फक्त शोभेचे झाड म्हणूनच नव्हे तर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही निवडुंग फायदेशीर आहे. कॅक्टस किंवा निवडुंग हे झाड कॅक्टेसी फॅमिलीतले झाड आहे. साधारणपणे ही झाडे वाळवंटांत आपण बघतो व या झाडाकडे पाणी साठवण्याची क्षमता असते. परंतु तुम्हाला माहित आहे का की इतर अनेक झाडांप्रमाणे निवडुंगामध्येही अनेक औषधी गुण असतात. निवडुंगाचा वापर आपण त्वचेची काळजी घेण्यासाठीही करू शकतो. त्यामध्ये असलेले औषधी घटक त्वचेसाठी चांगले आहेत. पण अनेकांना निवडुंगाच्या या उपयोगाची माहिती नाही. निवडूंग हे अनेक अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्सने परिपूर्ण आहे जे त्वचेचे सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. ते वृद्धत्वाची लक्षणे आणि कोलेजनच्या नुकसानाशी लढा देते. तर जाणून घ्या कॅक्टसच्या त्वचेसाठी फायद्यांविषयी-
त्वचा निरोगी ठेवते
निवडुंग लावल्याने त्वचा तरूण राहण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेपासून एजिंग साईन्स दूर ठेवायचे असतील, तर निवडुंगाचा तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समावेश करा. त्यासाठी कॅक्टसच्या बियांचे तेल एका भांड्यात घ्या आणि त्यात कॉटन पॅड बुडवून तुमच्या चेहेऱ्यावर लावा. पण हे करण्याआधी चेहेरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. कॅक्टसमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आपली त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करतात.
पिंपल्सपासून मुक्ती मिळते
उन्हाळ्यात त्वचेवर ब्रेक आउट्स किंवा पुरळ आणि मुरुमांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत, त्वचेसाठी निवडुंग वापरणे फायदेशीर ठरते. कॅक्टस ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे बॅक्टेरियामुळे होणारे मुरूम कमी करण्यास फायदेशीर आहे. बाजारात तुम्हाला कॅक्टसचे तेल सहज मिळेल. कॅक्ट्स ऑईलचे काही थेंब तुमच्या त्वचेवर नियमितपणे लावल्यास काही दिवसात तुम्हाला त्वचेवर चांगला परिणाम दिसू लागेल.
त्वचा तरुण बनवते
जर तुमची त्वचा निस्तेज झाली असेल तर आणि त्वचेवर सुरकुत्या व फाईन लाईन्स आल्या असतील तर त्यासाठी निवडुंगाच्या गराचा तुम्ही वापर करू शकता. कॅक्टसचा फेसमास्क बनवण्यासाठी एक चमचा कॅक्टस जेल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा कोरफडीचा गर हे साहित्य लागेल. हे सर्व घटक ब्लेंडरमध्ये एकत्र करा आणि चेहेऱ्यावर लावा. कॅक्टसमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आपली त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करतात व त्वचा टवटवीत व चमकदार बनवतात.
कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर
कॅक्टस ऑइल केवळ ऍक्ने प्रोन त्वचेसाठीच चांगले नाही तर कोरड्या त्वचेलाही त्याचा फायदा होतो. कॅक्टस जेल देखील कोरड्या त्वचेला मऊ बनवते. कॅक्टस जेल मिळवण्यासाठी कॅक्टस कापून घ्या. फक्त ते कापताना काळजीपूर्वक कापा कारण त्यावर काटे असतात. कोरफडीप्रमाणे कॅक्टसमध्येही जेल असते. त्यामुळे ते कापून त्यातील जेल काढता येऊ शकते. हे ताजे जेल त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला अतिरिक्त ओलावा मिळेल आणि कोरड्या त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळेल. तुम्ही हे जेल कोरड्या केसांना देखील लावू शकता. हे कोरड्या केसांना हायड्रेशन प्रदान करेल आणि त्यांना मऊ आणि चमकदार बनवेल. तसेच जर तुमची त्वचा नेहेमी टॅन होत असेल तर त्वचेवर फक्त कॅक्टस जेल किंवा जेल लावा. कॅक्टस जेलमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात जे त्वचेला हायड्रेट करतात आणि त्यातील अँटीऑक्सिडंट्स अतिनील किरणांमुळे झालेली त्वचेची हानी टाळण्यास मदत करतात.
म्हणूनच तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये कॅक्टसचा नक्की समावेश करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक