खाणंपिण आणि नाइटलाईफ

ताक टेस्टी करण्यासाठी बनवा घरगुती मसाला, जाणून घ्या रेसिपी

Leenal Gawade  |  Mar 7, 2022
ताकाचा मसाला

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जर कोणतं पेय मदत करत असेल तर ते ताक. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. दही पचत नसेल अशांना देखील दही मोडून त्यापासून ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. दही-पाणी- मीठ एकत्र करुन चांगले घुसळले की, त्यापासून ताक तयार होते. ताकाची ही अगदी सोपी आणि साधी रेसिपी झाली.  जर तुम्हाला एकदम चटपटीत आणि पचनाला मदत करणारे असे ताक बनवायचे असेल तर तुम्ही घरीच काही सोप्या साहित्यापासून मसाला बनवू शकता. चला जाणून घेऊया अशाच काही सोप्या आणि मस्त रेसिपीज

पुदिना ताकासाठी पुदिना चटणी

ताक मसाला

ताकामध्ये तुम्हाला पुदिना चटणी बनवायची असेल तर ही चटणी बनवणे फारच सोपे आहे. ही चटणी बनवणे फारच सोपे आहे. 

साहित्य: पुदिन्याची पाने, तिखट मिरच्या,कोथिंबीर  जीरं, काळं मीठ, लसूूण पावडर

कृती: मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार पुदिन्याची पाने, तिखट मिरच्या, कोथिंबीर, जीर, काळं मीठ आणि लसूण किंवा लसूण पावडर घेऊन त्याची एक छान चटणी वाटून घ्या. ही चटणी थोडी जाड वाटून घ्या. ताक घुसळून झाल्यानंतर त्या ताकामध्ये चटणी घालून एकजीव करा. ही चटणी किंवा मसाला घातल्यानंतर तका चवीला छान लागते.

चटपटीत चाट मसालावाले ताक

तुम्हाला जरा चटपटीत असे चाट मसालावाले ताक प्यायचे असेल तर तुम्ही मस्त चटपटीत असे चाट मसालावाले ताक देखील बनवू शकता. त्यासाठी तुम्ही असा छान मसाला देखील बनवू शकता. 

साहित्य:  जीरे, चाट मसाला, काळं मीठ 

 कृती:  तव्यावर जीर छान भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये जीरे, चाट मसाला आणि काळं मीठ घेऊ त्याची एक छान पूड बनवा. तुमचा ताक मसाला तयार 

या मसाल्यामध्ये असलेले जीरे पचनासाठी खूपच चांगले असते. शिवाय याची चव देखील खूप मस्त लागते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात ताक बनवायचे असेल त्यावेळी देखील तुम्ही असा मसाला बनवून ठेवू शकता. झटपट ताक बनवण्यासाठी हा मसाला एकदम परफेक्ट आहे. 

पौष्टिक ताक मसाला

ताकाचा मसाला

जर तुम्हाला अगदी प्रोफेशनल ताकाचा मसाला बनवायचा असेल तर तसा सुका मसाला देखील तुम्हाला बनवता येतील. असा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्यही तितकेच महत्वाचे आहे. 

साहित्य:  1 कप धणे, 1 कप जीरे, ½ वाटी ओवा, ½ वाटी काळे मीठ, 1 चमचा सैंधव, 1 चमचा काळीमिरी, 1 चमचा सुंठ पावडर 

कृती:  एक पॅन घेऊन त्यामध्ये सगळे साहित्य चांगले गरम करुन घ्या. ते तुम्हाला छान भाजायचे आहे. ते छान भाजून झाल्यानंतर तुम्हाला थंड करायचे आहे आणि मिक्सीच्या भांड्यात सगळे साहित्य फिरवून घ्यायचे आहे. 

तुमचा मस्त ताक मसाला तयार 

आता हे वेगवेगळे ताक मसाला तुम्ही नक्की ट्राय करा

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ