लाईफस्टाईल

छत्रपती शिवरायांची किल्लेबांधणी म्हणून होती वाखाणण्यासारखी

Leenal Gawade  |  Feb 16, 2021
छत्रपती शिवरायांची किल्लेबांधणी म्हणून होती वाखाणण्यासारखी

छत्रपती शिवाजी महाराजांचीआठवण येणार नाही असा एकही दिवस नसेल. मराठ्यांचा असा सरदार ज्याने कोणतीही भीती न बाळगता अस्मानी सुल्तानी संकटाला सामोरे जात स्वराज्याचा झेंडा फडकवला. स्वराज्याची ही मोहीम आतापर्यंत अनेकांनी वाचली असेल. शिवाजी महाराजांच्या मोहीमाच नाही तर त्यांच्या सगळ्याच बारीक सारीक गोष्टी या वाचण्यासारख्या आहेत. महाराजांनी बांधलेले किल्ले हे जर तुम्ही कधी अभ्यासले असतील आणि त्या किल्ल्याला भेट दिली असेल तर या किल्ल्यांची माहिती घेताना तुम्हाला नक्कीच या बांधकामाचा अंदाज येईल. महाराजांची दूरदृष्टी ही इतकी चांगली होती आणि त्यांना मावळ्यांना इतकी चांगली साथ दिली की, त्यांनी बांधलेले प्रत्येक किल्ले हे वेगळे आणि आजही अभ्यासण्यासारखे आहेत.

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा Shivaji Maharaj Marathi Songs & Powada

किल्ले बांधणी

Instagram

किल्ले बांधणी हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांची रणणिती आणि त्यांची बुद्धीमत्ता जाणून घेण्यासाठी फारच महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, डोंगरावर त्यांनी किल्ले बांधले. प्रत्येक किल्ले त्यांची रचना ही एकमेकांशी थोड्या फार फरकाने सारखी असली तरी  शत्रूचा विचार करुन शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची बांधणी केली. शिवाजी महाराजांनी भर समुद्रात बांधलेले  कुलाबा, खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग,रत्नदुर्ग,  कोकणातील  विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले पाण्यात बांधलेले आहेत. प्रत्येक किल्ले हे शत्रूंचा विचार करुन बनवले गेले आहेत.  प्रत्येक किल्ल्याची बांधणी करताना त्याचा विचार करण्यात आला आहे. शिवाय किल्ल्यांमध्ये राहताना मावळ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी देखील घेण्यात आली होती. शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिल्यानंतर ते एक उत्तम रचनाकार होते असे म्हणायला काहीच हरकत नाही.किल्ल्यांवरील विहिरी, घर,स्वयंपाकघर, न्हाणीघर, मंदिर बुरुज यासगळ्या गोष्टींची रचना ही फार विचार करुन केलेली आहे.  

आवर्जून वाचावीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके

किल्ल्यांची रचना

किल्ल्यांची रचना ही हा देखील जाणून घेण्याचा विषय आहे. तुम्ही एखाद्या जलदुर्गाला कधी भेट दिली किंवा कोणत्यारही किल्ल्याला भेट दिली की,  एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे किल्ल्यांची रचना ही फार विचारपुर्वक केलेली होती. आता सिंधुदुर्ग किल्ल्याचा विचार केला तर हा किल्ला भर समुद्रात बांधण्यात आलेला आहे. बेटावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावर शत्रूंने हल्ला करताना त्यांना अडचणी याव्या म्हणून या किल्ल्याचा दरवाजा हा विशेष पद्धतीने बांधण्यात आलेला आहे.  समुद्रातून हल्ला झाला आणि हत्तीच्या मदतीने हा दरवाजा तोडण्याचा मनसुबा असेल तर तो मनसुबा मोडीत काढण्यासाठी याची उभारणी करण्यात आलेली आहे. या किल्ल्याचे मुख्य द्वार कुठे आहे याचा मुळीच अंदाज येत नाही.  याशिवाय समुद्रात किल्ला बांधलेला असून देखील या ठिकाणी असणाऱ्या गोड पाण्याच्या विहिरी आणि भुयारी मार्ग या सगळ्या गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश

महाराजांची अर्थव्यवस्था

Instagram

महाराजांची अर्थव्यवस्था ही देखील जाणून घेणे फार महत्वाची आहे. शेतीमध्ये विकसित तंज्ञज्ञान आणून शेतीला चालना दिली. शिवाय गड किल्ले जिंकून जमा केलेला महसुल, त्याचा वापर शिवाजी महाराजांनी राज्य वाढवण्यास केला. शिवाजी महाराज हे हिशोबाच्या बाबतीतही फार चौकस होते. किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मावळ्यांच्या हितासाठी योग्य अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. महाराजांची अर्थव्यवस्था हा संपूर्ण वेगळा जाणून घेणारा विषय आहे. राज्याचा कोषागार हा संपन्न  भरलेला असेल तर राज्याची प्रगती होते. हे शिवाजी महाराजांचे धोरण होते म्हणून शिवकालीन मराठी प्रगतीवर होता. 

जर तुम्ही शिवाजी महाराजांचे गड-किल्ले पाहिले नसतील तर आजच तुम्ही त्याचा अभ्यास करायला हवा.

वाचा – मराठी दिनाच्या शुभेच्छा

Read More From लाईफस्टाईल