्या आर्चीसारखी. मग तुम्हाला लग्नाच्या दिवशी तसंच काही मजेशीर करायला आवडेल का. टिपीकल एंट्रीऐवजी मजेशीर करता येणारी एंट्रीबद्दल जाणून घ्या. 

Instagram

टशनमध्ये बाईकवर एंट्री (Entry On A Bike)

Instagram

आपल्याकडे गुढीपाडव्याला अनेकजणी बाईकवर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी होतातच. मग लग्नाच्या दिवशी तुमच्या ब्रायडल एंट्रीची शोभाही बाईकने वाढवायला काहीच हरकत नाही.

वाट बघतोय रिक्षावाला (Enter In An Auto Rickshaw)

Instagram

आता ही ब्रायडल एंट्री आयडिया कुठून आली ते माहीत नाही पण आपल्या रोजच्या रूटीनमध्ये रिक्षा हा महत्त्वाचा भाग आहे. मस्तपैकी सजवलेली रिक्षा आणि त्यातून होणारी तुमची एंट्री नक्कीच आलेल्या पाहुण्याचं लक्ष वेधून घेईल. तुम्ही शोलेमधल्या धन्नोसारखी रिक्षाही यासाठी वापरू शकता.

क्युट एंट्री (Cute Entry)

Instagram

या एंट्रीमध्ये तुम्ही तुमच्यासोबत सामील करू शकता तुमच्या क्युट पेट किंवा तुमच्या क्युट भाचेमंडळींना. खरंतर तुमच्या आजीआजोबांसोबतही तुम्ही मस्त एंट्री करू शकता. या क्युट एंट्री आयडियाला कोणीही नाही म्हणूच शकत नाही.

व्हिटेंज टच (Entry In Vintage Car)

Instagram

जर तुम्ही खूपच हौशी असाल तर ही ब्रायडल एंट्री आहे तुमच्यासाठी. तुमची खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही एखादी व्हिटेंज कार हायर करून त्यातून रॉयल ब्रायडल एंट्री करू शकता. तुम्ही तुमच्या ब्राईड्समेड किंवा तुमच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत यामध्ये बसून व्हेन्यूला झक्कास एंट्री करा. 

बेस्ट ब्रायडल एंट्री व्हिडिओज (Best Bridal Entry Videos)

आम्ही तुम्हाला वर आयडियाज तर दिल्या पण तरीही तुम्हाला अजून काही शंका असेल तर पाहा हे बेस्ट ब्रायडल एंट्री व्हिडिओज. ज्यातून तुम्हाला तुमच्या दि डेसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.

हवाहवाई ब्राईड (Air Braids)

पाहता तुला…. (See You)

वीरेसोबत एंट्री (Entry With Veera)

स्वॅगवाली ब्राईड (Brides With Swag)

धमाल कपलची धमाल एंट्री (Dhamal Entry)

ब्रायडल एंट्री साँग आयडियाज (Bridal Entry Song Ideas)

प्रत्येक वधूला तिची एंट्री भारी आणि अविस्मरणीय व्हावी असं वाटतं. वरील आयडियाजनी तुम्ही एंट्री तर कराल पणम त्यासोबतच जर चांगलं गाणं असेल तर अजूनच छान वाटेल. मग तुमच्या ब्रायडल एंट्रीसाठी नक्की वापरा ही गाणी. 

दिन शगना दा, फिलौरी Din Shagna Da, Phillauri
हेच गाणं अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या वेळी अनुष्काच्या ब्रायडल एंट्रीसाठी वापरण्यात आलं होतं. हे गाणं खूपच सुंदर असून त्याचे बोलही खूपच इमोशनल करतात. प्रत्येकीला आपल्या लग्नात हवंहवसं वाटेल असं हे गाणं.

कबीरा, ये जवानी है दिवानी Kabira Encore, Yeh Jawani Hai Deewani
हे गाणं तर तुम्ही ऐकता क्षणीच आपल्या लग्नातही नक्की वापरायचं असं ठरवलं असेलच. रणवीर आणि दीपिकाच्या प्रसिद्ध चित्रपटातील हे गाणं ब्रायडल एंट्रीसाठी परफेक्ट आहे.

नवराई माझी लाडाची लाडाची गं, इंग्लिश विंग्लीश Navrai Maajhi, English Vinglish
सध्या प्रत्येक मराठी लग्नाच्या संगीत सेरेमनी आवर्जून वापरलं जाणारं हे गाणं. तुमच्या आईबाबांसोबत किंवा मावश्यांसोबत एंट्री करायचं तुमचं ठरलं असेल तर या गाण्याला पर्याय नाही.

मंगलयम, साथिया Mangalayam, Saathiya
काही गाणी फोरएव्हर असतात. त्यापैकीच हे एक गाणं. ज्यामध्ये सुरूवातील संस्कृत श्लोक आहेत. जे ऐकताच तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल. साथिया चित्रपटाला येऊन अनेक वर्ष होऊन गेली पण आजही हे गाणं तितकंच फ्रेश वाटतं.

आफरीन आफरीन, कोक स्टुडिओ Aafreen Aafreen, Coke Studio
तुम्ही त्याला तुमच्या ब्रायडल एंट्रीने घायाळ करण्याच्या विचारात असाल तर हे गाणं परफेक्ट चॉईस आहे.

मधानिया, नेहा भसिन Madhaniya, Neha Bhasin
हे पंजाबीतील लोकगीतही अनेक लग्नात आवर्जून ब्रायडल एंट्रीसाठी वापरलं जातं. तुम्हालाही बॉलीवूड किंवा मराठीतील टिपीकल गाणी टाळायची असल्यास हे पंजाबी गाणं तुम्ही निवडू शकता.

शुभारंभ काय पो छे Shubh Aarambh, Kai Po Che
तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरूवातीसाठी हे शुभारंभ गाणं नक्कीच लकी ठरेल. कारण या गाण्यात आहेत फक्त आणि फक्त चांगल्या शुभेच्छा.

तारे है बाराती, विरासत Taarein Hain Baraati, Virasat
हे गाणं आणि याचा अर्थ खूपच सुंदर आहे. लग्नातील ब्रायडल एंट्रीसाठी या गाण्याला पर्याय नाही. इतकं श्रवणीय आणि अर्थपूर्ण हे गाणं आहे.

गल मिठी मिठी बोल, आयेशा Gal Mithi Mithi Bol, Aisha
लग्नासाठी धमाल आहे हे गाणं. तुमच्या लग्नात हे ब्रायडल एंट्रीला जर वापरता नाही आलं तरी एकदा तरी वाजायलचा हवं.

काला चश्मा, बार बार देखो Kala Chashma, Baar Baar Dekho
हे जरी पार्टी साँग असलं तरी तुम्ही जर काळा गॉगल घालून एंट्री करण्याच्या विचारात असाल तर हे गाणं परफेक्ट आहे.

तूने मारी एंट्रीया, गुंडे Tune Maari Entriyaan, Gunday
या गाण्याच्या शद्बांमध्ये एंट्री आहे म्हटल्यावर तुमच्या नवऱ्याच्या मनात हे गाणं ऐकताच नक्कीच घंटीया वाजतील.

ड्रामा क्वीन, हंसी तो फंसी Drama Queen, Hasee To Phasee
तुम्ही जर ड्रामा क्वीन असलात तर मग या गाण्याशिवाय पर्यायच नाही. तुमच्या ड्रामा क्वीन फ्रेंडसाठीही तुम्ही या गाण्याचं सरप्राईज प्लॅन करू शकता.

हेही वाचा –

मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट

WeddingSpecial : लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स

तुमचं लग्न ठरलं आहे का, मग फॉलो करा हे ‘ब्रायडल ब्युटी केअर रूटीन’

Read More From Planning