Wedding Gifts

लग्नानंतर विकी जैनने अंकिताला गिफ्ट केला मालदिव्जमध्ये लग्जरी व्हिला

Trupti Paradkar  |  Dec 16, 2021
लग्नानंतर विकी जैनने अंकिताला गिफ्ट केला मालदिव्जमध्ये लग्जरी व्हिला

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे लग्न 14 डिसेंबर 2021 मध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. अंकिताच्या मेंदी, हळद, संगीत, लग्नसोहळा आणि रिसेप्शनच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव केला. लग्नानंतर वधूवरांना नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबाकडून निरनिराळ्या भेटवस्तू दिल्या जातात. त्याचप्रमाणे सर्वांनी या जोडप्याला आर्शीवाद आणि भरपूर भेटवस्तू दिल्या. मात्र एक भेटवस्तू अंकितासाठी खूपच खास आहे. कारण ती तिला तिचा पती विकी जैनने गिफ्ट केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकीने अंकिताला लग्नानंतर मालदिव्जमध्ये एक महागडा व्हिलाच गिफ्ट केला आहे.

साराच्या ‘चकाचक’ गाण्यावर झालेत सेलिब्रिटीही फिदा

मालिदिव्जमधील अंकिताच्या व्हिलाची किंमत ऐकून व्हाल थक्क

लग्नानंतर सेलिब्रेटी कपल मालदिव्जमध्ये हनिमूनसाठी जाणं पसंत करतात. मात्र विकीने त्याच्या लेडीलव्हसाठी चक्क मालदिव्जमध्ये एक लग्जरी व्हिलाच खरेदी केला आहे. या महागड्या व्हिलाची किंमत करोडोंमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिला पन्नास करोडोंचा असण्याची शक्यता आहे. अंकितासाठी विकीने प्रायव्हेट व्हिला खरेदी केला आहे.  विशेष म्हणजे अंकिताही गिफ्ट देण्यात मुळीच मागे नाही कारण तिनेही विकीला असाच एक प्रायव्हेट व्हिला गिफ्ट केला आहे. अंकिताने गिफ्ट केलेल्या व्हिलाची किंमत आठ करोड आहे.

लग्नानंतर लेकीची पाठवणी करताना भावूक झाला तारक मेहताचा ‘जेठालाल’

अंकिताला लग्नात मिळाल्या महागड्या भेटवस्तू

अंकिता आणि विकीने एकमेकांना तर महागडी भेटवस्तू गिफ्ट केली आहेच. पण या व्यतिरिक्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांनीही त्यांना खूप मौल्यवान आणि महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकता कपूने अंकिताला पन्नास लाखांचा डायमंड सेट गिफ्ट केला आहे, माही विजने अंकिताला सब्यसाची कलेक्शनची पंधरा लाखाची साडी गिफ्ट केली आहे. रश्मि देसाईनेही तिला महागडी डिझायनर साडी गिफ्ट केली आहे. ऋत्विक धनजानीने विकी जैनला एक लग्जरी घड्याळ आणि अंकिताला डायमंडचे महागडे चोकर गिफ्ट केले आहे. ज्यांची किंमत जवळजवळ पंधरा लाख असण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफनेही अंकिता मिनी कूपर ब्रॅंडची महागडी कार गिफ्ट केली आहे. सृष्टी रोडे, मृणालिनी त्यागी आणि शहीर शेखने अंकिताला सोन्याच्या भेटवस्तू गिफ्ट केल्या आहत. श्रद्धा कपूरने डायमंड ब्रेसलेट दिलं आहे. अंकिताला नेहमीच तिचं लग्न असं धुमधडाक्यात आणि जवळच्या लोकांच्या आनंदात व्हावं असं वाटत होतं. त्याप्रमाणे तिचं लग्नाचं स्वप्न नक्कीच पूर्ण झालं आहे. शिवाय तिच्यावर तिच्या जिवलगांनी आर्शीवाद आणि भेटवस्तूंच्या स्वरूपात प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला आहे. 

मासिक पाळीच्या काळातही वर्कआऊट करतेय सारा अली खान

Read More From Wedding Gifts